सगळ्या आजारांपासून दूर ठेवतात हे काळे पदार्थ ! ही ब्लॅक फूड खाल तर होतील हे आश्चर्यकारक फायदे !

ब्लॅक फूडमध्ये कोणते पदार्थ आणि फळं येतात? आणि ब्लॅक फूड म्हणजेच काळे पदार्थ खाण्याने आपल्याला काय फायदे होतात ह्याबद्दल आपण महत्वाची माहिती घेऊया.

ब्लॅक फूड्स का खावं?

आपण नेहमी हिरव्या भाज्या, पिवळे पौष्टीक पदार्थ किंवा फळं आणि लाल रंगाच्या सफरचंदाच्या फायद्यांबद्दलही वाचतो कारण ती पौष्टीक असतात. असही ऐकलं असेल दररोज एक सफरचंद खाणाऱ्या माणसाला डॉक्टरांकडे जावं लागत नाही. पण, तुम्ही कधी इतर रंगांच्या पौष्टीक पदार्थांचा शोध घेतला आहे का? मग ते पौष्टीक काळे खजूर असोत किंवा काळे अंजीर. हे काळे पदार्थ अनेक सुपरफूडपेक्षा आरोग्यदायी असतात. काळ्या पदार्थांबद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती आपण ह्या लेखातून वाचूया.

ब्लॅक फूड्स म्हणजे काय?

अँथोसायनिन नावाचे रंगद्रव्य असलेलं अन्न काळा पदार्थ म्हणून ओळखला जातो. अँथोसायनिन काळ्या,निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये आढळतात आणि त्यात लपलेले पोषक असे भरपूर फायदे आहेत. ह्या रंगद्रव्यांमध्ये समृद्ध अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे आरोग्य सुधारतात आणि कर्करोग, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात.

ही आहेत सुपर पौष्टीक ब्लॅक फूड्स

काळी डाळ

3 8

हे नसे आश्चर्य! कारण आपण भारतीय लोकांनी जुन्या काळापासून काळी डाळ वापरली आहे. उडदाची डाळ. ती वरण म्हणून आणि इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाते. ह्यात फायबर, लोह, फोलेट आणि प्रोटीन्स आहेत आणि ती खूप चविष्ट लागते.

काळे खजूर

4 8

काळे खजूर कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आहारातील फायबरमध्ये समृद्ध आहेत. त्यामध्ये फ्लोरीन नावाचा रासायनिक घटक देखील असतो, जो दात किडण्यापासून दातांचं रक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. खजुरातील सेलेनियमची उच्च मात्रा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करते.

काळे तीळ

5 8

काळे तीळ फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, जस्त, तांबे, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई अशा पौष्टिक फायद्यांचे भांडार आहे. त्यामध्ये सेसामिन देखील असते, जे सूज कमी करण्यात मदत करते. सांधेदुखी मध्ये काळे तीळ पौष्टिक ठरतात. सॅलडमध्ये गार्निश म्हणून, लाडू, ब्रेड, स्मूदी, सूप, हम्मस, डिप्स म्हणून वापरले जातात.

काळी द्राक्षे

6 8

चवीला गोड असणाऱ्या काळ्या द्राक्षांमध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन सारखे घटक असतात जे रेटिनाचे नुकसान आणि मॅक्युलर डिजनरेशन टाळते. द्राक्षांमधील रेस्वेराट्रोलमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत आणि एलडीएलची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यावर त्याचा मोठा संरक्षणात्मक प्रभाव पडतो. काळ्या द्राक्षात असलेलं प्रोन्थोसायनिडिनचे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. काळी द्राक्षे सॅलड, स्मूदीज, जाम आणि अगदी दही भातामध्ये पण छान लागतात.

काळे अंजीर

7 7

काळे अंजीर गोड आणि स्वादिष्ट असतात आणि सामान्यतः अमेरिकतून आयात होतात. ते पोटॅशियमचे समृद्ध स्रोत आहेत आणि त्यात फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे जे पचन वाढवतं. काळे अंजीर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते मदत करतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकतात.

काळा तांदूळ

8 6

आग्नेय आशियाई पट्ट्यातील मूळ, काळ्या तांदळाला ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिनने भरलेल स्वाद असतो आणि डोळ्यांच्या आरोग्याला हे तांदूळ चांगले असतात. त्यातल्या हाय अँटी-ऑक्सिडंट आणि फायबरमुळे कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत. काळ्या तांदळाची पुडिंग्ज बनवली जातात. फ्राईज, रिसोट्टो, लापशी, नूडल्स, ब्रेड आणि अगदी खीरसाठीही उत्तम आहेत.

काळा अक्रोड

9 4

ओमेगा -3 अल्फा-लिनोलेनिक ॲक्सिडने समृद्ध असा काळा अक्रोड हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी ओळखला जातो. काळे अक्रोड भूक नियंत्रित करण्यात आणि परिपूर्णता वाढवण्यासाठी प्रभावी असतात आणि म्हणूनच वजन कमी करण्यातही मदत करतात. मेलाटोनिन सारख्या अँटीऑक्सिडंट्स गुणांनी काळे अक्रोड समृद्ध आहेत, जे आपली झोप सुधारतात.

ब्लॅक ऑलिव्ह

10 4

ब्लॅक ऑलिव्ह मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई, पॉलीफेनॉल आणि ऑलिओकॅन्थलमध्ये समृद्ध असतात. ते सॅलड्स, पास्ता, स्ट्राई फ्राईज आणि काही लोणचे आणि पेयांमध्ये वापरतात. रक्तवाहिन्या बंद होण्यापासून वाचवतात, डोळ्यांचे आरोग्य राखतात, डीएनएचे नुकसान टाळतात, त्वचेचे आरोग्य चांगले ठेवतात आणि केसांचे आरोग्यही ब्लॅक ऑलिव्ह वाढवतात.

काळा लसूण

11 1

काळा लसूण नैसर्गिकरित्या काळा नसतो जो बाजारात किंवा ऑनलाईन सहज मिळतो. काळा लसूण सूज कमी करतो आणि स्मरणशक्ती वाढवण्यात मदत करतो. ह्यात असे गुणधर्म देखील आहेत जे पेशींचे नुकसान टाळतात आणि म्हणूनच कॅन्सरपासून आपलं संरक्षण करतात. अँटीऑक्सिडंट्स आणि कॅन्सर विरोधी गुणधर्मांमुळे कच्च्या लसणीपेक्षा काळा लसूण चांगला आहे.

ब्लॅकबेरी / जांभूळ

12

ब्लॅकबेरी म्हणजेच जांभूळ हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर आहे कारण ब्लॅकबेरी सूज कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीचा प्रवाह किंवा मासिक पाळीच्या अनियमित घटनांना सामोरे जाणाऱ्या स्त्रियांसाठी ब्लॅकबेरी म्हणजेच जांभळं खाणं चांगली असतात. डायबिटीस मध्ये जांभूळ गुणकारी आहे. ब्लॅकबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. आपण ते आपल्या स्मूदी, डेझर्ट, सॅलड किंवा पॅनकेक्समध्ये ब्लॅकबेरी वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories