राग येतो! राग कमी करण्यासाठी ना व्यायाम ना ध्यान.. फक्त हे काही पदार्थ खा आणि राग कमी होईल.

राग आला की सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो. मानसिक शांती नाहीशी होतेच पण सोबतच शरीराचा समतोल बिघडतो. तुम्ही न रागावता आयुष्य शांतपणे जगायचं हे ठरवलं आहे का? तर तुम्ही राग नियंत्रणात आणण्यासाठी उपाय शोधत असाल. बरोबर ना? ना कोणती ध्यान पद्धत ना कोणत्या व्यायामाने तुम्ही तुमचा राग नियंत्रणात ठेवू शकता हे पदार्थ खाल्ल्याने! होय हे खरं आहे.

कारण अन्न हे आपल्या शरीरापेक्षा मनाशी जास्त जोडललं असतं. म्हणूनच जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण तेच खातो. पण काही लोक रागाने किंवा दुःखी असताना जास्त खातात. हा भावनिक आहार आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या भावना टाळण्यासाठी जास्त खायला सुरुवात करतात.

मग बेक केलेले पदार्थ, मिठाई, चॉकलेट आणि स्नॅक्स आणि तेलकट आणि फॅटी वस्तू खाण्याची सवय सोडा त्याऐवजी तुम्ही काही पौष्टीक पदार्थ खाल्ले तर ते तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायला मदत करू शकतात.

राग कमी करण्यासाठी काय खावं?

नारळ

नारळ खरंच ग्लुकोजची पातळी कमी करतो, त्यामुळे तणाव कमी होतो आणि मनावर शांत प्रभाव पडतो. यासोबतच नारळातील फायबर खाण्याची भूक कमी करते. याव्यतिरिक्त, त्यातील मॅग्नेशियम झोप वाढवेल आणि तुमचं मन शांत करेल. यासोबतच फास्ट फूड आणि गोड खायची इच्छा सुद्धा कमी होते आणि वजन कमी व्हायला मदत होते.

संत्री खा

राग कमी करायचाय तर संत्री खा. तुम्हाला हे विचित्र वाटत असलं तरी, तुमचा राग नियंत्रित करण्यात संत्री खरोखर मदत करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि कॅरोटीनॉइड्स सारखे काही अँटीऑक्सिडंट असतात जे डोपामाइन वाढवतात आणि मूड स्विंग नियंत्रित करतात. यासोबतच संत्री शरीरातील हायड्रेशन पुनर्संचयित करतात आणि संत्र्याचा सुगंध आणि चव राग विसरायला लावते.

हिरव्या पालेभाज्या खा

हिरव्या पालेभाज्या मेंदूसाठी आणि विशेषतः न्यूरॉन्ससाठी खूप फायदेशीर असतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात आणि ते तुमचा मूड बदलतात. याशिवाय सतत लागणारी भूक कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

या भाज्यांमधील पोषक घटक चिंता कमी करायला आणि स्नायूंना आराम करण्यास मदत करतात, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा काकडी, पालेभाज्या आणि वाटाणे खा.

व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा

शरीरातलं व्हिटॅमिन डी प्रमाण तपासा. व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे राग येतो आणि मूड सतत बदलत राहतात. व्हिटॅमिन डी चं प्रमाण योग्य असेल तर राग कमी होतो आणि भावनांवर नियंत्रण राहतं. व्हिटॅमिन डी साठी अंड्यातील पिवळा बलक आणि मशरूम असे पदार्थ खाऊ शकता. डॉक्टर विटामिन डी सप्लीमेंट देऊ शकतात.

ओमेगा-3 समृद्ध अन्न खा

कधीकधी मनात असलेल्या उदासीनतेमुळे पटकन राग येतो. उदासीनतेच्या भावनांशी लढा देण्यासाठी फ्लॅक्ससीड्स, चिया सीड्स आणि अक्रोड्समध्ये आढळणाऱ्या ओमेगा-३ फॅटी ॲसिडचं सेवन वाढवा.

जर नसेल तर तुम्ही बदाम, काजू आणि अक्रोड यासारख्या गोष्टी खाऊ शकता जे तुमच्या शरीरातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड वाढवू शकतात आणि मूड स्विंग आणि रागावर नियंत्रण ठेवायला मदत करतात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories