“कच्चा बदाम” आहे अतिशय पौष्टिक! ह्या अतिशय महत्त्वाच्या फायद्यांसाठी कच्चा बदाम खाल्ला जातो.

Advertisements

तुम्ही आजवर पिकलेले बदाम खात आला असेल पण त्याहून जास्त पौष्टिक असतात. मऊ मखमली टेक्सचर्ड शेल आणि नटी चव असलेले हे हलकं हिरवं फळ म्हणजे पर्वतांची खास भेट आहे. तुम्ही ‘कच्छा बदाम’ हे व्हायरल गाणं ऐकलं असेल, तर ते खऱ्या आयुष्यातही खाल तर पौष्टीकतेचा खजिना आहे.अजूनही कच्च्या बदामाचा हंगामा आहे! कच्चा बदाम तुम्हाला फळांच्या दुकानातसुद्धा सहज मिळतील.

कच्चे बदाम हे आपण नेहमी खातो त्या गोड बदामाच्या झाडाचे न पिकलेले फळ आहे, जे कापलं तरी मऊ राहतं. आतील बिया पूर्णपणे विकसित होण्यापूर्वी आणि बाहेरील पृष्ठभाग कडक होण्यापूर्वी ही फळं काढली जातात. कच्च्या बदामाची चव पिकलेल्या बदामाच्या चवी इतकी चांगली नसते, परंतु त्यातील सर्व पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

बदाम भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. कच्चे बदाम सुद्धा पोषक घटकांनी भरलेले आहेत. वजन कमीकरण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यापर्यंत आपल्या आहारात यांचा समावेश करा. कच्चे बदाम फायदेशीर आहेत यासाठी अनेक लोक कच्चे बदाम खातात.

लोक कच्चे बदाम का खातात?

आतड्यांच्या आरोग्यासाठी

या छोट्या बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे बद्धकोष्ठता दूर करून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. उत्तम पचनासोबतच ते पोटाशी संबंधित समस्या दूर ठेवतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी

कच्चे बदाम खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. त्यात अनसॅच्युरेटेड फॅट असतात जे आपल्या शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. म्हणून कच्चे बदाम खाऊन आपलं हृदय देखील निरोगी राहतं.

शरीरातले विषारी पदार्थ घालवण्यासाठी

कच्च्या बदामामध्ये चांगले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-ई असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.

Advertisements

हृदयाची काळजी घेण्यासाठी

कच्च्या बदामामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात आणि शरीरात अँटिऑक्सिडंट्सची शक्ती वाढते हे लक्षात घेता ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले सिद्ध होऊ शकतात. म्हणजेच तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचा आहारात समावेश करावा.

मुलायम चमकदार त्वचेसाठी

कच्च्या बदामाचे फायदे तुमच्या सौंदर्यासाठीही खूप खास आहेत. कच्च्या बदामाच्या सेवनाने त्वचा चमकदार आणि कोमल बनते.

निरोगी केसांसाठी

आपल्या आहारात कच्च्या बदामाचा समावेश करणे देखील आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि संरचनेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. उच्च प्रथिने समृद्ध, हे आपल्या केसांसाठी जादू करू शकते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

पण चांगल्या आरोग्यासाठी लहानपणापासून बदाम खायला सुरवात करू शकतो. याचे कारण आपली प्रतिकारशक्ती वाढते. खरंतर कच्चे बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहायला मदत होते.

हाडं बळकट ठेवण्यासाठी

कच्चे बदाम कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असल्याचे देखील ओळखले जाते, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. जसजसं तुमचं वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या हाडांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच कच्चे बदाम खायला सुरुवात करा. आता तुम्ही या सीझनमध्ये कच्चे बदाम नक्की घरी आणाल आणि खायला सुरुवात कराल.

कच्चे बदाम कसे खावेत?

कच्चे बदाम सोलून खाता येतात. एकाच वेळी जास्त खाऊ नका. बदाम खाऊ शकता, पण माफक प्रमाणात!

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories