मोबाईलच्या अतिवापरामुळे तुम्ही लवकर म्हातारे तर होत नाही ना? पाहा नवीन रिसर्च काय म्हणतो!

आज सगळे मोबाईल वापरत आहेत. मोबाईल फोन तुमच्या सोयीसाठी आहेत, पण आजकाल तुम्ही तुमच्या दिवसाचा बहुतांश वेळ मोबईल फोनवर घालवत असल्याचं तुमच्या लक्षात आलय का? दिवसभरात जास्तीत जास्त तास मोबाईल वापरणे तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारेच बनवत नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यालाही त्रासदायक ठरतं.

तंत्रज्ञानाच्या बदलामुळे आपली जीवनशैलीही खूप बदलली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल ही आपली पहिली गरज बनली आहे. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे आपण वयाच्या आधी अनेक आजारांमध्ये अडकत असतो. ज्यामध्ये डोळ्यांच्या कमकुवतपणापासून अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या मोबाईलमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात? एवढच नाही तर तुमचा ताण आणि चिंता वाढवून तुमच्या मानसिक आरोग्यालाही  पोहोचवत आहे.

मोबाईल आणि सुरकुत्या यांचा काय संबंध आहे ते समजून घ्या

अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या फ्रंटियर्स इन एजिंग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश एखाद्या व्यक्तीचं वय वाढू शकतं. ज्यामुळे न्यूरोडीजनरेशन होते.

संशोधनात असे आढळून आले की निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आलेल्या गटामध्ये सक्सीनेट नावाच्या रसायनाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होती. म्हणजेच एनर्जी प्रोडक्शन होत नाही. आपल्या स्मार्टफोनमधून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने व्यक्तीच्या वृद्धत्वाचा वेगही वाढतो. पण एवढंच नाही तर सुरकुत्या येण्याव्यतिरिक्त मोबाईल फोनचा अधिक वापर करूनही इतर अनेक त्रास उद्भवू शकतात.

एकाग्रता कमी होते

जास्त मोबाईल व्यसनाचा आपल्या फोकसवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. यूएसमधील 27 टक्के कार अपघातांचे सर्वात मोठे कारण सेल फोन होते. सेल फोन वापरत असताना वाहन चालवल्याने तुमची एकाग्रता कमी होते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

झोप आणि मूड खराब होतो

जर तुम्हाला सेल फोनचे व्यसन लागले असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मूडवर आणि झोपेवर होतो. यामुळे, तुमचा मूड बदलू लागेल आणि झोपेची पद्धत कमी होऊ लागेल. गोटेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी स्मार्टफोनवर संशोधन करताना असे आढळून आले की स्मार्टफोनमुळे आपल्या मूड आणि झोपेवरही परिणाम होतो.

चिंता काळज्या वाढतात

मोबाईल फोनने जगाला एका ठिकाणी नक्कीच जोडले आहे, परंतु यामुळे तणाव आणि चिंता वाढत आहे. जेव्हा लोक काळजीत असतात तेव्हा लोक प्रत्येक मेसेज, ईमेल, कॉलला त्वरित प्रतिसाद देतात. जास्त तणावाखाली असल्यावर लोक जास्त मोबाईल वापरतात.

मोबाईल फोनच्या अतिवापराचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो. मोबाईलचं हे व्यसन केवळ आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

प्रायोगिक आणि क्लिनिकल सायन्समधील संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की मोबाईलचं व्यसन लागलं की लोक महत्वाच्या नातेसंबंधांमध्ये वेळ देत नाहीत. मोबाईल मुळे लोक जास्त जवळ आल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. आणि त्याचा परिणाम नाती जपण्यावर होतो.

Leave a Comment