या 7 गोष्टींमध्ये दडले आहे तुमचे केस गळतीचे मुख्य कारण ! आजच थांबवा . . .

स्त्री व पुरुषांमध्ये मुख्यत्वे आता केस गळतीचे (hair loss) प्रमाण वाढत चालले आहे. सकस आहाराचा अभाव, वाढते प्रदूषण, हार्मोन्समध्ये बदल, अनुवंशिकता याच बरोबर केस गळतीची अनेकविध कारणे असू शकतात.

आपल्या आहारात घेतल्या जाणाऱ्या काही अन्नपदार्थांमुळे केस गळती मोठ्या प्रमाणावर होऊ लागते याबद्दलचे आपल्याला ज्ञान नसते. काही असे अन्नपदार्थ असतात ज्यामुळे केस गळती जास्त प्रमाणात होऊ लागते.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला त्याच काही पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहोत.

केस

सुंदर, मजबूत, काळे, घनदाट केस प्रत्येकाचे स्वप्न असते. अगदी बालपणापासूनच आपली आई आपल्या केसांची चांगली निगा राखते. केसांना वेळेवर तेल लावणे, केस धुवणे अशा प्रकारे काळजी घेतली जाते. मात्र जसजसे मुलाचे वय वाढते व मूल मोठे होऊ लागते तसतसे केसांकडे स्वतः लक्ष देणे सुरू होते व अशावेळी नेमके केसांची योग्य निगा व काळजी राखली जात नाही. त्यामुळे केस गळती प्रचंड प्रमाणात सुरू होते (signs you re balding).

केसगळती सुरु झाली (how to prevent premature balding) की केसगळती थांबवण्याकरता बाजारात मिळत असलेली वेगवेगळ्या कंपनीची व ब्रँड्सची हेअर टॉनिक्स, तेल, शैम्पू विकत आणुन त्याचा मारा केसांवर केला जातो. हे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरून आपण केस गळती थांबवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र बरेचदा केस गळती थांबवण्याचे दावे करणारे सर्व प्रॉडक्ट्स देखील कुचकामी ठरतात. केस गळती नियंत्रणात आणण्यासाठीच्या महागड्या ट्रिटमेंट बरचदा अपयशी ठरतात याचे प्रमुख कारण आपल्या आहारामध्ये आहे.

बदलती जीवनशैली आणि प्रदूषण हे आजकाल मोठ्या प्रमाणात केस गळतीचे कारण बनत आहे. चांगला सकस आहार, सर्व पोषण तत्वांचा समावेश जर आपल्या जेवनात असेल तर केस गळती होणार नाही. मात्र बरेच उपाय करुनही काही लोकांमध्ये केस गळती थांबता थांबत नाही. आपण चुकीच्या पदार्थांचा आहारात समावेश व भडीमार केल्याने केस गळतीला कारण आपण आहारात घेतलेले काही पदार्थ ठरू शकतात.

केस

कोणते आहे ते पदार्थ ज्यामुळे केस गळती वाढते.

जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करणे :

केस

बर्‍याचशा लोकांना गोड पदार्थ खुप आवडते. साखर व साखरयुक्त गोड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर केसांच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक मानले जाते. साखरेचा जास्त वापर केल्यामुळे डायबिटीज आणि चरबी वाढण्याचा ज्या प्रमाणात धोका असतो त्याच प्रमाणात सर्व स्त्री-पुरुषांमध्ये केस गळतीचे मुख्य कारण साखर जास्त प्रमाणात खाणे हे देखील संशोधनातुन आढळून आले आहे.केसगळती होवि नये याकरता आहारात साखरेचा कमीत कमी समावेश करावा

डायट सोडा :

3 30

डायट सोड्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट असते. हे आपल्या केसांसाठी अतिशय हानिकारक असतात. डायट सोड्यामुळे केसांची मुळे अशक्त होतात. डाईट सोड्याचे अत्याधिक सेवन केल्यामुळे आपल्या केसांची मुळे कमजोर होतात त्यासोबतच आपले हेअर फॉलिकल्स देखील कमजोर होतात. जर आपले केस जास्त प्रमाणात गळू लागले आहे तर आपण डाएट सोडा खाणे बंद करा.

हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ :

4 28

हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे खाद्यपदार्थ आपल्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवतात. रिफाइंडेड पीठ, ब्रेड, तेल अशा पदार्थांमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आढळते. बेकरी पदार्थ, साखरयुक्त पदार्थ व मैद्याच्या पदार्थ शरीरात ग्लायसेमिक इंडेक्स वाढवते त्यामुळे इन्सुलिन लेव्हल अत्याधिक वाढते व हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्याची परिणती केसांचे फॉलिकल्स कमजोर होऊन केस गळण्यामध्ये होत.

हे हि वाचा : केस वाढवण्यासाठी 10 सोप्पे आणि प्रभावी उपाय

मासे व सी फुड्स :

6 26

माशांमध्ये मर्करी जास्त प्रमाणात असते. मर्करी लेव्हल शरीरामध्ये वाढल्यास केस अचानकपणे गळू लागणे सुरू होते त्यामुळेच माश्यांसोबतच अन्य सी फुड देखील जास्त प्रमाणात खाऊ नये. मासे व सी फूड जास्त खाल्ल्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढते.

हे हि वाचा : केस दाट होण्यासाठी उपाय

कच्चे अंडे :

7 21

अंडी हा मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा स्त्रोत असला तरी कच्चे अंडे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कच्चे अंडे सेवन केल्यास आपल्या शरीरामधील बायोटीनचे प्रमाण कमी होते. बायोटीन हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली प्रोटीन ‘कॅरोटीन’ तयार करण्यासाठी आवश्यक असते. जास्त प्रमाणात कच्ची अंडी खाल्ल्यामुळे बायोटिन नष्ट होते. त्यामुळे कॅरोटिन निर्मिती होत नाही व केस गळू लागतात.

जंक फुड :

8 18

बऱ्याच लोकांना जंकफूड खाण्याची आवड असते. पिझ्झा- बर्गर यासारख्या जंक फूड्समध्ये सॅच्युरेटेड व मोनोसॅच्युरेटेड फॅट असते. जे आपल्या शरीरामधील चरबी वाढवु लागते. त्यासोबतच हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असलेले बॅड कोलेस्टेरॉलची निर्मिती करण्यास सहाय्य करते.

यासोबतच केसांचे आरोग्यकरता देखील हे हानिकारक आहे. जंक फूड जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या केसांखालची त्वचा म्हणजेच स्कॅल्प जास्त प्रमाणात तेल सोडू लागते. ज्यामुळे त्वचेवरील पोअर्स बंद होतात. त्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स अशक्त होऊन तुटू लागतात.

जर आपल्या केसांची अचानक एकाएकी केस गळती होऊ लागली असेल तर आपण आपल्या आहारामध्ये या सात पदार्थांपैकी कोणते पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत आहात याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण आपण जे पदार्थ सेवन करतो त्याचा आपल्या शरीराच्या विकासावर व वाढीवर परिणाम होतो.

केस

हे सात अन्नपदार्थांचे सेवन कमी केल्याने किंवा बंद केल्यानंतर देखील आपले केस गळण्याची थांबत नसतील तर डर्मेटोलॉजिस्टकडे जाऊन आपण आपल्या रक्तचाचणीद्वारे हार्मोनची तपासणी करावी.

बरेचदा एकाएकी अचानक होणारी केस गळती ही शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये असलेल्या गंभीर आजाराचे सूचित करणारी देखील असू शकते. अनुवांशिकतेमुळे देखील केसगळती होते हेही लक्षात घेतले पाहिजे.

हे हि वाचा : केस गळतीवर घरगुती उपाय

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories