पुरुषांना अकाली म्हातारपण येऊ नये म्हणून हे पौष्टिक घटक मिळायला हवेत. तुम्ही खाताय ना?

- Advertisement -

किती धावतात ना पुरूष! आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक पुरुष त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते आणि मग अकाली म्हातारपण येतं. आपण प्रत्येक वेळी स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्यांनी काय खायला हवं व कोणती काळजी घ्यावी हे वाचतो. पण पुरुषांनी काय खायला याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते.

पण पोषक घटक पुरुषांच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहेत, त्यांना दीर्घायुष्यासाठी तंदुरुस्त राहायला हवं. महिला आणि पुरुषांच्या आरोग्याच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक लोक महिला आणि पुरुषांना समान आहार खाण्याची शिफारस करतात.

परंतु पुरुषांना सगळं स्त्रियांपेक्षा जास्त पोषक आणि भिन्न प्रमाणात आवश्यक असतं. मात्र, आपल्या देशात बहुतांशी महिलांच्या आरोग्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे आज आपण पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात कोणत्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे हे समजून घेणार आहोत.

पुरुषांनी उत्तम आरोग्यासाठी हे खायला हवं

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी माणसाला फायबर, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, कॅल्शियमची गरज असते. चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि ह्या पोषक तत्त्वांची गरज काय खाऊन पूर्ण होऊ शकतात.

- Advertisement -

फायबर मिळायला हवं

आजकाल प्रत्येक पुरुषाला पचनाचा त्रास होतो. पचन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाला फायबरची गरज असते. शरीरात फायबरचे प्रमाण संतुलित असल्याने हृदयाच्या समस्यांसारख्या समस्याही होत नाहीत. तसेच वजन आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

भारतातील पुरुषांमध्ये डायबिटिस, हृदयाच्या समस्या आणि रक्तदाबाच्या वाढत्या घटनांमुळे प्रत्येक पुरुषाला फायबर सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आजपासून आहारात गाजर, शिमला मिरची, सफरचंद, ओट्स, ताजी फळे, पालेभाज्या, कडधान्ये यांचा समावेश करून फायबरची कमतरता भरून काढा.

कॅल्शियम घेताय ना

पुरुषांना स्त्रियांपेक्षा त्यांची हाडं मजबूत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हाडे मजबूत आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियमचे सेवन अत्यंत महत्त्वाचं आहे. पुरुष त्यांच्या आहारात दूध, दही, मासे आणि पालेभाज्या समाविष्ट करू शकतात जेणेकरून त्यांना अन्नाद्वारे पुरेसं कॅल्शियम मिळेल.

झिंक

झिंकची कमतरता बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे संसर्गाशी लढा, जखमा भरण्यास उशीर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुरेशा झिंकच्या सेवनासाठी पुरुषांनी त्यांच्या आहारात सीफूड मासे, कोळंबी, बीन्स आणि धान्य खात जा.

- Advertisement -

अँटी-ऑक्सिडंट्स

शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट्सची सर्वाधिक गरज असते. पुरूषांच्या शरीराला पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स मिळावेत, यासाठी त्यांनी फळे, भाज्या आणि सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे.

पोटॅशियम ने थकवा

शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायू कडक होणे, वेदना, थकवा आणि तणाव यांसारखी लक्षणे दिसतात. स्नायूंच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी पोटॅशियम देखील आवश्यक मानले जाते. पुरुष त्यांच्या रोजच्या आहारात केळी, एवोकॅडो, नट, बटाटे आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकतात जेणेकरून शरीरात पोटॅशियमची कमतरता राहणार नाही.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories