प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा टवटवीत, डाग नसलेला नितळ आणि सुंदर असावासा वाटतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशिनीस्ट रुजुता दिवेकर डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कलपासून सुटका होण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आणि सोप्या टिप्स वापरायला सांगतात.
डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कलपासून सुटका होण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे किंवा काळे डाग दिसतात तेव्हा डोळ्यांचे सौंदर्य बिघडते. ही काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स केवळ डोळ्यांचे सौंदर्यच कमी करत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याचे स्वरूप बदलतात. डार्क सर्कलची अनेक कारणे असू शकतात जसे की थकवा, झोपेचा अभाव किंवा कोणताही आजार.
ह्या सगळ्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ शकतात. त्याचबरोबर ही डार्क सर्कल कमी करणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत, सेलिब्रिटी पोषणतज्ञ रुजुता दिवेकर डार्क सर्कलपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि सोप्या टिप्स वापरण्याची शिफारस करतात, ज्या सहजपणे फॉलो केल्या जाऊ शकतात.
डार्क सर्कल कमी करेल हर्बल टी

ज्यांना मोठी मोठी डार्क सर्कल्स आहेत त्यांच्यासाठी रुजुता दिवेकर तुळशीची पाने, आले आणि केशरपासून बनवलेला हर्बल चहा प्यायला सांगतात. रुजुताच्या मते, दिवसातून दोनदा हा हर्बल टी पिणे फायदेशीर आहे. नैसर्गिक घटकांनी समृद्ध, असा हा चहा तुमच्या डार्क सर्कल्सच्या समस्येवर सोपा उपाय आहे. रुजुता गोडपणासाठी या चहामध्ये मध किंवा गूळ घालयला सांगतात.
नैसर्गिकरीत्या आपली त्वचा स्वच्छ करा

रुजुता दिवेकर पोषणाबरोबरच त्वचेची काळजी घेण्याचा एक चांगला मार्ग सुचवतात. चेहरा आणि डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा स्वच्छ करण्यासाठी बेसन आणि ताज्या दुधापासून बनवलेली पेस्ट वापरायचा सल्ला त्या देतात. ह्या होममेड क्लींजरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर साबण किंवा फेस वॉश वापरू नका.
शेंगदाणे आणि गूळ खा

पौष्टीक चरबीयुक्त शेंगदाणे आणि लोहयुक्त गूळ खाणे डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. रुजुता दिवेकर डार्क सर्कल कमी करण्यासाठीह्या दोन्हीचे सेवन करायला सांगतात. रुजुता दिवेकर म्हणाल्या की संध्याकाळी हलकी भूक शांत करण्यासाठी नाश्ता म्हणून गूळ, शेंगदाणे आणि खोबरं हा उत्तम पर्याय आहे.
मस्त डुलकी घ्या

सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या या टिप्समध्ये रुजुता दिवेकर यांनी चांगल्या झोपेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे जाण्यासाठी दुपारी थोडी झोप घ्या. रुजुता दुपारी किमान 30 मिनिटे पॉवर नॅपघ्यायला सांगतात. दुपारच्या जेवणानंतर आलेला आळस आणि सकाळपासून दुपारच्या कामाचा थकवा 20-30 मिनिटांच्या झोपेने संपतो, ज्यामुळे तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल आणि त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येईल.
(वाचा : दुपारची झोप घातक आहे का?)
टोमॅटो

टोमॅटो हा लाइकोपीनचा उत्तम स्त्रोत आहे जो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. डार्क सर्कल कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
काकडी

काकडीचा वापर कोल्ड कॉम्प्रेस म्हणून केला जातो, त्यामुळे डार्क सर्कलपासून मुक्त होण्यासाठी काकडी उपयुक्त ठरू शकते. तसेच, काकडीमध्ये त्वचा हलकी करणारे सौम्य तुरट गुणधर्म असतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे काढण्यासाठी काकडी कापून डोळ्यांवर ठेवा. हे दिवसातून दोनदा करा. ताज्या काकडीचे जाड तुकडे करून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर ते डोळ्यांवर सुमारे 10 मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने धुवा.