लाल पोहे खाऊन पहा! कसे बनतात हे आरोग्यदायी पोहे?

Advertisements

पोहे म्हटलं की पांढरे शुभ्र पोहे डोळ्यांसमोर येतात. तुम्ही लाल पोह्याबद्दल ऐकले आहे का? हा एक सुपर नाश्ता आहे असं म्हणतात.

लाल पोहे कसे बनतात?

नाश्ता जो झटपट बनणारा, पौष्टिक आणि आरोग्यदायी असायला हवा. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे पोहे. पोहे अनेक प्रकारे बनवले जातात. कुणी त्यात भाज्या टाकतात, कुणी मसाले आणि शेंगदाणे. त्याचप्रमाणे लाल पोहे देखील तयार केले जातात, जे लाल तांदळापासून बनवले जातात. लाल पोहे आरोग्यासाठी

उपयुक्त आहेत. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे. आता लाल पोहे का खावेत, जाणून घेऊया. 

लाल पोह्यांचे फायदे

हाडं बळकट होतील

आपल्या शरीरात जर मॅग्नेशियम, कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असेल तर आपली हाडं बळकट राहतात. लाल पोहे मॅग्नेशियम, कॅल्शियम युक्त असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते.

तुमच्या डायट प्लानचा साथी

वजन कमी करताना तोच कंटाळवाणा डायट सोडून असच काहीतरी शोधत असाल तर लाल पोहे खाऊ शकता. हा फॅट्स कमी करतो.

हे पोहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. वजन वाढेल अशा कोणत्याही टेन्शनशिवाय खाऊ शकता. त्यात फायबर आहे. त्यामुळे पोटही भरलेलं राहील आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

Advertisements

त्वचेला देईल नवतारुण्य

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेले लाल पोहे फ्री रॅडिकल्स घालवतात. हे पोहे शरीरातील लाल रक्तपेशींना वाढवतात. तुमची त्वचा अकाली वृद्ध होत नाही. बाहेरून ब्युटी क्रीम लावण्यापेक्षा ह्याने त्वचा तरुण राहिल.

डायबिटिसमध्ये पोहे खाऊ शकता

लाल पोहे लो ग्लायसेमिक इंडेक्स आहेत. लाल पोह्यात आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे डायबिटिस, प्री डायबिटीज आणि लठ्ठपणापासून आराम मिळतो.

त्यात आरोग्यदायी कर्बोदके असतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. चवीसोबत आरोग्याचा खजिनाच असलेल्या लाल पोह्यांमध्ये भाज्यांसोबत लिंबाचे काही थेंब टाका, त्याची चव अतुलनीय लागेल.

पचन बळकट करा

फायबर आणि प्रोबायोटिक बॅक्टेरियाने भरपूर असल्याने लाल पोहे पचनासाठी चांगले असतात. साधे पोहे खाऊन तुम्हाला पित्त होत असेल तर ह्या पोह्यानी पित्त होत नाही. पोट हलके राहते. तसेच बद्धकोष्ठता आणि जुलाबाचा त्रास होत नाही. दही आणि लाल पोहे पोटाच्या विकारांवर उत्तम असतात.

तर मग एवढे पौष्टीक, चविष्ट, औषधी लाल पोहे तुम्ही खायला सुरूवात करा. हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा. तुम्‍हाला हवं असल्‍यास, तुम्ही ते नाश्त्यासाठी किंवा मिड-डे स्नॅकिंग म्हणून घेऊ शकता.

आरोग्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. लाल पोहे खाल्ल्याने भूक कमी लागेल आणि अनारोग्यकारक खाणार नाही. लाल पोहे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम आहेत.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories