आपण ऐकलं असेल साखरेपेक्षा गुळ भारी! पण तो कसा? गूळ आपण साखरे आधीपासून वापरत आलेला होतो. गुळाची चव साखरेपेक्षा अप्रतिम असते या बरोबरच असे अनेक फायदे सुद्धा आहेत पण आपण थोडेसे वेगळे फायदा पाहणार आहोत. म्हणूनच घरातल्या पाहुण्याला उन्हातून आल्यावर पाणी देताना वाटी तून गुळाचा खडा किंवा कुणाचा जुनाट खोकला दूर करण्यासाठी आजीकडे आणि आईकडे प्रत्येक समस्येवर एकच औषध होतं ते म्हणजे गूळ.
गुळाने अनेक रोग बरे होतात. झालं झोप येत नसेल तर गुळाचा वापर करून तुमची झोप पूर्ण होऊ शकते कारण आपल्याला चांगला आयुष्य निरोगी आयुष्य मिळतं ते झोप पूर्ण झाल्यावरच. तुम्हालाही रात्री अजिबात झोप न येण्याने त्रास होत असेल, तर दूध गुळामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो. दुधासोबत गूळ खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही दररोज खायला सुरुवात कराल.
गूळ आणि दूध आम्ल निर्मिती नियंत्रित करते

यामध्ये असलेले पोटॅशियम आणि सोडियम शरीरातील ॲसिड लेव्हल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही गूळ नियमितपणे खातात तेव्हा रक्तदाब सामान्य पातळीवर राहतो, ज्यामुळे झोप चांगली येते.
पचनसंस्था सुधारेल

दूध आणि गूळ घेतल्याने तुमची पचनक्रिया उत्तम राहते तसेच पोटात गॅसही तयार होत नाही. जर तुम्हाला हिवाळ्यात पोटदुखीचा त्रास होत असेल तर आरामासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात गुळाचा छोटा तुकडा मिसळून प्या.
गूळ आणि दूध तणाव कमी करेल

दूध हे तणाव घालवणारं एक उत्तम औषध आहे, कारण डॉक्टरांच्या अभ्यासांनी सिद्ध केले आहे की तुमच्या कोमट दुधात गूळ मिसळून प्यायल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळेल आणि तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. शरीरातील तणावाची पातळी देखील कमी होईल आणि गाढ झोप येईल.
दूध आणि गूळ हे रक्त शुद्ध करणारे आणि ऊर्जा वाढवेल

गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होते. दूध आपल्या शरीरातील एनर्जी लेव्हल राखते. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी दुधात गूळ टाकून प्यायल्याने चांगली झोप येते.
मऊ त्वचा आणि निरोगी केस मिळवा

गरम दुधात गुळ घालून प्याल तुमची त्वचा मुलायम होते तसेच त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत. गरम दूध आणि गुळाचे खाल्ल्याने केसही निरोगी राहतील. वाढत्या वयामुळे त्वचेत होणारे बदल दुधात गुळ टाकून प्यायल्यानेही फायदा होतो.
सांधेदुखी कमी होईल

दूध आणि गुळाचे रोज सेवन केल्याने सांधेदुखीत खूप आराम मिळतो. यामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह हे सांधे मजबूत करतात. यासोबतच तुम्ही आल्याचा छोटा तुकडाही खाऊ शकता, ज्यामुळे तुमचे सांधे मजबूत होण्यास मदत होईल.
गुळाच्या दुध हाडं आणि स्नायू बळकट बनवतात

दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात जी हाडं आणि स्नायूंसाठी चांगले असतात. व्यायामानंतर एक ग्लास गुळ दूध प्यायल्यास शरीर निरोगी राहतं. हे स्नायू दुखणे मसल पेन कमी करण्यास देखील मदत करेल कारण ते वर्कआउट दरम्यान झालेली झीज भरून काढेल.