2010 च्या नर्सिज हेल्थ स्टडी च्या अहवालानुसार,अन्य लोकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये संधिरोग होण्याचे प्रमाण खूपच कमी आणि दुर्मिळ सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड चे प्रमाण वाढल्यावर संधिवात आणि संधीरोग या नावाचा आजार आपणास होण्याची शक्यता असते. युरिक ऍसिड हा एक केमिकल चा प्रकार आहे. हे केमिकल आपल्या शरीरात प्युरीन नावाच्या विघटनामुळे तयार होत असते.
मूत्रपिंडातून फिल्टर झाल्यावर युरीक ऍसिड शरीरातून बाहेरून फेकले जाते. परंतु हे युरिक ऍसिड जेव्हा रक्तात मिसळते आणि त्याचे क्रिस्टल हाडांमध्ये जमा होतात तेव्हा आपल्याला संधीरोग आणि संधिवात या सारखे आजार होण्यास सुरुवात होते.
या व्यतिरिक्त उच्च युरिक ऍसिड असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक,ब्रेन स्टोक,किडनी संबंधित चे आजार होण्याची दाट शक्यता असते. युरिक ऍसिड वाढण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आहार सुद्धा आहे. तसेच दैनंदिन जीवनात सुद्धा काही पदार्थाचे सेवन केल्यामुळे सुद्धा युरिक ऍसिड ची पातळी पटापट वाढू लागते.
साल 2010 च्या नर्सिज हेल्थ स्टडी च्या अहवालानुसार,जे लोक जास्त प्रमाणात कॉफी पितात त्या लोकांना संधीरोग होण्याचा धोका कमी असतो तसेच ज्या महिला दिवसातून 3 कप कॉफी पितात त्या महिलांना संधीरोग होण्याचा धोका 22 टक्क्यांपेक्षा कमी असतो.
तसेच जे लोक दिवसातून 4 कप कॉफी पितात त्या लोकांना संधिवात आणि संधीरोग होण्याचा धोका हा 57 टक्क्यांपर्यंत कमी असतो. बऱ्याच तज्ज्ञांच्या मते कॉफी पिल्यामुळे युरिक ऍसिड चा धोका हा कमी प्रमाणात असतो त्यामुळे कॉफी चे सेवन करणे योग्य आहे.
कॉफीत जास्त प्रमाणात एंजाइम असते जे शरीरातील तयार होणाऱ्या प्युरिनचे विघटन करते, कॉफी पिल्यामुळे शरीरात यूरिक ऍसिड तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
तज्ज्ञांचे मते कॉफी तील कॅफिनचे घटक यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यात कोणतीही भूमिका बजावत नाहीत, परंतु त्यात इतर वेगळी संयुगे असल्यामुळे त्याच्या वापरामुळे यूरिक अॅसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
2014 मध्ये झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कॉफी ऐवजी चहा पिल्यामुळे यूरिक ऍसिडच्या व्यवस्थापनाशी कोणताही संबंधित नाही.अश्या परिस्थिती मध्ये यूरिक अॅसिड जास्त असलेल्या रुग्णांनी फक्त कॉफीचे चे करावे.