प्रोटीनसाठी तुम्हाला मांसाहार करण्याची गरज नाही फक्त ह्या पालेभाज्यांमधून तुम्हाला मिळेल पुरेसं प्रोटीन!

Advertisements

प्रोटीनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, स्नायूंचे वस्तुमान कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि श्वसन प्रणाली कमकुवत होण्याचा धोका असतो आणि मृत्यू देखील होतो. जास्त प्रोटीन्स चिकन, अंडी किंवा इतर प्रकारच्या मांसाहारी पदार्थांमधून मिळतात हे बऱ्याच अंशी खरं आहे, पण रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पालेभाज्यांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. ह्या काही पालेभाज्यांमधून तुम्हाला पुरेसं प्रोटीन मिळतं. प्रोटीन मिळण्यासाठी तुम्हाला अंडी आणि चिकनची कधीच गरज भासणार नाही.

शरीराच्या वाढीसाठी आणि चांगल्या कार्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. त्याच्या कमतरतेमुळे, तुम्ही थकवा, अशक्तपणा आणि आजारपणाला बळी पडू शकता.

कारण मानवी शरीर प्रथिने तयार करत नाही, ते खाण्यापिण्यापासून घेतले जाते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, स्नायूंचे वस्तुमान कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि श्वसन प्रणाली कमकुवत होण्याचा धोका असतो आणि मृत्यू देखील होतो.

एका दिवसात आपल्याला किती प्रोटीन आवश्यक आहे?

नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार प्रौढांना दररोज एका किलोमागे किमान 0.8 ग्रॅम प्रोटीन्स किंवा शरीराच्या प्रत्येक 20 पौंड वजनासाठी 7 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन्स मिळायला हवं. याचा अर्थ असा की 140-पाऊंड व्यक्तीला दररोज सुमारे 50 ग्रॅम प्रोटीन आणि 200-पाउंड व्यक्तीला सुमारे 70 ग्रॅम प्रोटीन मिळणे आवश्यक आहे.

प्रोटीनची/ प्रथिनांची कमतरता कशी पूर्ण करावी?

चिकन, अंडी किंवा इतर प्रकारच्या मांसातून जास्त प्रोटीन्स मिळतात. हे बऱ्याच अंशी खरं आहे, पण रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळतात. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीन कसं मिळेल ह्याची काळजी करण्याची गरज नाही.

मोड आलेल्या कडधान्यामध्ये / स्प्राउट्समध्ये कॅलरी खूप कमी असतात परंतु अशी कडधान्य भरपूर पौष्टीक असतात. एक कप (33 ग्रॅम) स्प्राउट्समध्ये 1.3 ग्रॅम प्रोटीन्स असतात. 100 ग्रॅम अल्फाल्फा स्प्राउट्समध्ये 4 ग्रॅम प्रोटीन्स आणि 23 कॅलरीज असतात. याशिवाय ही भाजी जीवनसत्त्वे, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.

Advertisements

प्रोटीनची कमतरता कशी पूर्ण करावी

पालक खा

पालक ही सर्वात पोषक तत्वांनी युक्त हिरव्या पालेभाज्यांपैकी एक आहे. एक कप (25 ग्रॅम) कच्च्या पालकामध्ये 0.7 ग्रॅम प्रोटीन असतं. 100 ग्रॅम पालकामध्ये 2.9 ग्रॅम प्रथिने आणि 23 कॅलरीज असतात. त्यातील 50% कॅलरीज प्रोटीन असतात. पालक प्रथिनांमध्ये सर्व आवश्यक अमीनो ऍसिड असतात. एक कप पालकामध्ये 121 mcg व्हिटॅमिन K असते, जे एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजांच्या 100% पेक्षा थोडं जास्तच असतं.

चीनी कोबी

चायनीज कोबीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन्स जास्त असतात. एका कप कोबीमध्ये (70 ग्रॅम) 1.1 ग्रॅम प्रथिने असतात. 100 ग्रॅम कोबीमध्ये 1.5 ग्रॅम प्रथिने आणि 13 कॅलरीज असतात. त्याच्या कॅलरीजमध्ये 46% प्रथिने असतात. हे जीवनसत्त्वे ए, सी आणि के, फोलेट, कॅल्शियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे.

शतावरी

शतावरी ही उच्च पौष्टिक मूल्य असलेली अतिशय लोकप्रिय भाजी आहे. एक कप (134 ग्रॅम) शतावरीमध्ये 3 ग्रॅम प्रोटीन्स असतात. 100 ग्रॅम शतावरीमध्ये 2.2 ग्रॅम आणि 20 कॅलरीज असतात. कॅलरीजमध्ये 44% प्रोटीन्स असतात. शतावरी हे व्हिटॅमिन के, फोलेट, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे.

मोहरीच्या पानांची भाजी

मोहरीच्या कोवळ्या पानांची भाजी जीला हिंदीत सरसों का साग म्हणतात ती भारतात सर्वाधिक खाल्ली जाते. एक कप (56 ग्रॅम) चिरलेल्या मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटीन असतात. 100 ग्रॅम मोहरीच्या पालेभाजीमध्ये 2.9 ग्रॅम प्रोटीन आणि 27 कॅलरीज असतात.

एक कप मोहरीच्या पानाच्या भाजीमध्ये 144 mcg जीवनसत्व असते, जे एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजांच्या 100% पेक्षा जास्त आहे. ही भाजी व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ई चा एक उत्तम स्रोत आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories