पालेभाजी सर्वोत्तम! हिवाळ्यात ह्या 6 हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा, शरीराला होतील अनेक फायदे.

हिवाळ्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या खायला मिळतील. जाणून घेऊया पालेभाज्या आणि त्यांचे आरोग्य फायदे. हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात.  लोकहो, उन्हाळ्यापेक्षा ह्या ऋतूत विविध प्रकारचे पदार्थ खा कारण लगेच पचन चांगलं होतं.

पण त्याचबरोबर हिवाळ्यात आपल्याला आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते, ह्याचं कारण म्हणजे ह्या ऋतूत आजारी पडण्याचा धोका जास्त असतो.  विशेषत: सर्दी, ताप यासारख्या समस्या या ऋतूत अधिक असतात. 

म्हणूनच हिवाळ्यात तुम्ही पोषक तत्वांनी युक्त भाज्या  खाऊ शकता. तुम्हाला माहीत नसेल पण भाज्यांमध्ये ह्या काळात हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम आहेत. आज आपण  पालेभाज्यांच्या अशाच काही प्रकारांबद्दल वाचणार आहोत, ज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.  चला जाणून घेऊया थंडीच्या दिवसातील हिवाळीपालेभाज्यांची विविधता आणि त्याचे फायदे.

मेथीची पालेभाजी

मेथीचे पराठे चवीला खूप छान लागतात. तुम्हाला बाजारात मेथी अगदी सहज मिळेल.  आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, प्रोटीन, आयरन, नियासिन यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. याशिवाय त्यात मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि फॉलिक ॲसिड सारखे घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.  मेथीचे दाणे आणि मेथीची पालेभाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय अपचन, गॅस आणि जुलाब यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांवरही मेथी चांगली आहे.

राजगिरा पालेभाजी

हिवाळ्यातील पौष्टीक हिरव्या पालेभाज्यांमध्ये चोळई किंवा राजगिरा ही सर्वात प्रमुख पालेभाजी मानली जाते.  आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही ही पालेभाजी आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही राजगिऱ्याचं नियमित सेवन केलं तर तुमच्या शरीरात जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता भासणार नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.  कफ आणि पित्ताच्या समस्येने त्रस्त लोकांसाठी ही पालेखूप चांगली मानली जाते.  कफ आणि पित्ताच्या समस्यांचा नाश करण्यासाठी ही एक अतिशय चांगली हिरवीगार भाजी आहे.

मोहरीची पालेभाजी

तुम्हाला माहीत असेल सरसों का साग आणि मक्के की रोटी हे पंजाबची प्रसिद्ध डिश आहे. ही डिश चवीला खूप चांगली असते.  आपल्याकडे मोहरीच्या पानांची भाजी हिवाळ्यात केली जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आपल्यासाठी मोहरीची भाजी खूप फायदेशीर आहे.

ह्या पालेभाजीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला विषारी पदार्थांपासून वाचवतात, तसच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात.  ह्या भाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅलरीज, फॅट, मॅग्नेशियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. ह्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे पचनाच्या दृष्टीकोनातून त्या आपल्यासाठी चांगल्या मानल्या जातात.

चण्याची पालेभाजी

तुम्ही हरभरा अनेक प्रकारात खाल्ला असेल, पण तुम्ही चण्याच्या हिरव्या पाल्याची भाजी कधी खाल्ली आहे का?  चण्याची पालेभाजी चवीला खूप छान लागते. हिवाळ्यात हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. ही हिरवी भाजी बद्धकोष्ठता, कावीळ आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगली मानली जाते.

पालक भाजी

जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते तेव्हा बहुतेक डॉक्टर पालक खाण्याचा सल्ला देतात. त्यात नुसतं लोहच नाही तर त्यात प्रोटीन, कॅलरीज, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स सारखे घटक देखील असतात.  यासोबतच यामध्ये इतरही अनेक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.  मात्र, अधिक पालक खाल्ल्याने पोटात गॅस, पोट दुखणे आणि पोट फुगणे हे त्रास  होऊ शकतात, त्यामुळे पालक माफक प्रमाणात खा.

बथुआ पालेभाजी

यूरिक ॲसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी बथुआची भाजी अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय अनेक समस्यांवरही ही भाजी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठी बथुआ खूप फायदेशीर आहे.

  • हिरव्या पालेभाज्या खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.
  • केमिकल असलेल्या हिरव्या भाज्या खाऊ नका, त्या तुमच्या लिव्हर आणि किडनीला हानी पोहोचवू शकतात.
  • बाजारातून पालेभाज्या आणल्यानंतर त्या नीट स्वच्छ करा.
  • पालेभाज्या स्वच्छ केल्यानंतर काही वेळ कोमट पाण्यात सोडा, यामुळे हिरव्या भाज्यांमध्ये असलेली केमिकल निघून जातात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories