पनीर खरा आहे की नकली हे जाणून घेण्यासाठी घरात पडलेल्या ह्या गोष्टींनी तपासा पनीर मधली भेसळ.

इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच पनीरमध्येही भेसळ असते आणि जे लोक ते आरोग्यदायी मानून विकत घेतात त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जेवणात पनीर हवाच असं म्हणणाऱ्या खवय्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पौष्टिक असण्यासोबतच, पनीरपासून बनवलेल्या पदार्थांना त्यांच्या लाजवल चवीसाठी प्राधान्य दिले जाते आणि म्हणूनच पनीर घरी किंवा रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिजवले जाते आणि सर्व्ह केले जातात.

पनीर दुग्धजन्य पदार्थ असल्याने त्यात दुधाचे सर्व पोषक घटक असतात. पनीरमध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स आहेत. त्याशिवाय त्यामध्ये लोह देखील असतं. पनीर खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो आणि हाडं मजबूत होतात.

पण, हे सुद्धा तेवढंच खरं आहे की पनीरमध्ये भेसळ नसेल तरच तुमच्या आरोग्याला हे सर्व फायदे मिळू शकतात. इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच पनीरमध्येही भेसळ असते आणि जे लोक ते पौष्टिक मानून विकत घेतात त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

पण, बनावट पनीर खाण्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं? ह्याचं उत्तर म्हणजे नकली पनीर ओळखायला शिकायला हवं आणि असे पनीर विकत घेऊ नये. परंतु, जर तुम्हाला खरे पनीर आणि नकली पनीर कसे ओळखायहे हेच माहित नसेल, तर तुम्ही ह्या काही पद्धती वापरून पाहू शकता.

घरच्या घरी अशा प्रकारे खरा आणि बनावट पनीर ओळखा

पनीर खरेदी केल्यानंतर लगेच हे काम करा. दुकानातून पनीर आणल्यानंतर सर्वप्रथम पनीरची शुद्धता तपासण्यासाठी एक साधी टेस्ट करा. यासाठी पनीर हाताने मॅश करून पहा. पनीरमध्ये भेसळ असल्यास ते फुटून पावडर बनते. पनीर सहसा दूध पावडर किंवा स्किम्ड मिल्क पावडरपासून बनवले जाते. भेसळ असलेले पनीर खाल्ल्याने पचनसंस्था बिघडून पचनाचे आजार होऊ शकतात.

सोयाबीनच्या मदतीने बनावट पनीर ओळखा

घरी मिळणाऱ्या साध्या सोयाबीनच्या मदतीनेही बनावट पनीर ओळखता येतो ह्यासाठी, पनीर थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा किंवा थोडा वेळ उकळा. यानंतर पाण्यात सोयाबीनचं पीठ किंवा सोयाबीन पावडर टाका. पीठ मिक्स केल्यावर इमिटेशन म्हणजे नकली भेसळ असलेल्या पनीरचा रंग लाल होईल.

तज्ज्ञांच्या मते, पनीर बनवताना त्यात डिटर्जंट आणि युरियासारख्या गोष्टी मिसळल्या गेल्या असतील तर सोयाबीन सोबत रीऍक्टिव पनीरचा रंग लाल होतो. युरिया आणि डिटर्जंट मिसळल्याने शरीराला खूप त्रास होतो. पनीर अशा दुकानातून पुन्हा खरेदी करू नका. खाद्यपदार्थात भेसळ करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आपण ह्याबद्दल तक्रार करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories