पपई खाण्याचे आहेत हे 10 फायदे !

Advertisements

पपई खाण्याचे फायदे – आज कालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीरावर कसलेच लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होतात. आपला आहार नीट नसल्याने आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

कारण आजकाल सगळे हायब्रीड चालू आहे. पहिल्या काळात जसे आपल्याला देशी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात न्हवती असे पीक खायला भेटायचे पण आज शेतीत सुद्धा वेगळ्या प्रकारची फवारण्या करून कोणतेही जे पीक घेतले जाते ते औषधांचा मारा करूनच पिकवले जाते. त्यामुळे सुद्धा आपले आरोग्य बिघडले आहे. तुम्हाला सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या आहारात जर वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश करत असाल तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे जसे की सफरचंद.

पपई खाण्याचे फायदे

पपई खाण्याचे फायदे

सफरचंद खाल्ल्याने तुम्ही कसलेच आजारी पडू शकत नाही कारण सफरचंद हा आपला एक डॉक्टर आहे जे की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जर आपल्याला ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर सफरचंद कधीही शरीरासाठी चांगले असते.

रोज तुम्ही आहारात सफरचंदाचा समावेश केला तर तुमचे शरीर निरोगी राहू शकते, तुमच्या आहारात फळांचा समावेश असणे खूप महत्वाचे आहे मग ते कोणत्याही प्रकारचे असो. कारण प्रत्येक फळांचा आपल्या शरीराला काही न काही फायदा असतोच. मग त्यामध्ये पेरू असो किंवा सफरचंद असो आणि अत्ता उन्हाळा चालू आहे म्हणल्यावर फळांचा राजा आंबा तर आपल्याला सगळीकडे दिसतोयच.

तसेच कलिंगड या कलिंगड फळाचे आपल्याला खूप फायदे आहेत ते म्हणजे की आपल्या शरीरात जर पाण्याची क्षमता कमी असेल तर कलिंगड खाल्याने तुमच्या शरीरातील जरी पाणी कमी झाले असेल तर त्याची कमी भरून काढते. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही उन्हाळ्यात कलिंगड खावा.

पपई खाण्याचे फायदे

कलिंगड हे फळ सुद्धा थंड आहे त्यामुळे शरीर उष्ण पडण्याचा विषयच येत नाही. आज आपण अशाच एका फळाविषयी बघणार आहोत ज्याचे फायदे आपल्या शरीराला खूप म्हणजे खूप आहेत, जरी हे फळ उष्ण असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त या फळाचा समावेश तुमच्या आहारात करा, चला तर पाहू मग नक्की या फळाचे उपयोग काय आहेत.

पपई हे फळ गरम तर खूप असते, पण बाहेर जर थंड वातावरण असेल तर तुम्ही नक्की हे फळ खात जावा. पपई चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट असते तसेच शरीराला पोषक असते आपल्या शरीराला जे घटक पाहिजेत ज्यांची घटकांची गरज आपल्या शरीराला आहे ते पपई मधून आपल्याला भेटतात. तसेच आजकाल प्रत्येकाची तक्रार आपल्या स्किन बाबत येत आहे की माझी स्किन लूज पडली आहे किंवा चेहरा असा टवटवीत दिसत नाही त्यांच्यासाठी तर हे फळ खूप फायदेशीर आहे. तर चला पाहू आज पपई खाण्याचे आपल्याला शरीराला होणारे दहा फायदे…

शरीरातील कॅलेस्ट्रोल:

पपई खाण्याचे फायदे

आपल्या शरीरात कॅलेस्ट्रोल चे प्रमाण आपल्या आहारात आपण जे मसालेदार पदार्थांचा समावेश करतो तसेच जास्तीत जास्त तेलकट खातो त्यामुळे कॅलेस्ट्रोल खूप प्रमाणात वाढते आणि कॅलेस्ट्रोल वाढल्याने आपली चरबी सुद्धा खूप वाढते. ते कॅलेस्ट्रोल आपल्या रक्तात साचलेले असते त्यामुळे तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो पण जे तुम्ही आहारात जर पपई चा समावेश करत असाल तर तुम्ही नक्की या कॅलेस्ट्रोल पासून वाचू शकता कारण पपई मध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच यामध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा अधिक असते त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये जेवढे कॅलेस्ट्रोल वाढले आहे ते पूर्णपणे कमी आणण्याचे काम पपई करत असते, आणि त्यामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करू शकता.

वजन कमी करणे:

पपई खाण्याचे फायदे

आपण आपल्या आजूबाजूला अशी खूप व्यक्ती बघत असतो जे की त्यांचे वजन एवढे वाढलेले असते की त्यांना नंतर चालण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येत असतो, कारण आपल्या आहारातील मसालेदार पदार्थ तसेच तेलकट पदार्थ आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर एक पपई तुम्हाला पुरेशी आहे जे की जास्त मोठी पण नको आणि आणि छोटी सुद्धा नको एक मध्यम प्रकारची पपई घ्या कारण त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण असते, त्यामध्ये एक घटक असतो त्याचे नाव डायतटरी फायबर्स. तुम्हाला कोणत्याही वेळी भूक लागते आणि आपण वेळेचे नियोजन न करता अन्न खाल्याने आपले वजन वाढते पण तुम्ही जर पपई खाली तर तुमच्या भुकेवर नियंत्रण राहू शकते.

आजाराशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे:

पपई खाण्याचे फायदे

आपण आजारी पडतो ज्यामुळे की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असते पण तुम्ही पपई जर खाली तर तुम्ही आजारी पडू शकत नाही तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते कारण पपई मध्ये व्हिटॅमिन चे प्रमाण खूप असते.

डायबीटीस साठी अधिक लाभकारी:

पपई खाण्याचे फायदे

तुम्हाला असे वाटेल की डायबीटीस साठी साखर म्हणजेच गोड पदार्थ कसलाच चालत नाही पण पपई जरी गोड असली तरी डायबीटीस साठी चांगली आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकत नाही. एकवेळ तुम्हाला डायबीटीस होण्यापासून बचाव होऊ शकतो.

डोळ्यांची दृष्टी सुधारणे:

पपई खाण्याचे फायदे

डोळ्यांची दृष्टी चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ए ची गरज असते आणि ते व्हिटॅमिन पपई मध्ये भेटते त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते.

Advertisements

सांधेदुखी पासून बचाव होणे:

पपई खाण्याचे फायदे

पपई मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमचे सांधे जरी दुखत असतील तरीही ते राहू शकतात तसेच सांध्यावर सूज असेल तरीही ती कमी होऊ शकते त्यामुळे ज्यांचे सांधे दुखत आहेत त्यांच्यासाठी पपई खूप लाभदायक आहे.

अपचन होत नाही:

पपई खाण्याचे फायदे

आजकाल आपण घाई घाईत कोणत्याही प्रकारचे अन्न खात असतो त्यामुळे आपल्या शरीराची पचन क्षमता बिघडते, पण तुम्ही जर पपई खाली तर तुमची पचन क्षमता चांगली राहू शकते. कारण पपई मध्ये पपैन या नावाचा एनजायम असतो तो पचनशक्तीला चांगले बनवतो.

मासिक पाळी मध्ये फायदेशीर :

पपई खाण्याचे फायदे

कधी कधी तारखेच्या आधीच मासिक पाळी येते किंवा महिलांना मासिक पाळीमध्ये पोटात दुखणे तसेच अस्वथ वाटणे. जर तुम्ही पपई चे सेवन केले तर तुम्ही या त्रासापासून दूर राहू शकता.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

कर्करोगापासून बचाव:

पपई खाण्याचे फायदे

आजकाल आपण पाहत आहोत की भरपूर लोक अशी आहेत की ते कर्करोग या रोगांशी लढत आहेत, ज्यामध्ये मग विविध प्रकारचे कर्करोग आहेत जसे की तोंडाचा कर्करोग नंतर रक्ताचा कर्करोग. हे कर्करोग आपल्या काही चुकांमुळे होत असतो तर काही वेळेस हे अनुवंशिकता असते जे की काही लोकांमध्ये हे कर्करोग आधीच्या पीडिपासूनच येत असतात, यामध्ये काही लोकांचा प्राण सुद्धा जातो तर काही लोक यामधून वाचतात. पण तुम्हाला जर कर्क रोगापासून सुटका करायची असेल किंवा आधीच आपल्याला सावधान राहायचं असेल तर तुम्ही नक्कीच पपई खाली पाहिजे कारण पपई मध्ये ऍन्टीऑक्‍सिडंट असतात त्यामुळे तुमच्या शरीरात, रक्तात जे हानिकारक घटक असतात त्या घटकांपासून तुमचा बचाव होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आहारात पपई खाली पाहिजे.

Marathi News

ताणतणाव पासून सुटका:

पपई खाण्याचे फायदे

आजकाल आपल्यावर कोणत्याही प्रकारचे ताण येत असतात, कोणत्याही प्रकारचे टेन्शन आपल्याला येत असते आणि टेन्शन घेतल्यामुळे आपल्याला रक्तदाबाचा त्रास चालू होतो, त्यामुळे तुम्ही पपई खाली तर तुम्हाला जो ताणतणाव आला आहे किंवा दिवसभर काम करून थकवा आला आहे तो कमी होतो. पूर्ण आखी पपई न खाता फक्त पपई चा एक काप किंवा दोन जरी काप आपल्या रोजच्या आहारात असले तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताणतणाव येऊ शकत नाही.

अशा प्रकारचे आपल्या शरीराला पपई खाण्याचे खूप फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात पपई खाली पाहिजे.

हे हि वाचा :

हे आहेत सर्वात आरोग्यदायी फळे आणि पदार्थ

अपचन म्हणजे काय? अपचन करणे आणि उपाय

अशा प्रकारे घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी कधीच होणार नाहीत पिंपल्स 

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories