मखाणा खा असा नव्या चविष्ट पद्धतीने! उन्हाळ्यात मखाणा रायतं खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहील आणि शरीराला थंडावाही मिळतो. डायबिटीस, हार्ट पेशन्टसाठी फायदेशीर.

मखाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मखाणा अनेक प्रकारे खाऊ शकता आणि तुपात भाजूनही खाऊ शकता. याशिवाय मखाणा रायतंही उन्हाळ्यासाठी खूप पौष्टिक आहे. ह्या मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच मखाणा ग्लुटेन फ्री आहे. तुम्ही आमच्या अनेक लेखातून वाचलं असेलच की मखाणा खाऊन कोलेस्ट्रॉल, फॅट आणि सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहते. 

याशिवाय त्यात जीवनसत्त्वे, फॉस्फरस आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. अशा पौष्टिक मखाणे वापरुन रायतं बनवायला खूप सोपं आहे. मखाणा रायतं उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेट ठेवते आणि शरीर तंदुरुस्त ठेवते. चला, हे पौष्टिक रायतं खाण्याचे फायदे आणि त्याची रेसिपी सुद्धा पाहूया

उन्हाळ्यात मखाणा रायतं खाण्याचे फायदे

1. हाडं मजबूत ठेवा

3 150

मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, जे हाडांना बळकटी देण्याचे काम करते. यामुळे हाडांची दुखणी आणि सांधेदुखीची समस्याही दूर होऊ शकते. जेवताना मखाणा रायतं खाऊ शकता. तुमचं वजन वाढत असेल तर वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

2. गरोदरपणात फायदेशीर

4 152

गरोदरपणात मखाणा खाणे स्त्री आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर आहे. मखाणा रायतं खाल्ल्याने गरोदर महिलांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. हे खाऊन शारीरिक कमजोरी आणि थकवाही दूर होतो.

3. रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रित

5 149

मखाणा रायतं खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. डायबीटीसच्या रूग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे.

4. हृदयासाठी फायदेशीर मखाणे

6 139

आपण नेहमी हृदयाच्या आरोग्याची चिंता करत असतो. हृदयासाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या मखाणा रायत्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये मखाणा रायतं खूप फायदेशीर आहे. यासोबतच कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

5. पचनसंस्थेसाठी फायदेशीर

7 119

मखाणा रायतं खाल्ल्याने पचनक्रियाही बरोबर राहते. हे अन्न सहज पचते आणि अपचनाच्या समस्येपासून दूर राहते. याशिवाय गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

मखाणा रायतं बनवण्याची रेसीपी

8 81

मखाणा रायतं बनवण्यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात मखाणा टाका आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. याशिवाय एका भांड्यात हिरवी मिरची, काळी मिरी, धणे, टोमॅटो आणि पुदिना वापरू शकता. आता मखाणा आणि या सर्व गोष्टी एकत्र करून बारीक रायतं तयार करा. तुम्ही ते जेवणासोबत खाऊ शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories