आपण उपवासाला राजगिरा खातो कारण राजगिरा पचायला अतिशय हलका आणि शरीरासाठी तितकाच पौष्टिक आहे. सध्या बरेच डॉक्टर रुग्णांना राजगिरा खायला सांगत आहेत यामागे नेमकं काय कारण आहे आणि कोणत्या आजारांवर आपण राजगिरा खाऊन विजय मिळवू शकतो हेसुद्धा तुम्ही वाचा.
राजगिरा अनेक आजारांपासून वाचवतो
असं म्हणतात राजगिरा धान्य उपवासासाठी देवता देखील खातात. राजगिरा इतका ठीक आहे तर तो कोणत्या आजारात कशा प्रकारे खायचा. हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. चला पाहूया राजगिरा हा वेगवेगळ्या आजारात कशाप्रकारे खायचा आणि त्याचे फायदे मिळवायचे.
गळणारे केस थांबवण्यासाठी राजगिरा
ज्यांना पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्याचा त्रास आहे. त्यांच्यासाठीही राजगिरा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यात व्हिटॅमिन ई आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे केसांना पुरेसे पोषण देतात आणि अशा स्थितीत केस गळतीसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
डायबिटिसमध्ये राजगिऱ्याचे फायदे
डायबिटिसच्या रुग्णांसाठी राजगिरा खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही राजगिरा पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या खाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला रक्तातली साखर नियंत्रित ठेवता येते.
राजगिरा हृदयासाठी उत्कृष्ट
राजगिरा हा हृदयासाठी पौष्टीक अन्न आहे, कारण त्यात असलेले अनेक घटक वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करतात. हृदयविकार असलेले लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने राजगिरा पिठाची रोटी किंवा राजगिरा खिचडी खाऊ शकतात. त्यामुळे वाढणारा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी राजगिरा खायलाच हवा.
राजगिरा खाऊन हाडं होतील बळकट
कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचं आहे आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे अनेक आजार होतात. राजगिरा खाल्ल्याने कॅल्शियम मिळते, याच्या मदतीने हाडांचे आजार होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही राजगिरा लाडू बनवू शकता आणि दररोज एक किंवा दोन लाडू खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नियमितपणे कॅल्शियम मिळेल.
राजगिरा सूज कमी करतो
राजगिऱ्यामध्ये असे अनेक घटक आढळतात, जे शरीरासाठी अँटी इन्फ्लमेशनरी म्हणून काम करतात तसेच शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. जर तुमच्या अंगाला सूज येत असेल तर तुम्ही गरमागरम राजगिरा खीर खाऊ शकता. तर आता राजगिरा फक्त उपवासालाच नाही तर रोजच्या आहारातसुद्धा खायला सुरुवात करा.