उकडलेले शेंगदाणे आरोग्यासाठी सुपरफुड! खा असे शेंगदाणे.

शेंगदाणे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन्स चा उत्कृष्ट स्रोत आहे. याशिवाय, शेंगदाणे हे मॅग्नेशियम, फायबर आणि हृदय निरोगी तेलांचं मिश्रण आहे. 

चला तर मग आज शेंगदाण्याच्या हेल्दी चवीचा आस्वाद घेऊया.

 शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडतात. तुम्ही भाजलेले, तळलेले आणि साधे शेंगदाणे अनेक वेळा खाल्ले असतील पण तुम्ही कधी उकडलेले शेंगदाणे खाल्ले आहेत किंवा त्याचे फायदे ऐकले आहेत. जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे तसेच झटपट तयार होणा-या उकडलेल्या शेंगदाणा सॅलडची रेसिपी सांगणार आहोत. 

चव चाखल्यानंतर आणि त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच नव्या विश्र्वासाने खायला लागाल. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या संशोधनानुसार, शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक घटक उकळल्यानंतर चार पटीने वाढतात. म्हणूनच तेतळण्याऐवजी उकडून खाणे अधिक फायदेशीर आहे.

शेंगदाणा आरोग्यासाठी पॉवर पॅक म्हणून पाहिला जातो कारण त्यात फायबर आणि प्रोटीन्स भरपूर असतात. यासोबतच त्यात फॅट (मोनोसॅच्युरेटेड फॅट), रेझवेट्रल आणि फायटोस्टेरॉल सारखे पोषक घटक देखील असतात. शेंगदाणे खाल्ल्याने डायबिटिस, हृदयविकार, कॅन्सर आणि अल्झायमरचा धोका कमी होतो.

डायबेटिस साठी सुपरफूड

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने शेंगदाण्याला डायबिटिस साठी सुपर-फूड म्हणून स्थान दिलंय. कारण त्यात फायबर, मॅग्नेशियम आणि हृदयासाठी आरोग्यदायी तेले असतात. त्यांचा रक्तातील ग्लुकोजवर फारसा परिणाम होत नाही. डायबिटिसच्या रुग्णांनी आपल्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश करावा.

एनर्जी पॅक

थोड्या प्रमाणात शेंगदाणे खाऊनही तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळते. म्हणूनच त्याला पॉवर पॅक म्हणतात. शेंगदाण्यामध्ये सुमारे 50 टक्के हेल्दी फॅट असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories