केसातून कोंडा कायमचा जाईल ! कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

केसातील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय- मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपले केस काळेभोर, रेशमी, मुलायम दाट लखलखीत असावेत. केस निरोगी असतील तर केसांची कोणतीही फॅशन आणि हेअरकट करता येतो. केसांमुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो.आज प्रत्येकजण केसांच्या समस्यांमुळे कंटाळून गेला आहे. केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न प्रत्येकजण विचारतो, “केसात वारंवार कोंडा होतो” ह्यांवर काही उपाय (Homemade Remedy For Dandruff) असेल तर सांगा. कोणते उपाय करून केसातील कोंडा कसा घालवायचा?

केसात कोंडा का होतो? केसात कोंडा होण्याची कारणे

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

धूळ, प्रदूषण आणि तीव्र तापमान ह्यासारख्या हवामानातील बदलांमुळे आपल्या टाळू वरील नैसर्गिक ढाल नष्ट होत चालली आहे. म्हणून आपले केस अनेक त्रासांमधून जात आहेत. परिणामी, आपली टाळू कोट्यावधी बॅक्टेरिया आणि बुरशीला उघडी पडलेली दिसून येते. नंतर हे बॅक्टेरिया आणि बुरशी आपल्या टाळूवर हल्ला करतात. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा (Drandruff) तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो. कोंडा हा केसांची नीट निगा, स्वच्छता न ठेवल्यास आणि त्वचारोगाच्या समस्यांमुळे देखील होऊ शकतो.

चला तर आजच्या लेखातून डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी (Dandruff Prevention) / केसातला कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय (Homemade Dandruff Remedy) जाणून घेऊया.

केसातील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

केसातील कोंडा जाण्यासाठी आवळा (Amla)

केसातील कोंडा

आवळ्यात असलेलं कॅरोटीन आपले केस निरोगी ठेवते. म्हणून केसांना पोषण देण्यासाठी खूप पूर्वीपासून आवळा तेल लावले जाते. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेल. (How To Remove Dandruff From Hair Permanently At Home) आवळा दररोज खाऊ शकता.

केसातील कोंडा जाण्यासाठी तेल मालिश (Hair Massage)

केसातील कोंडा

केसांत कोंडा झाला असेल तर तेलाची मालिश करण्याचा एक मोठा फायदा आहे. अहो डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी (Way To Remove Dandruff) घरगुती उपायांबद्दल बोलताना तेलाच्या मालिशचा उल्लेख तर व्हायलाच हवा. कोमट तेलाने केलेली मालीश डोक्याच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि रक्ता भिसरण वाढते. ज्याद्वारे केस निरोगी, दाट, लांब आणि कोंड्यापासून मुक्त होतात. म्हणून आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. एक चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवार बोटांनी मालीश करा कोंडा काही दिवसांत निघून जाईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी लिंबाचा रस (Lemon Juice)

केसातील कोंडा

लिंबू ह्या दिवसांत रसदार मिळतात. लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते . केसांत कोंडा झाला असेल तर कोमट mतेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना मालिश करा. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे थांबेल. याशिवाय तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिसळून केस धुवू शकता. किंवा लिंबू हळूवारपणे केसांना घासू शकता.

केसातील कोंडा जाण्यासाठी मेथीचे दाणे (Methi Seeds)

केसातील कोंडा

मेथीमध्ये निकोटीनिक ॲसिड आणि प्रथिने भरपूर असतात, यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. रात्रभर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ते केसांत लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसांतला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. मेथीच्या ह्या उपायाने बआपले केस मजबूत बनतील आणि गळणार नाहीत.

केसातील कोंडा जाण्यासाठी केसांची स्वच्छता

केसातील कोंडा

जर डोक्याच्या त्वचेची नियमित साफसफाई होत नसेल तर डोक्यात कोंडा बनतो. कोंडा होणे ही समस्या केस स्वच्छ न घुतल्यास घाम ग्रंथी मोकळ्या होत नाहीत. म्हणून केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी (How To Remove Dandruff Permanently) केस साफ करणे फार महत्वाचे आहे. यासाठी, हर्बल शैम्पूने किंवा घरगुती शिकेकाई वापरून दर तिसर्‍या दिवशी केस धुवावेत. केस धुण्याआधी केसांना कोमट तेलाने मालीश करायला विसरु नका.

दही लावा कोंडा घालवा (Dahi For Hairs)

केसातील कोंडा

एक चमचा दही केसांना लावा आणि एक तास ठेवा आणि मग डोके धुवा.

केसातील कोंडा जाण्यासाठी कोरफड (Aloe Vera)

केसातील कोंडा

कोरफड गर लावा कोंडा घालवा. एलोवेरा जेल किंवा कोरफड गराने मालिश केल्याने केसांच्या आणि डोक्याच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

केसातील कोंडा जाण्यासाठी कडूलिंबाची पाने (Neem Leaves)

केसातील कोंडा

डोक्याच्या त्वचेला पाणी न लावता कडुलिंबाची पाने चोळा आणि थोड्या वेळाने डोके धुवा.

केसातील कोंडा जाण्यासाठी डाळीचे पीठ

केसातील कोंडा

केसांत कोंडा झालाय काय कराल , दही आणि हरभरा डाळीचे पीठ मिक्स करावे आणि हलक्या हातांनी डोक्याच्या त्वचेवर मालिश करा. असे केल्याने केसातला डँड्रफ किंवा कोंडा कमी होतो.

केसातील कोंडा जाण्यासाठी तुळस (Basil)

केसातील कोंडा

केसांत कोंडा होत असेल तर तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास डोक्याच्या त्वचेवर लावा. यानंतर हर्बल शैम्पूने धुवा.

.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories