घरगुती तेल मालीश केसांसाठी आवश्यक! तुमच्या केसांच्या समस्येनुसार ही 4 तेलं घरच्या घरी बनवा आणि फरक बघा.

केस गळायला लागले की कित्येक लोक अनेक उपाय करून बघतात. पण फारसा उपयोग होत नाही. केस मजबूत आणि घट्ट होण्यासाठी केसांना नियमित तेल लावायचं. जर तेल नैसर्गिक असेल तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

तेल आपल्या केसांना पोषण देते. त्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. म्हणूनच बहुतेक तज्ञ केसांना तेल लावायला सांगतात. केसांना तेलाने मसाज केल्याने केसगळती कमी होते. तसेच, हे तेल मालीश ही केसांची मूळ मजबूत करते.

नियमितपणे हेअर ऑइल मसाज केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते. याशिवाय तुमच्या टाळूला भरपूर पोषण मिळते. पण जर तुम्ही असाच मसाज केमिकल युक्त तेलाने केला तर ते तुमच्या केसांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केसांमध्ये नेहमी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हेअर ऑइल वापरावे. 

आज या लेखात आपण अशीच काही नैसर्गिक घरगुती तेल घेऊन आलो आहोत, जी तुमच्या केसांच्या विविध समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतात. चला जाणून घेऊया केसांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी केसांसाठी हेअर ऑइल कशी तयार करावीत?

1. केसांच्या वाढीसाठी असं तेल तयार करा

3 15

केसांच्या वाढीसाठी तुम्ही लॅव्हेंडर तेल आणि खोबरेल तेल वापरू शकता. हे तेल तयार करण्यासाठी, प्रथम लॅव्हेंडर तेलाचा 1 थेंब घ्या. आता त्यात 10 थेंब खोबरेल तेल टाकून मिक्स करा. यानंतर हे तेल शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होऊ शकते. हवं असल्यास, तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. पण प्रमाण लक्षात ठेवा.

2. केस गळत आहेत तर असं तेल बनवा

4 15

केसगळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी जोजोबा आणि कॅमोमाइल तेलाचा वापर केला जाऊ शकतो. हे तेल तयार करण्यासाठी, कॅमोमाइल आवश्यक तेलाचा 1 थेंब घ्या. आता त्यात 10 थेंब जोजोबा तेल मिसळा. यानंतर हाताला तेल चांगले चोळा. त्यानंतर हे तेल केसांना लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर आपले केस नैसर्गिक शैम्पूने धुवा. हे तुमचे केस गळणे कमी करेल. ज्यामुळे केस तुटणेही थांबेल. ही तेलं आयुर्वेदीक औषध दुकानात मिळतात.

3. केस पांढरे होत असतील तर हे तेल बनवा

5 15

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हेअर ऑइल घरीच तयार करू शकता. यासाठी ३ चमचे कोल्ड प्रेस केलेले खोबरेल तेल घ्या. आता हे तेल गरम करा. दरम्यान, तेलात 1 मूठभर कढीपत्ता घाला आणि एक उकळी आणा. तेलाला चांगली उकळी आली की थंड होऊ द्या. नंतर गाळून डब्यात ठेवा. हे तेल शॅम्पूच्या १ ते २ तास आधी केसांना लावा. यामुळे केस पांढरे होण्याच्या पासून सुटका मिळू शकते.

4. कोंडा दूर करण्यासाठी हेअर ऑइल बनवा

6 14

आजकाल कोंड्याची समस्या सामान्य झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही घरीही तेल तयार करू शकता. यासाठी २ चमचे आवळा पावडर घ्या. आता त्यात ३ चमचे खोबरेल तेल घालून मंद आचेवर चांगले गरम करा. थंड झाल्यावर या तेलाने केसांना मसाज करा. 20 मिनिटांनी केस धुवा. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावल्याने फायदा होतो.

तर केसांच्या विविध समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ही तेलं लावणे आवश्यक आहे. जर तेल नैसर्गिक पद्धतीने तयार केले असेल तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. पण लक्षात ठेवा जर तुमचे केस खूप गळत असतील, कोंडा असेल तर नक्कीच तज्ञाचा सल्ला घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories