डायबिटिस असलेल्या लोकांसाठी खास आहार. मधुमेही लोकांसाठी आहाराचं गोड गुपित जाणून घ्या.

मधुमेही लोकांसाठी आहार – आम्हाला माहीत आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर वाचण्यासाठी तुम्ही उत्साही असाल कारण हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनातला आहे. मधुमेही लोकांनी कोणता आहार घ्यावा? (Blood Sugar Health) जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह होतो तेव्हा त्याने काय खावे व काय खाऊ नये याची सर्वात काळजी असते.

आपल्यापैकी बर्‍याचजणांना माहित नसेल की, भारत आधीच जगाच्या मधुमेहाची राजधानी बनलेला आहे. 2017 च्या अहवालानुसार (Diabetes Diagnosis Tests) भारत दोन दशलक्षाहूनही जास्त मधुमेहींचं घर आहे.

मधुमेही लोकांसाठी आहार

तसं बघायला गेलं तर , “मधुमेह आहार” किंवा डायबिटिस चा आहार असं वेगळं म्हणून काहीही नाही. डायबेटिक किंवा नॉनडिबॅटीक प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी खाण्याची तत्त्व समान असतात. पण हो, जर तुम्ही भारतीय आहात आणि तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल! कारण आपल्या आहाराच्या सवयी आणि खाण्याच्या पद्धती गोड लोकांसारख्या गोड आहेत.

भाता ऐवजी पोळी

मधुमेही लोकांसाठी आहार

आपल्या देशातील बर्‍याच भागात भात, भाकरी आणि तांदळाची पक्वान्न केली जातात. भारत हा एक भातप्रेमी देश आहे! पण जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याची तुमची इच्छा असेल तर भाताच्या ऐवजी गव्हाची पोळी निवडा. भातात पोळी किंवा चपातीपेक्षा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो आणि ह्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वेगाने वाढ होते. मधुमेही लोकांनी आहारात भात थोडासा आठवड्यातून एकदा ते दोनदा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा.

पांढर्‍या तांदळा ऐवजी तपकिरी तांदूळ (Brown Rice)

मधुमेही लोकांसाठी आहार

आता हे केवळ सांगण्यापुरत नाही पूर्वी लोक जसे लाल भात खायचे तसा प्रत्यक्षात खायचा आहे. लाल किंवा तपकिरी तांदळामध्ये कमी GI आणि अधिक फायबर आणि पोषक पदार्थ असतात. तुम्हाला कदाचित ही चव सुरुवातीला आवडत नसेल, परंतु तपकिरी तांदळाच्या दाणेदार भाताची चव नंतर आवडायला लागेल.

पॉलिश डाळीऐवजी अन पॉलिश डाळ :

मधुमेही लोकांसाठी आहार

मधुमेही आहारात, परिष्कृत किंवा पॉलिश केलेल्या धान्यापेक्षा अनपॉलिश गावठी धान्य आणि डाळी निवडा. ते धान्य कमी प्रक्रिया केलेले आणि अधिक पौष्टिक असते. त्या डाळी आपण खाल्लेल्या अन्नाचा GI कमी करण्यासाठी ते पुरेसे तंतू देतात.

आहारात मैद्याचा समावेश टाळा

मधुमेही लोकांसाठी आहार

मैदा अजिबात खाऊ नका. मधुमेही लोकांनी किंवा डायबिटीस असलेल्या लोकांनी आहारात मल्टीग्रेन म्हणजे भरपूर धान्य एकत्र करून दळलेल पीठ वापरा. तुम्ही फक्त सोयाबीन, बाजरी, ज्वारी, चणा एकत्र करून पिठ करा आणि त्यात अंबाडीच्या किंवा चीया सिड घालू शकता. म्हणजे भाकरी पौष्टिक होईल.

स्नॅक्समध्ये फळे आणि शेंगदाणे:

मधुमेही लोकांसाठी आहार

आपण सगळेच गोड चहाला कोण नको म्हणणारे नाही. आणि पाहुण्यांना दिलेला स्वादिष्ट समोसा खाऊन त्याचा आस्वाद आपण घेतोच ! लंच आणि डिनरसारख्या प्रमुख जेवणांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे महत्वाच आहे. स्नॅक्समध्ये समोसा-चटणी विसरा आणि फळे आणि शेंगदाणे समाविष्ट करा.

चविष्ट खा, स्मार्ट व्हा:

मधुमेही लोकांसाठी आहार

बघा सफरचंद, स्ट्रॉबेरी, संत्री, खरबूज अशी लो-कार्ब फळे खाण्यासाठी निवडा. ज्यूस प्या किंवा सलाड करा. आता ह्याचा अर्थ असा नाही की आपण आंबे आणि केळी खाऊ शकत नाही. फक्त आपल्यासाठी मोठ्या आकाराच एक फळ किंवा अगदी लहान आकाराची दोन चार फळं एवढीच मर्यादित करा. मधुमेह आहार म्हणून हे योग्य आहे.

जुनं ते सोनं:

मधुमेही लोकांसाठी आहार

पूर्वीच्या मोहरीच्या तेलात किंवा शुद्ध तुपात स्वयंपाक करण्यासारख्या जुन्या पध्दती पुन्हा सुरू करा. सोयाबीन तेल किंवा रिफाइंड तेल बंद करा. मध्यम प्रमाणात वापरलेलं तूप देखील एक मधुमेही आहारासाठी उत्तम पर्याय आहे. कृपया लक्षात घ्या की ऑलिव्ह ऑईल हा उच्च तापमानात स्वयंपाकासाठी योग्य नाही, कोशिंबीरीमध्ये किंवा इतर साध्या पदार्थांमध्ये घालून खाणे हेच योग्य.

योग्य पेय प्या आणि भरपूर प्या.

मधुमेही लोकांसाठी आहार

पिण्याची आपली व्याख्या बदला! पिण्यासाठी थंड वाळ्याच पाणी, ताक, कांजी, लिंबू पाणी करून ठेवा. मधुमेही व्यक्तीने आहारासोबत हे पथ्य पाळले पाहिजे. कृपया कोल्ड्रिंक्स पिऊ नका.1 कॅन किंवा बाटलीत (350 ml) कोल्डड्रिंक मध्ये 10 चमचे साखर असते. बापरे! कोल्डड्रिंक पिण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे!

मधुमेहींच्या जेवणाची वेळ:

10 10

आपण मधुमेह असलेल्या लोकांसाठी असलेला आहार (Blood Insulin Level Chart) पाहिला . पण हे शेवटच पण महत्वाचं. दररोज ठरलेल्या वेळी जेवण करा! आपल्या शरीराला आपल्या खाण्याच्या पद्धतीची सवय लावा आणि त्यानुसार काम करू द्या! जेवण आणि न्याहरी दरम्यान 2 ते 3 तासांच अंतर ठेवा. हे आपल्याला हायपोक्लेसीमिक (कमी साखर) भाग आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते.

थोडक्यात आपण ह्या लेखातून भारतीय आहार आणि मधुमेह असलेल्या लोकांनी घ्यायचा आहार ह्याची तुलना करून त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी निवडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories