वेफर्स की वडापाव? जंक फूड आणि फास्ट फूडमध्ये काय फरक आहे? हे आरोग्यासाठी अपायकारक का मानले जातात ते जाणून घ्या.

जर तुमचा फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये गोंधळ असेल तर आम्हाला या दोन्हीमधील फरकाबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.

जंक फूड आणि फास्ट फूडमध्ये काय फरक आहे?

जंक फूड आणि फास्ट फूडमधील फरक समजून घेण्यात आपल्यापैकी बरेच जण गोंधळलेले असतात.  पण तुम्हाला  माहीत नसेल तर दोन्ही पदार्थ खूप वेगळे आहेत.

तसेच जंक फूड आणि फास्ट फूड खाण्याचे वेगवेगळे तोटे आणि फायदे आहेत. जंक फूड आणि फास्ट फूड दोन्ही आरोग्यासाठी अपायकारक आहेत. पण जर तुम्हाला या दोन्हीपैकी निवड करायची असेल तर फास्ट फूड खा. जंक फूडपेक्षा फास्ट फूड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. फास्ट फूड आणि जंक फूडमधील फरक सविस्तर जाणून घेऊया.

फास्ट फूड म्हणजे काय?

फास्ट फूड हे अन्न आहे जे तुम्ही रेस्टॉरंटमधून ऑर्डर करता आणि तुमची ऑर्डर काही मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हे खाद्यपदार्थ अशा प्रकारे तयार केले आहेत की ते आपल्या वेगाने उपलब्ध करून दिलं जातं. फास्ट फूडमध्ये पिझ्झा, बर्गर, चाउमीन, फ्राईज यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

- Advertisement -

जंक फूड म्हणजे काय?

जंक फूडला रेडी डाएट म्हणतात, मग ते तुम्हाला पॅकेट्समध्ये उपलब्ध होतं आणि ते बनवण्याचा कोणताही त्रास नसतो.  फक्त पाकीट उघडून खाल्ल जातं. जंक फूडमध्ये पोषक तत्वांचं प्रमाण शून्य असतं असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  एका शब्दात, आपण या प्रकारच्या आहाराला भरपूर कॅलरी असणारा आहार म्हणू शकता.  जंक फूडमध्ये चिप्स, पॅकेज केलेले सँडविच, कुरकुरीत वेफर्स अशा गोष्टींचा समावेश होतो.

जंक फूड आणि फास्ट फूडचे फायदे

हे दोन्ही आहार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.  पण, दोनपैकी एक निवडल्यास, फास्ट फूड आपल्यासाठी अधिक योग्य असेल.  कारण त्यात काही प्रमाणात हिरव्या भाज्या, फळं, धान्य अशा ताज्या गोष्टींचं मिश्रण असतं.  दुसरीकडे, जंक फूडमध्ये ताज्या गोष्टी अजिबात नसतात.

जंक फूडच्या फायद्यांबद्दल सांगायचं तर ते आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाहीत. पण आपण प्रवास करत असल्यास, आपण खाण्याची तात्पुरती सोय म्हणून खाऊ शकता.  म्हणजेच, खानपानाची सोय नसल्यासच आपण जंक फूड खाऊ शकता.

फास्ट फूडच्या फायद्यांबद्दल सांगायचं तर, ताजी फळं आणि भाज्यांच्या तुलनेत ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर नाही.  तथापि, जर तुमच्याकडे घरगुती अन्न खाण्याचा पर्याय नसेल, तर तुम्ही त्याचा पर्याय म्हणून समावेश करू शकता.

- Advertisement -

जंक फूडचे दुष्परिणाम

  • जंक फूडमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असतं. ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
  • एवढच नाही तर त्यामध्ये कार्ब्सचं प्रमाण जास्त असतं.  अशा स्थितीत जंक फूड खाऊन तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
  • जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने एखादी व्यक्ती डिप्रेशनची शिकार होऊ शकते.

फास्ट फूडचे तोटे

फास्ट फूडमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे तुमची रक्तातील साखर आणि इन्सुलिनचा प्रतिकार वाढू शकतो. जंक फूडप्रमाणेच फास्ट फूडमध्येही सोडियमचं प्रमाण जास्त असतं.  सोडियमचं प्रमाण वाढल्याने शरीरात जास्त प्रमाणात पाणी साठून राहतं.

ज्यामुळे अंगाला सूज येऊ शकते. फास्ट फूडमध्ये असलेले कार्ब्स आणि साखरेमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते.

आरोग्यासाठी धोकादायक

फास्ट फूड आणि जंक फूड दोन्ही आरोग्यासाठी अपायकारक आहेत.  त्यामुळे अशा गोष्टींचा नियमित आहारात समावेश टाळा. जेणेकरून तुमचं शरीर दीर्घकाळ निरोगी राहू शकेल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories