सध्या प्रसिद्ध असलेला केटो डाएट काय आहे? काय आहेत केटो डाएटचे फायदे आणि तोटे.

केटो डाएट हा कमी कार्बोहायड्रेट असलेल्या आहारासाठी ओळखला जातो. ह्यात भाकरी, भात ह्यातून मिळणारी कार्बोहायड्रेट घेणं थांबवलं जातं. केटो डाएट घेऊन त्यातून यकृतामध्ये केटोन्स तयार होतात. ज्याचा उपयोग शरीरात उर्जा म्हणून केला जातो. केटो डाएटलाच लो बर्न किंवा उच्च चरबीयुक्त डायट म्हणून सुध्दा ओळखतात.

जर एखादी व्यक्ती कार्बोहायड्रेट युक्त असा भात भाकरीचा आहार/ डाएट घेत असेल तर शरीर ग्लूकोज आणि इन्सुलिन तयार करण्यास सुरवात करते. शरीर ग्लूकोजला उर्जेमध्ये रूपांतरित करते. उर्जा स्त्रोतांपेक्षा आपण ग्लूकोज निवडतो. मग इन्सुलिन रक्ताद्वारे शरीरात ग्लूकोजच्या वाहतुकीचे कार्य करते.

पण केटो डाएट मध्ये आपल्या आहारात कार्बोहायड्रेट् कमी प्रमाणात सेवन केल्याने शरीरात केटोसिस तयार होतात. केटोसिस ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी जरी अन्नाचे प्रमाण कमी असेल तरीही मानवाला जिवंत ठेवायला मदत करते. ह्यात शरीर केटोन्स तयार करते. जे लिव्हर मधली चरबी जाळून तयार होते.

केटो डाएटचा मुख्य हेतू शरीराला केटोसिस प्रक्रियेमध्ये आणणे आहे. ज्यात कार्बोहायड्रेटस् फक्त कमीतकमी घ्यावे लागतात.

केटो डाएटमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ

केटो डाएट
 • मासे आणि समुद्रातील प्राणी
 • कार्बोहायड्रेट्सच प्रमाण कमी असलेल्या भाज्या

केटो डाएट मध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थ आणि भाज्यांची यादी:

केटो डाएट
 • शतावरी
 • एवोकॅडो
 • ब्रोकोली
 • कोबी
 • फुलकोबी
 • काकडी
 • हिरव्या शेंगा
 • वांगं
 • कराळे
 • कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्यूस
 • जैतून
 • मिरेपूड (विशेषतः हिरवी)
 • पालक
 • टोमॅटो
 • झुनीच
 • चीझ
 • अंडी, कोंबडी
 • खोबरेल तेल
 • ऑलिव्ह तेल
 • सुकामेवा
 • डार्क चॉकलेट आणि कोको

केटो डाएटचे फायदे काय आहेत?

वजन कमी

केटो डाएट

केटो डाएट घेतल्याने शरीरात उर्जा वाढते. हा डायट वजन कमी करण्यास देखील मदत करतो. हा डायट घेतल्यास शरीराची चरबी कमी होते. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी खूप कमी होते. केटो डायट रक्तातील साखरेची पातळी कमी करतो. टाइप 2 मधुमेहासाठी हे अधिक फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.

मेंदूची एकाग्रता वाढते

केटो डाएट

केटो डायट घेतल्यास मेंदूची एकाग्रता वाढते. कारण केटो डायट हा मेंदूच्या उर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे. कारण कार्बोहायड्रेटस् कमी प्रमाणात घेतले जातात. रक्तातील साखर वाढवणारा भात आणि भाकरी टाळली जाते. अनेक हुशार संशोधक लोक केटो डायट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहेत.

मुरुम काढून टाकण्यासाठी:

केटो डाएट

केटो डायट घेतल्यास त्वचा आपोआप सुधारू लागते. ज्यामुळे मुरुमांचा त्रास होत नाही. (वाचा : मुरुमांवर घरगुती उपाय )

कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते

केटो डाएट

केटो डायट कोलेस्टेरॉल चांगलं वाढविण्यात मदत करतो. जे रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे. कारण कार्बोहायड्रेट्सचे कमी प्रमाण खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते.

मधुमेहावर/डायबिटिस वर नियंत्रण

केटो डाएट

जर योग्यरित्या साखर नियंत्रित केली नाही तर रोजचा आहार घेऊन कुणालाही टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. अशा वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनात असे सांगितले आहे की केटो डायट कमी कार्बोहायड्रेट आणि केटोजेनिक मुळे, इंसुलिनची पातळी कमी करायला आणि त्याचा स्तर चांगला राखण्यास मदत करतो

केटो डायटचे तोटे काय आहेत?

केटो डाएट

केटो डाएटच्या फायद्यांसह काही तोटे देखील आहेत.

केटो डाएटचा दुष्परिणाम असा आहे की शरीराला फायबर आणि पोषक द्रव्ये मिळत नाहीत. कार्बोहायड्रेट देखील कमी घेतले जातात. याचा पाचन तंत्रावर खोलवर परिणाम होतो. यामुळे त्या व्यक्तीस पचन संबंधित समस्येची तक्रार होऊ शकते अर्थात बद्धकोष्ठता होऊ शकते.

यामुळे आपल्याला शरीराच्या स्नायूंमध्ये ताठरपणा, ताण आणि थकवा ह्यासारख्या समस्या येऊ शकतात. मुख्यत: इलेक्ट्रोलाइट्समध्ये अडथळा येतो आणि कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवू शकते.
.
तुम्हाला ह्या केटो डायटची सवय नसली तर त्यामुळे शरीरात सुस्तपणा आणि थकवा जाणवतो. पण सतत घेतल्याने ही सवय नाहीशी होते.

ह्या लोकांनी केटो डायट घेऊ नये.

केटो डाएट

थायरॉईड, यकृत संबंधित समस्या, किडनी चा आजार आणि बद्धकोष्ठता समस्या इ. हा केटो डायट त्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories