टेन्शन घालवण्याचा शास्त्रीय मार्ग म्हणजे ह्या ॲक्टीव्हीटीज. ज्याने मन गुंतून राहील.

मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मेंदूचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. हया ॲक्टीव्हीटीज करा ज्यामुळे तुमचा मेंदू सकारात्मक पद्धतीने गुंतून राहील.

मित्रांनो, अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपलं मन शांत नसतं किंवा आपल्याला खूप राग येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणजेच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी संबंधित आहे. म्हणूनच मनावर ताबा ठेवणे खूप गरजेचं आहे.

आपल्या काही सवयी बदलून आपण आपलं मन नक्कीच शांत करू शकतो, परंतु मेंदूच्या निरोगी वाढीसाठी ते ॲक्टीव्ह ठेवणं आणि काही ॲक्टीव्हीटीज करणं खूप महत्वाचं आहे. या समस्येवर उपाय शोधताना, काही ॲक्टिव्हिटीज करायला हव्यात ज्याने मानसिक आरोग्य चांगलं राहील.

ध्यान करायला सुरू करा

मनाचं आरोग्य नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी ध्यान हा एक चांगला मार्ग आहे. ध्यान आपलं मन आणि शरीर शांत करते. त्याच वेळी, ते चिंता आणि तणावाच्या समस्यांमधून बाहेर पडण्यास देखील मदत करते. दिवसभरात फक्त काही मिनिटे ध्यान केल्याने तुम्हाला ॲक्टीव्ह वाटू शकतं.

व्यायाम करा

आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे शरीरावर होणारा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. जर आपण आपल्या शरीराला शारीरिक हालचालींमध्ये किंवा काही साध्या कामात व्यस्त ठेवलं तर ते आपल्या मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. ह्यासाठी नियमित व्यायाम करा.

नवीन भाषा शिकायला सुरुवात करा

तुमची बुध्दी सक्रिय आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट ठेवणं खूप महत्वाचं आहे.  एकापेक्षा जास्त भाषा बोलण्याचे अनेक फायदे आहेत. जे दोन भाषा वापरण्यात प्रवीण असतात, त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण आणि तर्कशक्ती प्रबळ असते. असे लोक मोठी कामे सहज करू शकतात आणि वाढत्या वयाबरोबर मानसिक समस्यांपासून ते वाचतात.

आवडती गाणी ऐका

तुमचं मन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुमची आवडती गाणी ऐकणे हा एक चांगला मार्ग आहे. बर्‍याचदा जेव्हा आपण नाराज असतो किंवा खूप रागावतो तेव्हा आपली आवडती गाणी काही मिनिटांसाठी ऐकल्याने मन शांत होतं.  आनंदी संगीत ऐकणे मूक संगीतापेक्षा नाविन्यपूर्ण होण्यास मदत करते. म्हणजेच अधिक चांगली गाणी तुमची मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आपल्या इंद्रियांसोबत जगा

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या इंद्रियांवर काम करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही अशा ॲक्टीव्हीटीजमध्ये गुंतलं पाहिजे जेथे तुम्ही एकाच वेळी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव घेणे, वास घेणे इत्यादी तुमच्या सर्व इंद्रियांवर कार्य करू शकता.  तुमच्या सर्व इंद्रियांना एकत्र ठेवल्याने तुमची मेंदूची शक्ती मजबूत होते. ह्यासाठी उत्तम चवीचं अन्न खा, त्याची चव, वास, स्पर्श करा. त्यावेळी संगीत ऐका. असे वेगवेगळे प्रयोग जाणीवपूर्वक करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories