कामाच्या ठिकाणी पौष्टीक फळं आणि भाज्या खाऊन तुमचा उत्साह आणि मूड चांगला राहील. ह्यालाच हेल्दी स्नॅक्स म्हणतात.
कामाच्या ठिकाणी ठेवा पोषक पदार्थ

आपल्या सगळ्यांना आठवत असेल लहान असताना आई काही खाऊ आणायची आणि अभ्यासाच्या टेबलावर ठेवायची. ती नेहमी म्हणायची की आपण जे खातो त्याचा आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंवर परिणाम होतो आणि आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांचा स्त्रोत अन्नच तर आहे.
सगळ्या आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुम्हाला पौष्टीक खायलाच हवं. काही पदार्थ आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया टिकवून ठेवण्यास मदत करतात. अशा अन्नाचा आहारात समावेश करावा ज्यामुळे न्यूरॉन्स वाढतात. त्यासाठी तुम्ही भाज्या आणि पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार घ्यावा.
आहारात पांढरा तांदूळ, पास्ता आणि संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या ब्रेडसारख्या विविध पदार्थांचा समावेश करा. हे तुमच्या शरीरातील फायबर वाढवण्यास मदत करते, जे पचनास मदत करते. व्यायाम करताना हेल्दी मंचिंग केल्याने तुमचं आरोग्य, मनःस्थिती, मानसिक आरोग्य सुधारेल.
आपली आतडी सांगतात आपलं आरोग्य

आपली आतडी सुद्धा आपल्याला कसे वाटते हे सांगेल. आपण तणावाखाली असल्यास, ते जलद किंवा हळू काम करू शकते. आपल्या आतड्यांसाठी पौष्टीक फळं, भाज्या, धान्य आणि प्रोबायोटिक्स खा. पौष्टीक खाल्ल्याने “चांगले” बॅक्टेरिया वाढतात जे तुम्हाला आळशी किंवा थकल्याशिवाय कामातली उत्पादकता वाढवतात.
पॅकेट मधल्या चिप्सऐवजी शेंगदाणे, बिया आणि रंगीबेरंगी भाज्या सलाड खा. फळांमध्ये काळी मिरी पूड घालून खाल्यास फळं पचतील. परिपुर्ण आणि पौष्टीक खाऊन आतड्याचं आरोग्य चांगलं राहिल
पौष्टीक नाश्ता, ट्रिगरिंग न्यूरॉन्स आणि मानसिक आरोग्य

योग्य पोषण आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं. ट्रिगरिंग न्यूरॉन्स हे एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढवते. याउलट, तुम्ही पौष्टिक आहार पुरेसा घेत नसल्यास, विचार करणे, समजून घेणे आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. कारण पोषणतज्ञ म्हणतात की आहार हा मानसिक आरोग्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो शारीरिक आरोग्यासाठीही आहे.
चुकीच्या आहारामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंता हे त्रास होतात. शरीराला विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि खनिजे आवश्यक असतात. यापैकी बहुतेक पोषक घटक आपलं मानसिक आरोग्य सुधारतात. काम आणि अभ्यास करतांना सुकामेवा आणि एक कप कोमट दूध देखील तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवेल.
खाण्याचा आणि मूड बदलण्याचा काय संबंध?

तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं आहे. पौष्टीक आणि संतुलित न्याहरीमध्ये फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, लो फॅट दुग्धजन्य पदार्थ, प्रोटीन्स किंवा मर्यादित प्रमाणात सोडियम, चांगले फॅट्स आणि साखर आवश्यक आहे.
तुमच्या आहाराच्या निवडीमुळे तुमचा मूड आणि मानसिक आरोग्य सुधारायला मदत होऊ शकते, ज्याला फूड-मूड कनेक्शन असेही म्हणतात. यामुळेच भारतीय परंपरेतील कोणताही सण किंवा उत्सव अन्नाशिवाय अपूर्ण राहतो. अन्न आणि मूड चा जवळचा संबंध आहे. त्यामुळे पौष्टिक खा आणि तुमचा मूड नेहमी उत्साही ठेवा.