प्रयत्न करूनही जर सकाळी लवकर उठता येत नसेल! तर ह्या काही अचूक ट्रीक्स करून बघा. आपोआप सकाळी लवकर उठाल.

आपल्या मनात खूप असतं की उद्या पासून आपण सकाळी उठायला सुरुवात करायची. पण अनेक वेळा ठरवून सुद्धा सकाळी लवकर उठताच येत नाही. आजकाल रात्री उशिरा झोपायचा एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे. तरुण मुद्दामून रात्री उशीरा झोपतात रात्री उशिरा झोपल्यामुळे जर त्यांनी लक्षात घेतले तर ते लवकर झोपायला सुरुवात करतील. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे जवळ ही सवय आता तुम्हाला मोडावी लागेल.

सकाळी लवकर का उठायचं?

3 80

सकाळी लवकर उठल्याने दिवसभर सकारात्मक मानसिक वृत्ती राहते. मनात आळशीभावना चालढकल करण्याची वृत्ती निघून जाते. कधी कामात तर कधी मजा मस्ती करताना आपण रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. पण यामुळे सकाळच्या ताज्या थंड हवेला आणि अनेक निसर्गरम्य दृश्यांना आपण मुकतोच, शिवाय शरीराला मिळणाऱ्या लाभांपासूनही दूर राहतो.

सकाळी उशीरा उठल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्यसुध्दा हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

- Advertisement -

ह्या लेखात सकाळी लवकर उठण्याचे फायदे वाचून तुम्ही नक्की प्रेरणा घ्याल आणि सकाळी लवकर उठण्यासाठी काही टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत.

सकाळी लवकर उठा असं आयुर्वेद का म्हणतो?

4 78

आयुर्वेदानुसार सकाळी 4 ते 6 दरम्यान लवकर झोपून उठल्याने आपल्याला नकारात्मक विचार आणि नैराश्याला सहजपणे सामोरे जाऊ शकतो. दिवसभर आपल्याला अजिबात आळस येत नाही आणि आपण ताजेतवाने राहतो. जर तुम्ही सकाळी उठून सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला जाल तर आपण केवळ निसर्गाशी जोडले जात नाही तर आपली जीवनातली शक्ती आणि सकारात्मकता सुद्धा वाढते.

सकाळी उठणे हे मन आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे

5 77

तुम्हाला सकाळी ६ नंतर उठण्याची सवय असेल, तर तुम्ही तुमची उठण्याची वेळ हळूहळू मागे आणू शकता. तुम्ही स्वतःवर एक प्रयोग करून बघा, तुम्ही तुमची उठण्याची वेळ निश्चित करू शकता. तुमचा अलार्म दररोज किंवा प्रत्येक इतर दिवशी १५ मिनिटं आधी सेट करा. हा उपाय सुरुवातीला पाच मिनिटं आधी असा दररोज वाढवत जा.

- Advertisement -

जोपर्यंत तुम्हाला सकाळी ६ वाजता किंवा त्यापूर्वी आरामात उठण्याची सवय लागेपर्यंत सुरू ठेवा. लवकर उठल्याने तुमचं मानसिक आरोग्य तर सुधारेलच पण रात्री लवकर झोपण्याची तुमची तयारी होईल. 

हा प्रयोग तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल. हळुहळु तुम्हाला ठरलेल्या वेळी झोप येईल. फारसे कष्ट न करता तुम्ही शांत झोप घेऊ शकता. लवकर उठून आपण निसर्ग जसा शुद्ध असतो तसेच मनाने शुद्ध व्हायला लागतो. तुम्ही कोणतीही अध्यात्मिक साधना करण्याचा विचार करत असाल तर सकाळी लवकर उठून करा.

लवकर उठण्याचे हे फायदे जीवनावर परीणाम करतात

तुम्हाला जास्त वेळ मिळतो

6 68

आजच्या जगण्यात तुम्हाला सकाळी अजिबात वेळ मिळत नाही. पण दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी, ती सकाळी लवकर उठल्यावर जास्त वेळ मिळतो. थोडा वेळ स्वत:साठी घालवू शकता. या वेळेचा सदुपयोग करा, काही मिनिटे डोळे बंद करा आणि शांतपणे ध्यान करा. काही नवीन शिकण्याचा प्रयत्न सकाळी लवकर उठून करा.

दिवसभराच्या आवाजापूर्वीची शांतता

7 62

सकाळ म्हणजे दिवसभराच्या गजबजाटाच्या आधी काही क्षणांची शांतता असते. सकाळी लवकर उठल्यावर ह्या वेळेचा फायदा घेता येईल. शांतपणे काही महत्वाचं प्लॅनिंग करता येईल.

सकारात्मक दृष्टीकोन मिळतो

8 34

सकाळी मौन असल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक दृष्टिकोनाने करता. कोणावरही विनाकारण रागावण्याऐवजी किंवा रागावण्याऐवजी तुम्ही लोकांप्रती कृतज्ञता दाखवायला सुरुवात कराल. तुम्ही शांत राहून संकटांवर अचूक मार्ग काढाल. स्वतःची चूक मान्य कराल आणि व्यापक विचार करायचा प्रयत्न कराल.

वेळेचं व्यवस्थापन जमून येईल

9 20

तुम्ही सकाळी लवकर उठल्यावर वेळेचं व्यवस्थापन शिकाल. सकाळी बाहेर निघायचं असल्यास उशीरा झोपून लवकर उठल्यावर झोप पूर्ण होत नाही. पण रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने दिवसभर सकारात्मक मानसिकता राहील.

ऑक्सिजन मिळतो

10 16

जप किंवा प्रार्थनाआणि प्राणायाम करण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. निसर्ग प्राणशक्तीच्या ऊर्जेने पूर्ण असतो. जर ऑक्सिजन आपल्या फुफफुसात भरून घ्यायचा असेल. तर सकाळची वेळ उत्तम आहे. ऑक्सिजन मुळे मेंदू दिवसभर तरतरीत राहतो.

येथे काही युक्त्या आहेत ज्या तुम्हाला सकाळी लवकर उठायला मदत करतील

11 8
  • सकाळी लवकर उठल्याने आरोग्य मिळतं. म्हणूनच सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाच आहे.
  • तुम्ही सकाळी आपोआप तर अजिबात उठू शकत नाही. पण अलार्म बंद करुन झोपणारे तुम्ही सुद्धा असाल तर एक युक्ती करा तुमचं अलार्म घड्याळ/मोबाईल फोन तुमच्या बेडपासून दूर ठेवा. जेणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडावच लागेल.
  • एकटे झोपत असल्यास टीव्ही चालू करा नाहीतर अलार्म बंद करण्याचा प्रयत्न करत असताना लगेच जाणूनबुजून लाईट चालू करा.
  • मी आज एका चांगल्या कारणासाठी उठत आहे या विचाराने तुमचं मन भरा. स्वतःला पुन्हापुन्हा समुपदेशन करा.
  • मी आता सकाळी लवकर उठायला सुरुवात केलेली आहे आणि आता दिवसेंदिवस मला चांगला अनुभव येतोय हे तुमच्या विश्वासू मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना कळवा.
  • असे काही ऍप सुद्धा आता मोबाईल मध्ये आहेत.
  • तुमच्या मनाला थोडं कठोर वागवा. सकाळी लवकर न उठण्यासाठी मनात तयार केलेली सर्व कारणे बाजूला ठेवा, पुन्हा पुन्हा मनाला सांगा की तुम्हाला सकाळी लवकर उठायचच आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories