चेहरा लोक पाहतच राहतील. रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावून चेहरा बनवा आकर्षक!

- Advertisement -

रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावाल तर तुम्हालाही चमकदार, सुंदर त्वचा हवी मिळेल.  तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावू शकता. आपण ह्याविषयी अधिक माहिती घेऊया.

रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावल्याने हे फायदे मिळतात

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. केसांसोबतच त्वचेसाठीही जे खूप फायदेशीर मानले जातात. त्वचेची जळजळ, मुरुम, डाग आणि सुरकुत्या व्हिटॅमिन ई लावून कमी होऊ शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा त्वचेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल केव्हाही लावू शकता.

पण व्हिटॅमिन ई कॅप्सूल रात्री चेहऱ्यावर लावणे अधिक फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन ई कॅप्सूल रात्री लावल्याने चेहरा सुधारतो, चेहरा मुलायम आणि चमकदार होतो. चला, जाणून घ्या व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर रात्रभर लावण्याचे फायदे व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर रात्रभर लावल्याने कोणते फायदे होतात

हायपरपिग्मेंटेशन कमी होईल

त्वचा रंग बदलून काळी पडलेली तुम्हाला गेले काही दिवस जाणवत असेल तर हायपरपिग्मेंटेशनचा त्रास तुम्हाला आहे. त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन वाढल्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो.  हायपरपिग्मेंटेशन आणि मेलास्मा ह्यालाच म्हणतात. जर तुमच्या चेहऱ्यावर हायपरपिग्मेंटेशन असेल तर व्हिटॅमिन ई तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रोज रात्री चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

- Advertisement -

म्हातारपण आलंय त्वचेला

व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर रात्रभर लावल्यास वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात. कारण ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना जास्त सुरकुत्या आणि बारीक रेषा त्वचेवर आल्याचं जाणवतं. व्हिटॅमिन ईमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात. ते वृद्धत्वाची चिन्ह कमी करतात आणि सुरकुत्या घालवतात. जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर तुम्ही चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई लावून रात्रभर ठेवा.

त्वचेची सूज कमी करा

जर तुम्हाला ब्रेकआउट्ससह त्वचेला सूज येत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटी इन्फ्लमेशनरी गुणधर्म असतात, जे त्वचेला शांत करतात. हे गुणधर्म त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

ड्राय स्किन असेल तर

त्वचा मऊ, मुलायम असावी. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुमच्यासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट करतात. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि ती मऊ होते. व्हिटॅमिन ई कोरडेपणामुळे होणारी सोरायसिस आणि एक्जिमाची लक्षणं कमी होतात. यासाठी तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई लावू शकता.

ह्या कॅप्सूलने त्वचेवरची घाण काढून टाका

व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेला खोलवर स्वच्छ करतं.  व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर रात्रभर लावल्याने छिद्रांमधील घाण सहज निघते. यामुळे त्वचा ताजी आणि गुळगुळीत दिसते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावूनही मुरुमांचा त्रासही कमी होतो.

- Advertisement -

डार्क स्पॉट्स कमी करा

चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स घालवण्यासाठी किती क्रीम्स बाजारात मिळतात.  त्याने फक्त अनेकदा पिंपल्सच कमी होतात, पण चेहर्‍यावर त्याचे डाग राहतात. अशा वेळी जर तुमच्या चेहऱ्यावरही मुरुमांचे डाग असतील तर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावू शकता. रोज रात्री काळ्या डागांवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.

तर व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर रात्रभर लावणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे हायपरपिग्मेंटेशन कमी करू शकते, वृद्धत्व थांबवू शकते, कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊ शकते, त्वचेची जळजळ शांत करू शकते आणि त्वचा खोलवर स्वच्छ करू शकते. याशिवाय रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई लावल्याने मुरुमांच्या डागांपासूनही सुटका मिळते. ह्याकरता पॅच टेस्ट करायला विसरू नका.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories