Table of Contents
आताच्या या धकाधकीच्या जीवनात’वजन’ या शब्दाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे आणि बहुतेक लोक त्यांच्या वाढलेल्या वजनाने सतत चिंतित असतात. वजन वाढवणे किंवा कमी करणे हे आपल्या नियंत्रणात असले तरी देखील, ज्यांना जास्त वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एक उत्तम आणि संतुलित आहार ही वजन कमी करण्याच्या यशस्वी प्रवासाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करता, तेव्हा तुमचे शरीर स्थिर राहते आणि त्याचे फायदे तुमच्या त्वचेला आणि केसांना होतात. आहाराव्यतिरिक्त, आपण आपल्या रोजच्या रूटीन मधे व्यायाम आणि योगाचा समावेश करू शकता. आज आपण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार कसा असावा याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
जेवणाच्या वेळेचे महत्त्व
बर्याच व्यक्ती अत्यंत बिझी जीवन जगतात, ज्यामुळे त्यांचे जेवणाचे वेळापत्रक चुकीचे झालेले असते. दररोज चार वेळेस आहार घेणे महत्वाचे आहे: नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण. या वेळापत्रकाचे पालन केल्याने पचन सुरळीत होण्यास मदत होते आणि तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळतात.
यापैकी कोणताही एक आहार चुकवल्यास तुमचे वजन आणि एकूण आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. जेवणाच्या अनियमित वेळेमुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया विस्कळीत होऊ शकते आणि नको असलेले वजन अधिकच वाढू शकते. त्यामुळे, तुम्ही जेवढे खात आहात ते महत्त्वाचे असले तरी तुमच्या जेवणाची वेळही तितकीच महत्त्वाची आहे.
उपाशी राहणे हा उपाय नाही
काही लोक वजन कमी करण्याच्या नादात उपाशी राहतात. मात्र सतत उपवास करणे, मग ते अगदी एका दिवसासाठी असेल तरीही हा काही वजन कमी करण्याचा उपाय नाही. उपवासाचा वापर सामान्यतः शरीराला डिटॉक्स करण्यासाठी केला जातो आणि त्यात सामान्यतः काही प्रकारचे पदार्थ खाणे असते. फक्त पाणी पिऊन उपवास केल्याने आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांपासून दूर ठेवल्याने वजन वाढू शकते.
सतत गोड पदार्थाचे सेवन करणे
वेळोवेळी गोड पदार्थ खाणे अगदी योग्य आहे, परंतु सतत मिठाईचे सेवन केल्याने शरीरातील चरबी वाढते आणि परिणामी वजन वाढते. मिठाई खाण्याची सवय शरीरातील चरबीची पातळी सतत वाढवते, जी बहुतेक लोकांसाठी चांगली नसते. म्हणून, गोड खाण्याच्या बाबतीत थोडा संयम राखणे आवश्यक आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिठाईचे सेवन केल्याने वजन वाढणार नाही.
सततची बैठी जीवनशैली
आता सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेकदा तासनतास बसणे आणि काम करणे समाविष्ट असते, विशेषत: जे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर काम करतात त्यांच्यामध्ये असे दिसून येते. दीर्घकाळ बसणे आणि शारीरिक हालचाली न करणे यामुळे वजन वाढू शकते. बैठी कामामुळे पाय सुन्न होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि वजन वाढणे या समस्या अनेक लोकांवर, विशेषत: तरुण पिढीवर परिणाम करतात.
हार्मोनल बदल
हार्मोनल बदल हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे, ज्याचा परिणाम स्त्री आणि पुरुष दोघांवर ही होत असतो. स्त्रियांना अधिक लक्षणीय हार्मोनल बदलांचा अनुभव येतो, विशेषत: लग्नासारख्या गोष्टींनंतर. गर्भधारणेशी संबंधित हार्मोनल बदलांमुळे देखील वजन वाढू शकते. हार्मोनल पातळीत होणारे बदल शरीराच्या वजनात बदल होण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि अनेक स्त्रियांना लग्नानंतर वजन वाढण्याची समस्या जाणवते.
वजन कमी करण्यासाठी आहारात काय समाविष्ट करावे?
वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारातील काही आवश्यक निवडी लक्षात घेणे आवश्यक आहे. खाली दिलेले काही घटक वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या आहाराचा भाग असले पाहिजेत.
- प्रथिने: एकंदर आरोग्यासाठी आवश्यक प्रथिने हे मासे, चिकन, अंडी, पनीर आणि कडधान्ये यासारख्या पदार्थांमधून मिळू शकतात.
- कार्बोहायड्रेट: कार्बोहायड्रेटस् शरीराला ऊर्जा देतात आणि योग्य प्रमाणात त्यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. पिष्टमय पदार्थ हे कार्बोहायड्रेट्सचे स्रोत आहेत. जरी ते वजन वाढण्यास कारणीभूत ठरत असतील तरी देखील योग्य प्रमाणात त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.
- फॅट्स: सर्वच फॅट्स हानिकारक नसतात; शरीराला योग्य कार्यासाठी चांगल्या फॅट्स ची आवश्यकता असते. तुम्ही मासे, तूप आणि सुका मेवा यासारख्या स्रोतांमधून चांगले फॅट्स मिळवू शकता.
- जीवनसत्त्वे: फळे, भाज्या, अंडी आणि चिकन हे अ, ब, क, डी आणि ई सह आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्कृष्ट स्रोत असल्याचं सिद्ध झालं आहे.
- खनिज: संतुलित आहारामध्ये खनिजांचा समावेश असावा, जे चिकन, अंडी, मासे, भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमधून तुम्हाला मिळू शकतात.
- फायबर: उत्तम आरोग्य राखण्यासाठी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा. तुम्ही हे फायबर कडधान्ये, धान्ये आणि भाज्यांमधून मिळवू शकता.
आपल्या आहारात या घटकांचा समावेश करून, आपण नक्कीच वजन कमी करू शकता. त्याच बरोबर आपल्या रोजच्या आहरचा रेसिपीमध्ये तेल आणि मीठ यांचे प्रमाण नियंत्रित करणे महत्वाचे आहे, कारण या गोष्टींच्या अतिवापरामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा येऊ शकतो. तुम्ही अधूनमधून एखादा चिट दिवस म्हणून ठेऊ शक्य आणि नेहमीचा आहार सोडून काही वेगळे पदार्थ खाऊ शकता. बाकी या पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही नक्कीच तुमचे वजन कमी करू शकता.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार तर आवश्यक आहेच. पण अधिक सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली देखील आवश्यक आहेत. उत्तम आणि योग्य आहरासोबतच केला गेलेला व्यायाम झटपट वजन कमी करण्यात प्रभावी ठरू शकतो.
वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता :
डाएट | सोमवार | मंगळवार | बुधवार | गुरुवार | शुक्रवार | शनिवार |
सकाळचा नाश्ता (सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान) | कोमट पाणी सोबत लिंबू भिजवलेले 5 बदाम मुगाचे 2 मुगलेट्स आणि एक वाटी दही | कोमट पाणी सोबत भिजवलेले मेथी दाणे भिजवलेले 2 अक्रोड 2 थालिपीठ आणि पुदिना चटणी | कोमट पाणी आणि ॲलोवेरा ज्यूस 5 भिजवलेले मनुके 1 वाटी पोहे 1 उकडलेले अंडे | कोमट पाणी , आवळा ज्यूस 5 भिजवलेले बदाम 1 वाटी ओट्स उपमा 1 उकडलेले अंडे | कोमट पाणी आणि लिंबू 2 भिजवलेले अक्रोड 2 इडली सांबार | कोमट पाणी व भिजवलेले मेथी दाणे भिजवलेले मनुके- 5 बेसन चिला -2 आणि एक वाटी दही |
सकाळचा स्नॅक ( 10 ते 10.30 दरम्यान) | नारळ पाणी | मिक्स ड्रायफ्रुट (2-2) | 1 चमचा फ्लेक्स सीड | 1 सफरचंद | 1 चमचा फ्लेक्स सीड | नारळ पाणी |
दुपारचे जेवण ( दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत) | काकडी, गाजर 2 चपाती सोबत कोणतीही सुकी किंवा रस भाजी ताक 1 ग्लास | ज्वारीची 1 भाकरी कोणतही भाजी मसाला ताक 1 ग्लास | 1 वाटी दही 2 चपाती सोबतच कोणतही आवडीची भाजी | अंडाकरी आणि 2 चपाती भात 1 वाटी | रायता नाचणीची भाकरी 1 आणि कोणतही भाजी | काकडी, गाजर चपाती 2 आणि कोणतही सुकी/रस भाजी 1 ग्लास ताक |
संध्याकाळचा नाश्ता ( संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत) | ग्रीन टी सोबतच एक वाटी चणे | सफरचंद | 2 खजूर आणि 1 पेर | ताक आणि त्या सोबत प्लेन पॉपकॉर्न | खाकरा आणि त्या सोबत फ्लेक्स सीड्स | शेंगदाणे 1 वाटी |
रात्रीचे जेवण (7 ते 9 वाजेपर्यंत) | चिकन सूप, चिकन फ्राय | एक मोठा बाऊल सलाद (काकडी, टोमॅटो, बटाटा) | चिकन रोस्ट – 1 चिकन ब्रेस्ट | सॅलेड -उकडलेल्या चण्याचे | सलाद (काकडी, टोमॅटो, बटाटा) | डाळ, ज्वारीची भाकरी |
This article was very helpful ! Well written and easy to understand !
this is good tips thanks sir