व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पायाच्या टाचा फुटतात. करा हे रामबाण उपाय.

पायाच्या टाचा फुटल्या की त्रास होतो आणि दिसतात सुद्धा खराब. जर पायांच्या कोरडेपणाची काळजी घेतली नाही तर ते लवकरच टाचांना भेगा पडण्याचे कारण बनू शकतं. तुमच्या पायांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या.

बदलत्या ऋतूमध्ये अनेकदा लोक चेहऱ्याची विशेष काळजी घेतात, पण पाय विसरतात. परंतु पायांच्या बाबतीत निष्काळजीपणामुळे ते कुरूप तर बनतातच, शिवाय अनेक समस्याही निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे भेगा गेलेली टाच, जी नंतर खूप वेदनादायक बनते.

बहुतेकदा हिवाळ्यात टाचांना तडे जाऊन त्रास होतो. म्हणूनच, आपण वेळीच पायांची काळजी घेणे आणि काही उपाय करणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्याला ह्या टाचांना भेगा पडून होणाऱ्या त्रासापासून वाचवता येईल.  ह्या लेखात आम्ही तुम्हाला टाच फुटण्याची कारणे, त्यावरचे उपाय सांगणार आहोत.

टाच फुटण्याची कारणे / पायाच्या टाचांना भेगा कशामुळे पडतात?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की पायाच्या टाचांना भेगा का पडतात? किंबहुना, हार्मोन्समधील बदल आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडण्याने त्रास होतो.

काही लोकांना प्रत्येक ऋतूमध्ये हा त्रास सहन करावा लागतो. पायांना पडलेल्या भेगा सांगतात की तुमच्या शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वांची कमतरता आहे. महिलांना क्रॅक हील्सची जास्त काळजी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्हाला ह्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

व्हिटॅमिनची कमतरता आणि क्रॅक टाचांचं कनेक्शन समजून घ्या

जेव्हा आपल्या त्वचेला ओलावा नसतो तेव्हा ती कोरडी होते. कोरडेपणामुळे, कधीकधी टाचांमधून रक्त देखील येऊ लागते. ज्या लोकांची टाच वर्षभर फुटलेली असते. त्यांच्यामध्ये जीवनसत्त्वे B3, E आणि C ची कमतरता असू शकते. त्यांच्या कमतरतेमुळे केवळ टाचच ​​नाही तर शरीर कोरडे आणि निर्जीव होऊ लागते.

पायाला भेगा पडू नयेत असे वाटत असेल तर आत्तापासूनच करा हे उपाय

  • जर तुम्हाला तुमच्या टाचा सुंदर आणि मऊ ठेवायच्या असतील तर त्यांना मॉइश्चरायझ करत राहा.
  • आठवड्यातून किमान एकदा 20 ते 25 मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवा. आणि त्यानंतर स्क्रब करा आणि मॉइश्चरायझ करा.
  • ड्रायफ्रूटस् चा आहारात समावेश करा.
  • आंघोळ करताना पायाच्या टाचा स्क्रबरने स्क्रब करा. जेणेकरून त्यामध्ये साचलेली सर्व घाण सहज काढता येईल.
  • रात्री झोपण्यापूर्वी पाय नीट स्वच्छ करून झोपी जा.
  • कोणताही उपाय करण्यापूर्वी पाय स्वच्छ करा आणि नंतर मोजे घाला जेणेकरून घाण पायात जाणार नाही.

टाचा फुटायला लागल्या असतील तर हे घरगुती उपाय करून पहा

व्हिटॅमिन-ई तेल आणि कॅप्सूल

मित्रांनो, व्हिटॅमिन-ई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात जखमा बरे करण्याचे गुणधर्म आहेत, जे सौम्य जखमा बरे करण्यास मदत करतात. यासोबतच यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि हायड्रेटिंग गुणधर्म देखील आहेत. जे त्वचेची जळजळ कमी करते आणि कोरडी त्वचा हायड्रेट करते.

कसं वापरावं

तीन ते चार व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे तेल काढून ते फूटलेल्या टाचांवर लावा आणि थोडा वेळ मसाज करा. मसाज दिवसातून 2 ते 3 वेळा केला जाऊ शकतो.

तांदळाचं पीठ

तांदळाचं पीठ भेगा पडलेल्या त्वचेला बरे करू शकते. त्याचबरोबर लिंबाच्या वापरामुळे त्वचा मुलायम होते. त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि बरे करण्यासाठी मध फायदेशीर ठरू शकतो.

कसं वापरावं

एक चमचा तांदळाच्या पिठात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आपले पाय सुमारे 10 ते 15 मिनिटे पाण्यात ठेवा, नंतर या मिश्रणाने स्क्रब करा. ही कृती आठवड्यातून 2 वेळा केली जाऊ शकते.

तीळाचं तेल

तिळाच्या तेलात अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यात जखमा भरून काढण्याचा गुणधर्म देखील आहे. अनेक वेळा क्रॅक हिल्समध्ये संसर्ग झालेला असतो.  अशा परिस्थितीत तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर मानला जाऊ शकतो.

कसं वापरावं

एक चमचा तिळाचं तेल कोमट करा आणि टाचांवर हलके मसाज करा. रोज रात्री झोपताना हे केल्याने टाचांच्या भेगांपासून आराम मिळतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories