अंड्याचा पिवळा बलक का खायचा, हे सर्वांना सांगा. त्याआधी तुम्ही समजून घ्या किती पौष्टिक आहे हा पिवळा बलक.

अंड्याचा पिवळा बलक स्वतःच प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. जर तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खात असाल आणि पिवळा भाग फेकून दिला तर जाणून घ्या तुम्हाला अंड्याचा पूर्ण फायदा मिळतच नाही. सध्याच्या जीवनात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे माणसांना अनेक आजार होऊ लागले आहेत. हे आजार शरीरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर विशेष बंधनं घालावी लागतात.

डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड,वजन वाढणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यांसारख्या आजारांमध्ये तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ खायचे बंद करावे लागेल. एवढंच नाही तर हे पदार्थ तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारातून काढून टाकावे लागतील. म्हणूनच अंड्यासारख्या पौष्टिक पदार्थाची पौष्टिकता तुम्हाला माहीत असायलाच हवी.

अंड्याचा पिवळा बलक फायदेशीर

अंड्याचा पिवळा बलक

आपल्यापैकी बहुतेकांना अंडी खायला आवडतात. मात्र, कोलेस्ट्रॉलच्या भीतीने अनेकजण अंड्यातील पिवळ बलक खाणे बंद करतात. अनेक पोषण तज्ञ म्हणतात की कोलेस्ट्रॉलचा धोका कोणासाठीही एकवेळ नसतो. डब्ल्यूएचओ आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासातून असही दिसून आलं आहे की अंड्यातील पिवळा बलक अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटिन्स असतात आणि अंड्यातील पिवळ बलकामध्ये कोलेस्ट्रॉल, बी व्हिटॅमिन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. या सर्व गोष्टी अनेक जैविक कार्यांमध्ये मदत करतात आणि हे सगळे घटक खाण्यातून घेणं आपल्यासाठी आवश्यक असतं.

अंड्यातील पिवळ्या भागातून व्हिटॅमिन डी मिळतं. कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कोलेस्टेरॉल शरीरातील अनेक सेक्स हार्मोन्सचा स्राव होण्यासही मदत करते. कोलेस्टेरॉल शरीरासाठी अनेक प्रकारे वाईट आहे आणि जर तुम्हाला शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या आहारात अख्ख्या अंड्याचा समावेश करावा लागेल.

अंड्यातील पिवळा बलक किती पौष्टिक आहे माहीत आहे

4 69

अंड्यातील पिवळा बलक स्वतःच प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. जर तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खात असाल आणि पिवळा भाग फेकून देत असाल तर समजून घ्या की पिवळा भाग तुम्हाला अमिनो ऍसिड देतो.

एका अंड्यामध्ये 8 ग्रॅम प्रोटिन्स असतात. जर तुम्ही अंड्याचा पिवळा भाग काढून टाकला तर त्यात फक्त 3 ग्रॅमंच प्रोटिन्स उरतात. याशिवाय त्यात प्रोटिन्स, कोलीन, सेलेनियम, जस्त, व्हिटॅमिन्स ए, बी, ई, डी आणि के असतात. एवढंच नाही तर अंडी हे आहारातील कोलीन आणि व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत देखील आहेत.

एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे?

5 63

तुम्ही दिवसातून दोन अंड्यांचा पिवळा भाग खाऊ शकता. पण यापेक्षा जास्त अंडी खायची असतील तर फक्त पांढरा भागच खावा लागेल. जास्त कोलेस्टेरॉल शरीरासाठी चांगलं मानलं जात नाही. यासोबतच अंडी तेलात किंवा बटरमध्ये तळून खाणे टाळा. उकडलेले अंडे खा. याशिवाय तेल आणि मसाले खाणे टाळा. जास्त प्रमाणात ग्रील्ड आणि फास्ट फूड खाऊ नका.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories