वजन कमी करताना ग्रीन टी आवडत नसेल तर नेटल टी आहे ना! नेटल टी विषयी सविस्तर वाचा.

तुम्ही चहाचे अनेक प्रकार ऐकले असतील, पण नेटल टी विषयी कधी ऐकलं आहे का? चला तर मग जाणून घेऊया नेटल टी म्हणजे काय आणि वजन कमी करण्यात त्याचा कसा फायदा होतो.

जर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ग्रीन टी पिऊन कंटाळला असाल, तर आता ग्रीन टी चा पर्याय म्हणून नेटल टी पिऊन बघा. नेटल टी आरोग्यवर्धक आहे आणि वजन कमी करण्यासाठी अगदी उपयुक्त आहे.

नेटल टी म्हणजे काय?

नेटल टी नेटल पानांपासून तयार केला जातो आणि हा हर्बल टी चा एक प्रकार आहे. हा टी बाजारात सॅशेच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे, तुम्ही घरी देखील तयार करू शकता. सध्या नेटल टी त्याच्या आरोग्याच्या फायद्यांसाठी खूप लोकप्रिय होत आहे आणि बरेच लोक वजन कमी करण्यासाठी पीत आहेत.

तुम्हाला कुठल्याशा मित्राने मैत्रिणीने किंवा तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पाहून ग्रीन टी फायदेशीर आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घ्यायला सुरुवात केली असेल पण अनेक दिवसांनी सुद्धा ग्रीन टी चा तुमच्या वजनावर काहीही परिणाम होत नसेल. किंवा तुम्हाला ग्रीन टी ची चव आवडत नसेल.

तर तुम्ही आता ग्रीन टी प्यायचं बंद करून नेटल टी प्यायला सुरुवात करा. यासाठी अनेक लोक ग्रीन टी ऐवजी नेटल टी वजन कमी करण्यासाठी पीत आहेत. चला तर मग पाहूया नेटल टी वजन कमी करण्यासाठी इतका फायदेशीर कसा काय?

नेटल टी वजन कमी करण्यात कसा मदत करतो?

अमेरिकेतील काही संशोधनात हे स्पष्ट झाला आहे जर तुम्ही अगदी तेला तुपातील चरबीयुक्त आहार घेत असेल पण जर तुम्ही कोणत्याही स्वरुपात नेटल या वनस्पतीच्या पानांचा सेवन कराल वजन वाढत नाही.

शरीरातील पाणी वाढल्याने वजन वाढतं

शरीरातील पाण्याचे वजन वाढल्याने वजन वाढतं. त्यामुळे जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नेटल टी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. हा चहा तुम्ही प्याल तर तो पाण्याने वजन वाढू देणार नाही.

मीठ खाल तरी वजन वाढणार नाही

जेवणात मीठ जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. जास्त मीठ खाल्ल्याने आपलं पाण्याचं वजन वाढतं. नेटल टी प्यायल्यामुळे शरीरातल्या सोडियमची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे तुमचं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं.

नेटल टी किती औषधी आहे?

नेटल पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढ रोखणारा पदार्थ, अँटीफंगल, अँटीसेप्टिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. शिवाय, त्यात कॅरोटीन आणि लोह तसेच जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि के समृद्ध आहे.

याव्यतिरिक्त, नेटल टी हृदयाचं आरोग्य, आतड्याच आरोग्य, रोग प्रतिकारशक्ती, किडनी, ॲलर्जी, यूटीआय आणि संधिवात वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या बऱ्या करता करता वजन कमी करतो.

ग्रीन टी खरच वजन कमी करतो का ?

आपण या लेखात लिटल विषयी वाचलं पण ग्रीन टी सुद्धा फायदेशीर आहे का? याचा उत्तर सुद्धा हो आहे. वजन कमी करण्यासाठी आपण काय करत नाही, कधी डाएट फॉलो करतो तर कधी व्यायामाचा रूटीन. म्हणून, जर तुम्ही कोणत्याही पोषणतज्ञाला वजन कमी कसे करावे असे विचारले तर प्रत्येकजण तुम्हाला असेच करण्याचा सल्ला देईल, दिवसातून एक किंवा दोनदा ग्रीन टी प्या.

पण वजन कमी करण्यासाठी जरी ग्रीन टी असतो तरीसुद्धा काही लोकांना ग्रीन टी मुळे त्रास होतो किंवा ज्यांना आवडत नाही. असे लोक आपल्या डायट प्लान मध्ये नेटल टी पिऊ शकतात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories