भारतीय घरांमध्ये शेंगदाणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. शेंगदाणे खाण्यास चवदार तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. प्रथिने, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, फोलेट, पॉलिफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक शेंगदाण्यात आढळतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. लोकांना शेंगदाणे अनेक प्रकारे खायला आवडते. अनेकजण शेंगदाणे सोलून खातात. तर, काही लोक शेंगदाणे भाजणे किंवा तळणे पसंत करतात.
पण, जर तुम्ही शेंगदाण्याला मोड आणले आणि ते खाल्ले तर तुम्हाला आणखी फायदे होतील. असं मानलं जातं की शेंगदाणे अंकुरित करून ते खाल्ल्याने त्याचे गुणधर्म अनेक पटींनी वाढतात.
मोड आलेले शेंगदाणे खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होतो. चला तर मग जाणून घेऊया अंकुरलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे काय आहेत.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मोड आलेले शेंगदाणे खाऊ शकता. मोड आलेले शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कारण अंकुरलेल्या शेंगदाण्यात भरपूर फायबर असतं, ज्यामुळे आपला मेटाबोलिझम वाढतो. यात प्रोटीन्स देखील भरपूर असतात, ज्यामुळे भूक कमी व्हायला मदत होते.
अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं. अशा परिस्थितीत, आपण जास्त खाण्यापासून वाचतो, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते
मोड आलेले शेंगदाणे डायबिटिस च्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. सकाळी अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. मोड आलेल्या शेंगदाण्यात मॅग्नेशियम असतं. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर
अंकुरलेले शेंगदाणे खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंकुरलेल्या शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे योग्य रक्ताभिसरण करण्यास मदत करते. अंकुरलेल्या शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे हृदय निरोगी ठेवतात. अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित राहते.
पचनासाठी फायदेशीर
अंकुरलेले शेंगदाणे पचनासाठीही फायदेशीर असतात. रोज अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होतात. वास्तविक, अंकुरलेल्या शेंगदाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असते, जे आतड्याची हालचाल सुधारते. यामुळे मल जाणे सोपे होते आणि पोट व्यवस्थित साफ होते.
हाडं आणि सांधेदुखीपासून आराम
जर तुम्हाला हाडं आणि सांधे दुखत असतील तर तुम्ही अंकुरलेले शेंगदाणे खाऊ शकता. मोड आलेल्या शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. रोज अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने सांधेदुखीत खूप आराम मिळतो.
अंकुरलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हाडे मजबूत होतात. रोज अंकुरलेले शेंगदाणे खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. पण, जर तुम्हाला शेंगदाणे खाण्याची ॲलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खा.