चिकन, मांस, अंडी, दूध, तूप घ्यायला पैसे नसतील तर हा शक्तिशाली पदार्थ तेवढाच प्रोटीनयुक्त पौष्टीक आहे आणि स्वस्त आहे.

अशक्तपणा घालवायचा असेल आणि कायम तंदुरूस्त राहायचं असेल तर दूध, तूप, मांस, अंडी, मासे ह्याशिवाय पर्यायच नाही का? हे सगळं खूप महाग आहे मग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक पौष्टिकता कुठून मिळेल? तर शेंगदाणे खा ना!शेंगदाण्यामध्ये असतात मासे, चिकन आणि अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन्स, व्हिटॅमिन ह्यासारखे पौष्टीक घटक.

जर एखाद्या व्यक्तीला त्याचं शरीर बळकट तयार करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल तर आधी मांस, मासे आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण घरोघरी सहज मिळणारे शेंगदाणे इतके शक्तिवर्धक आणि पोषक तत्वांनी भरलेले असतात की याला आरोग्याचा खजिना म्‍हणतात. 

शेंगदाण्यामध्ये आपल्या शरीराला गरजेची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर घटक असतात. वजन वाढवण्यासाठी आणि शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी शेंगदाणे खायला सांगितले जातात. तुम्ही पौष्टीक शेंगदाणे खायचा विचार करत असाल तर आधी ते का पौष्टीक आहेत ते सुध्दा समजून घ्या.

शेंगदाणे आहेत प्रोटीन्स ने भरलेले.. अंडी, मांस एवढेच पौष्टीक

शेंगदाण्यामध्ये मांसापेक्षा 2.3 पट जास्त, अंड्यांपेक्षा 2.5 पट आणि फळांपेक्षा 7 पट जास्त प्रथिने/ प्रोटीन्स असतात. 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे खाणे हे एक लिटर दूध पिण्यासारखे आहे. शेंगदाणे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि आपली पचनक्रियाही चांगली राहते.

- Advertisement -

250 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला 250 ग्रॅम चिकन खाल्ल्याने मिळणारी खनिजे आणि जीवनसत्त्व मिळतात. शेंगदाण्यामध्ये पोषक, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शेंगदाणे आपल्या वाईट कोलेस्टेरॉलचे चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर करतात.

शेंगदाण्यात जितकी प्रथिने आणि ऊर्जा असते तितकी अंड्यांमध्येही नसते. शेंगदाण्यामध्ये मिळणारे प्रोटीन्स दुधाइतकेच आणि तुपातून मिळणारी पौष्टिकतासुध्दा आपल्याला देतात.

दूध, तूप आणि बदाम यांची कमतरता एकट्या शेंगदाणाने भरून काढा

दूध घ्यायला, तूप खायला, काजू बदाम आणायला पैसे नाहीत तर हरकत नाही शेंगदाणे खूप पौष्टीक आहेत म्हणूनच शेंगदाण्याला गरीबांचे बदाम म्हणतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि फुफ्फुसांना ताकद मिळते.

जेवल्यानंतर शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अशक्त व्यक्ती निरोगी राहते. श्‍वसनाच्या रुग्णांसाठीही शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. शेंगदाणे उष्ण आहेत त्यामुळे ज्या लोकांना उष्ण पदार्थ खाण्याचा त्रास होतो त्यांनी शेंगदाणे कमी खावेत.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories