हि आहेत पिंपल्स येण्याची कारणे आणि उपाय !

Advertisements

पिंपल्स येण्याची कारणे – आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आहारावर लक्ष देत नाही, कारण जास्त वेळ नसल्यामुळे कोण आपल्या शरीरावर लक्षच देत नाही पण तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष देणे खूप गरजेच आहे.

आज आपण आजूबाजूला पाहतो तर प्रत्येक जण काही न काही चांगल्या प्रकारची कपडे घालत असतो म्हणजेच फॅशन. प्रत्येकाला आजच्या युगात चांगलं दिसायच आहे, आपला चेहरा चांगला दिसावा तस आपले गोरेपन असावा कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावर पिंपल्स नको आहेत तसेच चेहऱ्यावर जे ऑईल साचत असत ते सुद्धा नको वाटत.

तसेच चेहऱ्यावर काळे डाग असतात त्यामुळे आपली स्किन खूप डल दिसते त्यामुळे आपण किती जरी चांगली कपडे घातले ना की चेहऱ्यामुळे काही न काही आपल्या पर्सनॅलिटी कमीच दिसायला सुरुवात होते.

पिंपल्स येण्याची कारणे

आपल्या काही चुका असतात त्यामुळे हे प्रकार घडायला चालू होतात, जसे की आपल्याकडून लहानपणी काही न काही हातून चुका घडलेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

आयुष्यामधील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची एक स्टेज असते जी की वयाची १५ वर्षांपासून चालु होते, सर्वसाधारण आपल्या इकडची लोक अशी म्हणतात की मुले वयात आली आहेत त्यामुळे त्यांना पिंपल्स यायला सुरुवात होते पण याचा आणि पिंपल्स चा संबध जास्त नसून बऱ्यापैकी आहे. जसे की मुलीना या वयात मासिक पाळी यायला सुरू होते म्हणजेच मुलगी वयात आलेली असते.

मुली मासिक पाळी मध्ये जे खायच नाही ते खातात आणि जे खायच आहे ते खात नाहीत. तसेच मासिक पाळी च सोडले तर आपण आपल्या आहारावर सुद्धा नीट लक्ष देत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

पिंपल्स येण्याची कारणे

आपण आपल्या चेहऱ्याची काळजी नीट घेत नाही, आपल्या तोंडाची स्किन खूप सॉफ्ट असते आणि त्या सॉफ्ट स्किन ला आपण कसेही ओबडधोबड प्रकारे ट्रीट करतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची पूर्ण वाट लागून जाते.

तसेच वेळच्या वेळ चेहऱ्याला जे घटक पाहिजेत म्हणजे की आपल्या स्किन साठी जे घटक पाहिजे जो आहार पाहिजे तो जर घेतला नाही तर चेहरा खराब होयला सुरुवात होतो.

चला तर पाहू नक्की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स का येतात आणि तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही पिंपल्स येण्यापासून दूर राहवू शकता.

पिंपल्स येण्याची कारणे

पिंपल्स येण्याची कारणे
  • घाम येणे –

सकाळी उठल्यानंतर काही लोक फिरायला जातात तर काही लोक व्यायाम करतात, त्यावेळी आपले शरीर थंड असते पण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला घाम आणि त्या घामामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होतात.

तुम्हाला खरे सांगायचे म्हणले तर तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या अंगातील उष्णता बाहेर पडते, अंग पूर्णपणे गरम पडत आणि हळू हळू घाम यायला सुरू होने. घाम येणे म्हणजे की आपल्या शरीरात जे हानिकारक द्रव्य आहेत ते घामाद्वारे बाहेर पडायला सुरू होते.

शरीरातील ते द्रव्य घाण असते त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी काहीच नसतो त्यामुळे आपले शरीर तर चांगले काम करत आहे पण तुम्हाला जेव्हा घाम येतो तो फक्त आपण कोणत्या तरी कपड्याने पुसून टाकतो.

पिंपल्स येण्याची कारणे

खूप लोक आहेत की घाम आला की तो फक्त कपड्याने पुसून टाकतात अत्ता सकाळी आपण व्यायाम केला की नंतर अंघोळ करतोच पण जेव्हा आपण बाहेर जातो किंवा संधकाळी फिरायला व्यायाम करतो तेव्हा घाम येतो तर तुम्ही संध्याकाळी अंघोळ केली पाहिजे कारण अंघोळीने आपले शरीर फ्रेश राहते आणि जो घाम असतो तो निघून जातो.

पण घाम आला की तुम्ही लगेच अंघोळ करू नका आधी तो घाम पूर्णपणे ड्राय होऊद्या आणि नंतर अंघोळ करा, कारण जर तुम्ही घामात अंघोळ केली तर तुम्हाला सर्दी होऊ शकते. त्यामुळे घाम ड्राय झाला की अंघोळ करा त्यामुळे सुद्धा पिंपल्स नाहीत येणार.

  • डोक्यावरील केस व त्यामधील कोंडा –

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हेयर स्टाईल करत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का की कधी कधी आपल्या चेहऱ्यावर केस येतात, त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरू होते.

Advertisements

मुलींच्या बाबतीत सांगायला गेले तर त्यांची केले खूप मोठी असतात आणि ती केस नेहमी चेहऱ्यावर पडत असतात त्यामुळे केसामध्ये काही धूळ बसलेली असते ती चेहऱ्यावर येत किंवा केसाला जर आपण तेल लावले असले तर केस चेहऱ्यावर पडून पडून चेहरा तेलकट होयला चालू होतो.

केसात कोंडा झाल्यास ५ घरगुती उपाय

पिंपल्स येण्याची कारणे

आणि मुलांच्या बाबतीत सांगायला गेले तर जास्त तेल लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या केसातील कोंडा. कोंडा हा एक असा प्रकार आहे की जर झाला तर तुमच्या डोक्यात खाज होयला सुरू होते आणि तोच कोंडा तुमच्या चेहऱ्यावर पडतो आणि त्याने लगेच पिंपल्स यायला सुरुवात होते.

त्यामुळे केसांची निगा राखली पाहिजे, वेळच्या वेळी केस धुतले पाहिजेत त्यामुळे सुद्धा केसात कोंडा होत नाही. मुली तर रोज केस धुत नाहीत पण आठवड्यातून दोन वेळा केस धुतले पाहिजेत त्यामुळे केसात कोंडा होणार नाही.

  • ब्लो ड्रायर –

आजकाल आपण पाहत आहोत की प्रत्येक जण वेगवेगळ्या हेयर स्टाईल करत आहे, पण ती हेयर स्टाईल केल्यानंतर आपण हेयर सुद्धा सेट करतो, त्यावेळी ब्लो ड्रायर चा वापर करतो पन त्याने आपला चेहरा गरम पडतो, कारण त्यामधील जी हवा बाहेर पडत असते ती गरम असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेल साचते. ब्लो ड्रायर चा वापर करू नये त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

  • आहारातील बदल –
6 6

आहारातील बदल म्हणजेच आपण आजकाल कोणत्याही प्रकारचे अन्न खात आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याची दुर्दशा वाढत चालली आहे, जसे आपण चमचमित पदार्थ खातो.

जास्तीत जास्त मसाले पदार्थ, तेलाचे तळलेले पदार्थ आपण आहारात घेतो त्यामुळे आपल्याला पिंपल्स उदभवायला चालू होते. आपल्या शरीरात एक Oily Gland असते ती तेल साठवून घेण्याचे काम करत असते, त्यामुळे आपण जेवढे तेलकट खाणार तेवढे तेल साचणार आणि तेच तेल आपल्या चेहऱ्यावर परिणाम करणार त्यामुळे जास्तीत जास्त तेलकट, मसाले पदार्थ खायला टाळले पाहिजेत.

जर तुम्हाला पिंपल्स पासून दूर राहायचे असेल तर करा हे पिंपल्स जाण्याचे उपाय.

पिंपल्स येण्याची कारणे
  • पाणी पिणे –

दिवसातून तुम्ही कमीत कमीत चार लिटर पाणी पिले पाहिजे आणि जर जास्त पीत असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, कारण आपल्या शरीरातील जी oily gland असते ती जी तेल साचून ठेवण्याचे काम करत असते ते ऑईल साफ करण्याचे काम पाणी करत असते. पाणी पिल्याने तुमच्या चेहऱ्यावर तेल साचत नाही आणि तेल न आल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. तसेच पाणी पिल्याचा अजून फायदा आहे तो म्हणजे तुमची किडनी सुद्धा चांगल्या प्रकारे राहते.

  • कोणता प्रकारचा आहार घेणे –

तुमच्या आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या तसेच फळभाज्यांचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे आपला चेहरा सुद्धा फ्रेश राहतो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त फळे खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्याला खूप फायदा आहे त्यामुळे तुमची स्किन फ्रेश राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा पडत नाहीत. मसालेदार आणि तेलकट पदार्थांपासून जास्तीत जास्त दूर रहा.

पिंपल्स येण्याची कारणे
  • चेहरा धुणे –

आपण कोणत्याही कामानिमित्त बाहेर जातो त्यामुळे आपला चेहरा खराब होतो, बाहेर जास्त Pollution असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ बसते त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे दिवसातून तुम्ही पाच ते सहा वेळा चेहरा धुवा.

हे हि वाचा :

उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे

सांधेदुखीची कारणे, लक्षणे आणि उपाय !

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories