स्त्रियांच्या चेहऱ्यावर येणारे नको असलेले केस काढण्यासाठी करून बघा हे 6 घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी आपण खूप काळजी घेतो. आणि एखादया दिवशी आपल्याला चेहऱ्यावर आलेले केस दिसतात आणि मग सुरू होतात ते, नको असलेले चेहऱ्यावरील केस कसे कायमचे जातील ह्यांवर उपाय शोधणे. चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढणे हा स्त्रियांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर खूप जाड केस असतात (हिर्सुटिझम), जे अनुवांशिक किंवा हार्मोनल कारणामुळें येतात.

कारण काहीही असो, बऱ्याच स्त्रिया चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रासलेल्या असतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी त्या कायमस्वरूपी पर्याय शोधतात. 

बाजारात बरीच हेअर रीमुव्हल क्रीम आणि वॅक्सिन्ग सारखे पर्याय असले तरी त्यांचा एका वेळेनंतर त्रास व्हायला सुरुवात होते. त्याठिकाणची त्वचा काळी पडू शकते आणि त्वचा पहिल्यासारखी सुंदर दिसत नाही. अगदी लेसर वापरूनही स्त्रीच्या चेहऱ्यावरचे केस कायमचे कुणीही काढू शकत नाही.

चेहऱ्यावर चे केस काढून टाकण्यासाठी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अनेक प्रभावी उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे. ह्या उपायांचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील केस काढू शकता. आजच्या लेखातून आपण ते उपाय काय आहेत हे वाचू.

- Advertisement -

तसं बघायला गेलं तर सर्व स्त्रियांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर केस असतात, पण जेव्हा हे केस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असतात तेव्हा त्या स्थितीला हिरसूटिझम म्हणतात. हा एक आजार मानला जातो. महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि एन्ड्रोजनची वाढ सामान्य प्रमाणापेक्षा जास्त झाली की पुरुषांसारखे अंगावर केस वाढतात.

चेहऱ्यावर केस येण्याची कारणे/स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस का येतात

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील केस वाढण्याचं कारण अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलन आहे, पण ह्याव्यतिरिक्त इतर कारणे देखील असू शकतात. तुम्ही घेत असलेल्या एखादया गोळी किंवा औषधानेही अंगावर केस वाढायला लागतात. ह्याबाबत आपल्या डॉक्टरांचा किंवा स्त्री आणि त्वचारोगतज्ञाचा सल्ला घ्या.

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले नको असणारे केस ह्या घरगुती उपायांनी नक्की हळूहळू निघून जाऊ शकतात. म्हणजेच चेहऱ्यावरील केस काढण्याचे हे घरगुती उपचार अतिशय प्रभावी पद्धतीने काम करतात.

चेहऱ्यावर आलेले नको असलेले केस जाण्यासाठी काही घरगुती टिप्स

- Advertisement -

1. पपई

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे पपई. पपईत एंजाइम असतात, जे केस वाढू देत नाही. पपईचा वापर केल्याने तुमच्या केसांची वाढ मंदावते आणि ते पटकन दिसत नाहीत. ह्यासाठी 1-2 टीस्पून पपई आणि 1/2 टीस्पून हळद पावडर घ्या. पपई सोलून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ह्या पेस्टमध्ये हळद घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर 15 मिनिटे लावा. थोड्या वेळाने पाण्याने धुवा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा वापरा. फरक दिसू शकतो.

2. कोरफड आणि मोहरीचे तेल

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

कोरफड आणि मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याचा हा घरगुती उपाय प्रभावी आहे.

1/4 टीस्पून बेसन, 4 टीस्पून कोरफड जेल आणि 2 टीस्पून मोहरीचे तेल घ्या. ह्या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. तुमच्या शरीरावर जेथे केस असतील तेथे ही पेस्ट लावा. ही पेस्ट त्या जागी उलट लावा. 15-20 मिनिटे सुकू द्या. यानंतर, पेस्ट ज्याप्रमाणे स्वच्छ कापडाने लावली होती त्याच प्रकारे स्वच्छ करा. पेस्ट काढल्यानंतर ती जागा पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून टाका. आता ऑलिव्ह ऑइल ने त्वचेला मसाज करा. ही प्रक्रिया आठवड्यातून 3 वेळा करा. आणि हा उपाय किमान 3 महिने सतत करा. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्याचा हा उपाय खूप प्रभावी घरगुती उपाय आहे.

3. हळद

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्यासाठी हळदीचा वापर करा. 

- Advertisement -

1-2 टीस्पून हळद घ्या (तुमच्या शरीरानुसार प्रमाण वाढवा) आणि पाणी किंवा दूध घालून पेस्ट बनवा. पेस्ट इतकी ओली ठेवा की ती तुमच्या चेहऱ्याला सहज चिकटेल लावल्यानंतर ते 15-20 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा. ह्या उपायाने आपल्याला चेहऱ्यावर आलेल्या केसांपासून जवळजवळ कायमस्वरूपी सुटका मिळते.

4. बेसन आणि ओट्स

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरच्या केसांच्या समस्येवर घरगुती उपाय बेसन ओट्स चा उपाय करून बघा. चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी दुधात मिसळलेले बेसन आणि ओट्स लावा. चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यातही

हा उपाय मदत करतो. चेहऱ्यावर आलेले केस आपलं सौंदर्य कमी करतात आणि हे घरगुती उपाय कोणत्याही दुष्परिणामांशिवाय चेहऱ्यावर आलेले केस निघून जायला मदत करतात.

5. लिंबू साखर

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

लिंबू आणि साखरेने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढा लिंबू आणि साखर वापरून चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याचा घरगुती उपाय छान आहे.

2 टीस्पून साखर, 2 टीस्पून लिंबाचा रस, 5-6 टीस्पून पाणी घ्या. सर्व चांगलं मिसळा. साखर विरघळू देऊ नका. ते लगेच त्वचेवर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा. त्वचेला मसाज करत करत चेहरा स्वच्छ करा आणि नको असलेल्या केसांपासून सुटका होईल. हा उपाय 2-3 आठवडे करत रहा. तुम्हाला फायदा होईल.

तर ह्या उपायांनी हळुहळू पण कदाचित कायमस्वरूपी तुमच्या चेहऱ्यावरचे नको असलेले केस जातील.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories