ग्रीन टीचा जास्त वापर ठरू शकतो धोकादायक, तुम्हीही करता का ग्रीन टी चे सेवन? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम !

आपल्याला माहीतच आहे की ग्रीन टी हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे, अगदी वजन कमी करण्यापासून ते चमकदार त्वचेसाठी देखील ते फायदेशीर आहे.  यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट हृदय आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. डाएट प्रेमींसाठी ग्रीन टी हे अतिशय आवडीचे पेय आहे.

पण ग्रीन टीचा शरीराला जितका फायदा होतो तितकाच त्वचेसाठीही फायदा होतो हे खरे आहे का? तर याचे उत्तर होय आहे, ग्रीन टी चेहऱ्यासाठी देखील खूप चांगल आहे, म्हणून बाजारात अनेक कॉस्मेटिक उत्पादने आहेत जी ग्रीन टीचा अर्क असल्याचा दावा करत असतात.

मिळालेल्या माहितीनुसार ग्रीन टी अर्क किंवा EGCG, त्वचेवर लावल्यावर त्यात अँटीऑक्सिडंट, अतिनील किरण संरक्षण, वृद्धत्वविरोधी, दाहक-विरोधी आणि इम्युनोमोड्युलेटरी प्रभाव हे गुणधर्म असतात. हे जखमा भरणे आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी कार्य करते आणि यामुळे चेहऱ्यावरील सूजही दूर होते तसेच सुरकुत्या येणेही थांबतात.

त्वचेसाठी ग्रीन टीचे फायदे-

ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगला आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. विशेषत: कॅटेचिन, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यात आणि त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

मुरुमांसाठी चांगला उपाय-

ब्लॅक हेड्स आणि मुरुमांसाठी ग्रीन टी खूप चांगला आहे. ते प्यायल्याने किंवा लावल्याने त्वचेवरील लाल पुरळ तसेच एक्जिमा कमी होतो.

UV संरक्षण-

ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल असतात जे त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतात. सनस्क्रीन लावूनही हे टाळता येते.

काय करू नये:

  • ग्रीन टीचा जास्त वापर करू नका
  • जास्त प्रमाणात ग्रीन टी वापरल्याने त्वचेत कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.
  • जर तुम्हाला कॅफिनची ऍलर्जी असेल तर ग्रीन टी पिऊ नका.
  • तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ग्रीन टीवर अवलंबून राहू नका.
  • जर तुम्ही दिवसातून 2-3 कपपेक्षा जास्त प्यायले तर तुम्हाला मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
  • जास्त प्रमाणात ग्रीन टीमुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
  • जास्त प्रमाणात ग्रीन टी तुमच्या झोपेच्या पद्धतीमध्ये अडथळा आणतो.
  • जास्त ग्रीन टी पिल्याने उलट्या आणि मळमळ देखील होऊ शकते.

रक्तदाब कमी होऊ शकतो. ग्रीन टी खूप फायदेशीर आहे पण त्याची काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.  त्यामुळे ते जास्त न पिण्याचा प्रयत्न करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories