ह्या चांगल्या सवयी लावा, जेणेकरून तुमच्या मुलाला डायबिटिस  होणार नाही.

जर तुमचं मूल घराबाहेरील कामांपेक्षा टीव्ही आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असेल, तर त्याला डायबिटिसचा धोका असू शकतो. त्यामुळे आतापासून त्याच्या दिनचर्येत काही आवश्यक बदल करा. नाहीतर भारत हा डायबिटिस ची राजधानी बनत आहे. 

अलीकडच्या काळात किशोरवयीन मुलंसुद्धा डायबिटिसचे रुग्ण बनत आहेत. पूर्वी, तरुणांमध्ये डायबिटिसचं कारण इन्सुलिन हार्मोनची कमतरता (टाइप 1 डायबिटिस ) होतं. परंतु अलिकडच्या वर्षांत, अधिकाधिक तरुण लोक टाइप 2 डायबिटिसची तक्रार करत आहेत. लहान मुलांमध्ये डायबिटिसमुळे पुढील वयात हृदय, किडनी आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात. 

म्हणूनच, ह्या आजारापासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजना अगोदरच पाळणे आवश्यक आहे. मुलांमध्ये डायबिटिसची कारणं आणि मुलांमध्ये डायबिटिस  कसा टाळावा हे जाणून घेऊया. जेणेकरून डायबिटिसचा आजार तुमच्या मुलांचं बालपण हिरावून घेणार नाही.

वजन वाढल्याने मुलांमध्ये डायबिटिसचा धोका वाढतो.

किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटिसचं म्हणजे जास्त वजन किंवा लठ्ठपणा. संतुलित जीवनशैली आणि नियमित शारीरिक व्यायाम कोणत्याही व्यक्तीसाठी महत्त्वाच्या असतात. आणि वजन जास्त असलेल्या लोकांच्या बाबतीत ते अधिक महत्त्वाचं आहे.  मुलांना डायबिटिस पासून वाचवण्यासाठी आजपासून ह्या चांगल्या सवयी लावा

संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक आहार हवा 

अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने सकस आहार घेण्याचा पाळला पाहिजे. जेणेकरून मुलांमध्ये पहिल्यापासूनच खाण्याच्या चांगल्या सवयी तयार करता येतील. फळं आणि भाज्यांचा वापर अधिक करावा. साखरयुक्त कोल्ड्रिंक्स टाळावीत आणि मुलांना जास्त पाणी प्यायला लावा. त्याचप्रमाणे, पुरेसं अन्न खा, परंतु लक्षात ठेवा की एकाचवेळी जास्त खायचं नाही. 

मिठाई आणि गोड पदार्थ नकोत 

मुलांना चॉकलेट जास्त देऊ नका. मिठाई, तळलेले पदार्थ, केक, पेस्ट्री आणि फास्ट फूड यासारखे हाय कॅलरीयुक्त पदार्थ कमीत कमी खा. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स घ्या. जसं की अंडी, मांस मासे आणि चिकन, दुधाचे पदार्थ आणि कडधान्य खा.  शक्यतो चरबीयुक्त पदार्थ टाळा.

आहारात ड्रायफ्रूट्स खायला द्या 

भारतीय आहारात सहसा चरबी जास्त असते. कॅनोला तेल, मोहरीचे तेल, तांदळाच्या कोंडाचे तेल आणि नट, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे यासारखे हेल्दी फॅट्स द्या. 

व्यायामाला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा

लहानपणी आणि तारुण्यात डायबिटिस  टाळण्यासाठी मुलांना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला द्या. मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा. म्हणजेच, टेलिव्हिजन किंवा इतर गॅझेट पाहण्याचा वेळ मर्यादित करा आणि शक्य असल्यास मोबाईल, टिव्ही पासून लांब ठेवा.

इन्सुलिन नीट नसल्याची लक्षणं 

हा उपाय महत्त्वाचा आहे कारण डायबिटिसची इतर कारणे आहेत, जसे की जवळच्या नातेवाईकाचा डायबिटिस किंवा इतर शारीरिक घटक जसे की इन्सुलिन रेसिस्टांस  शरीराच्या काही भागांवर, जसे की मानेच्या मागील बाजूस किंवा बगलेवर काळे डाग, इन्सुलिनचं काम नीट होत नाही हे दाखवतात. त्यामुळे डायबिटिसचा धोका खूप वाढतो. मुलांमध्ये अशी शारीरिक लक्षणं दिसायला लागली असतील तर त्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे.

लक्षात ठेवा

हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की मुलं आणि टिनएजर्स ना शारीरिक विकासासाठी पुरेसं पोषण आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालकांनी आपल्या मुलांना वजन कमी करण्याच्या डायटवर ठेवू नये. मुलांमध्ये निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी, संपूर्ण कुटुंबाने निरोगी जीवनशैलीचं पालन केले पाहिजे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories