फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय? वाचा सर्वात पौष्टीक असलेला हा तांदूळ कसा तयार होतो?

Advertisements

‘फोर्टिफाइड’ तांदळात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक ॲसिड, लोह आणि जस्त यांचे मिश्रण असते. पण ‘फोर्टिफाइड’ तांदूळ म्हणजे काय? ते ह्या लेखात पाहूया.

फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय?

3 87

‘फोर्टिफाइड’ तांदूळ लोह आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक ॲसिड, लोह आणि झिंक या सर्व पोषक घटकांचं मिश्रण ह्या भातामध्ये आहे. लोकांच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्याबरोबरच कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा तांदूळ उपयुक्त ठरत आहे.

भात हे भारतीयांचे आवडते खाद्य आहे. भात हे भारतीय लोकांचे सर्वात आवडते खाद्य आहे. आपल्या देशातील सुमारे 65 टक्के लोक त्यांच्या जेवणात तांदूळ वापरतात. तुम्हीसुद्धा आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खाल्ले असतील.

फोर्टिफाइड तांदूळ कुपोषणाविरुद्धच्या युद्धात प्रभावी भूमिका बजावू शकेल. 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील 59 टक्के मुले, 15 ते 50 वर्षे वयोगटातील 53 टक्के महिला आणि त्याच वयोगटातील 22 टक्के पुरुषांमध्ये लोह आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता आहे.

फोर्टिफाइड तांदूळ कसा बनवला जातो?

4 85

फोर्टिफाइड तांदूळ हा नेहमीच्या भातापेक्षा जास्त पौष्टिक असतो कारण त्यात वेगवेगळे पोषक घटक मिसळले जातात. हा तांदूळ बनवण्याची एक आगळीवेगळी पद्धत आहे तयार करण्यासाठी तांदूळ बारीक करून त्याची पावडर तयार केली जाते. यानंतर, या पावडरमध्ये पोषक तत्त्वे असलेली पावडर मिसळली जाते आणि मळून घेतली जाते.

आता हे मळलेले पीठ वाळवून तांदळाचा आकार दिला जातो, जेणेकरून तो आपल्या रोजच्या भातासारखा दिसतो. आता हे फोर्टिफाइड तांदूळ सामान्य भातामध्ये मिसळले जातात आणि तांदूळ वापरण्यासाठी तयार होतात.

Advertisements

आता तुम्हाला वाटत असेल की मनुष्यनिर्मित तांदूळ आहेत मग चवीचं काय? शिजवल्यानंतर हे तांदूळ चवीनुसार आणि आकाराने सामान्य भातासारखे दिसतात, त्यामुळे खाणाऱ्याला त्याची चव कळतही नाही.

तांदूळ शिजवताना त्याची पौष्टिकता कशी वाढवू शकतो?

5 84

फोर्टिफाइड तांदळामध्ये सामान्य तांदळाच्या तुलनेत जास्त पोषक घटक असतात. पण जर तुम्हाला तुमचा डेली राईस अधिक पौष्टिक बनवायचा असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. फोर्टिफाइड भात नेहमी झाकण बंद म्हणजे बंद भांड्यात शिजवावा. मोकळ्या भांड्यात भात शिजवल्यास त्यातील अनेक पोषक तत्वे वाफेवर नाहीशी होतात.

भात शिजवताना त्यात देशी तूप आणि दालचिनी, तमालपत्र, लवंगा, वेलची, काळी मिरी असे मसाले टाकल्याने त्यातील पोषक द्रव्ये वाढते. भात शिजवण्यासाठी अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरता येते. लहान मुलांसाठी भात बनवत असाल तर दुधात शिजवल्यास उत्तम. त्यामुळे त्यातील पोषकतत्त्वेही वाढते.

याशिवाय अ‍ॅल्युमिनिअमच्या कुकरमध्ये किंवा भांड्यांमध्ये भात शिजवण्याऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये शिजवावा, जेणेकरून कमीत कमी पोषक तत्वांची हानी होते.

नुकताच भारत सरकारने छत्तीसगडमधील १२ जिल्ह्यांमध्ये जिथे कुपोषण आणि अशक्तपणाने लोकांची स्थिती वाईट आहे अशा ठिकाणी फोर्टिफाइड तांदूळ देण्याचे ठरवले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारही जोरदार प्रयत्न करत आहे, त्यामुळे या 12 जिल्ह्यांतील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना पुढील महिन्यापासून फोर्टिफाइड तांदूळ दिला जाणार आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories