आजकाल तुम्ही किती सुंदर दिसत असता ह्यांवर आपला आत्मविश्वास अवलंबून असतो. आणि सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणं ह्यात काही गैर नाही. आपल्यामध्ये सुधारणा केल्याने आपल्याला बरेच काही मिळू शकते. नुसता सुंदरतेचा देखावा ही काही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट असू शकत नाही, तरीही सुंदर दिसण्यासाठी आपल्याला आज काही सांगायचं आहे!( Good Habits for life)
आणि मग आपल्याला असे दिसून येईल की आपण अधिक आत्मविश्वासू झाला आहात. आपण करू शकणार्या बर्याच लहान लहान सुधारणांचा पण आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सर्वांगीण सकारात्मक प्रभाव पडतो. आजच्या लेखात काही निरोगी सवयींबाबत वाचूया. ह्या काही सवयी स्वतःला लावून घेऊन सुंदर दिसण्याची सुरुवात आजपासूनच करा. (How to look beautiful naturally)
पौष्टिक आहार

आपण ऐकलच असेल, ‘तुम्ही जे खात आहात तेच तुम्ही आहात.’किंवा खाल तसे व्हाल. हे खरं आहे! आपण चांगले खात असल्यास, नैसर्गिकरित्याच आपल्याला फायदे जाणवतील. पौष्टिक खाण्यामुळे शरीरात खूप मोठे बदल होतात. उदाहरणार्थ, आपल्याला आढळेल की आपली त्वचा अधिक चांगली तुकतुकीत दिसत आहे. जर आपला आहार समृध्द असेल ज्यामध्ये फळे, भाज्या, भरपूर पाणी समाविष्ट असेल तर आपण सौंदर्याच्या योग्य मार्गावर आहात. तूप , दूध, अंडी ह्यामधील व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स केस आणि नखे सुधारण्यात मदत करतात.
वाईट सवयी बंद करा

आपण चांगलं पौष्टिक खात आहात असा आहार घेऊन तुम्ही सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत आहात पण जर आपण वाईट सवयी काढून टाकत नसल्यास सगळ्या उपायांचे परिणाम कमीतकमी कमी होतील. आपण आपले रूप एकदम सुपरचार्ज करू इच्छित असालतर आपल्याला खाली खेचत असलेल्या गोष्टी आयुष्यातून काढून टाका.
तुमचे कोण गुन्हेगार आहेत, एक म्हणजे अल्कोहोल, ज्याचा तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरी म्हणजे सिगारेट जी देखील त्वचेवर परिणाम दाखवते. (सिगारेटचे इतर अनेक नकारात्मक परिणाम पण आहेतच). आणि ह्यासोबत इतर अनेक वाईट सवयी कमी करा. स्किन मधील कोलेजेन कमी करणारा आहार घ्या.
घाम करी काम

घाम गाळणे म्हणजे व्यायामाचे बरेच फायदे आहेत आणि खरोखरच तस बघायला गेलं तर कोणताही साईड इफेक्ट पण नाही. अगदी उद्यापासून आपण लवकर झोपेतून उठा आणि व्यायाम करायला सुरुवात करा. अगदी साधी योगासाने किंवा सूर्यनमस्कार घाला. हे आपली त्वचा सुधारेल. हे आपला आकार सुधारेल. आपला पवित्रा जसं की चालणे उठणे ग्रेसफुल बनवेल. खरंच, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की आपण बसून न राहता रोज व्यायाम केलाच पाहिजे.
आधुनिक पर्याय

मॉडर्न युगात गोष्टी सुंदर आणि सुबक दिसण्याचे बरेच मार्ग आहेत, विशेषत: 2021 मध्ये! उदाहरणार्थ कॉस्मेटिक सर्जरीचे भरपूर पर्याय आहेत. इंटरनेट वर अशा डॉक्टरांची ऑनलाईन भेट देखील घेऊ शकता. ज्यांनी अशी ऑपरेशन केली आहेत त्यांचा सल्ला घ्या. ह्याचे परिणाम सुंदर असू शकतात! आजकाल कित्येक चांगल्या ब्रँडची आधुनिक क्रिम आणि जेल देखील उपलब्ध आहेत. सौंदर्य एक मोठा उद्योग आहे, सावधतेने पावलं टाकत आपलं लक्ष्य गाठा.
ग्रूमिंग

शेवटी, उत्कृष्ट अशा टिप्स घेऊन सतत ग्रुमिंग करत रहा. अपडेट रहा. एखादी नवीन फॅशन करायला विसरू नका. नवीन हेअर स्टाईल करा. कपड्याची नवीन फॅशन करा. आरशासमोर स्वत: ला तयार होण्यासाठी दहा मिनिटे खर्च करु शकता. एकदा प्रयत्न तरी करा.
Hair problems