पावसाळयात केस खूप गळतात काही ताबडतोब करता येतील असे उपाय सांगा.

साधारणपणे केस गळणे ही पावसाळ्यात नेहमीची समस्या आहे. कारण या ऋतूतील आर्द्रता किंवा ओलावा केसांवर सर्वात जास्त परिणाम करतो. बहुतेक लोकांना वाटतं केस फक्त उन्हाळ्यात घामामुळे गळतात. पण सध्या प्रदूषणामुळे पावसाचं पाणीही दूषित झालं आहे. पावसाच्या पाण्यात इतका रासायनिक प्रभाव किंवा कार्बन डाय ऑक्साईड असतो की पावसात भिजल्यानंतर आरोग्याबरोबरच केसांचही नुकसान होतं.

यासाठी पावसाळ्यात अवेळी केस गळणे टाळण्यासाठी आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी आहाराबरोबरच अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे केस मजबूत होऊ शकतात. यासाठी अशा काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून केस काळे, मजबूत, जाड आणि रेशमी होतील. पावसाळ्यात केस गळणे थांबवण्यासाठी काय करावं?

पावसात भिजल्यावर शॅम्पू

3 9

आपले केस पावसात ओले झाले की घरी आल्यावर फक्त सुकवणे हा केसांची काळजी घेण्याचा योग्य मार्ग नाही. कारण पावसाच्या पाण्यात असलेले केमिकल आणि कार्बन केसांना हानी पोहोचवतात आणि अकाली केस गळतात. हे टाळण्यासाठी केसांना छत्री किंवा रेनकोटने झाकून ठेवा. यानंतर, घरी आल्यानंतर, डोक्यावरून आंघोळ करा किंवा सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांवरचा प्रदूषित पाण्याचा परिणाम निघून जाईल.

कोमट पाण्याने पावसात भिजलेले केस असे धुवा

4 8

एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचे केस पावसात ओले झाले तर घरी येऊन लगेच आंघोळ करा. कारण आजकाल प्रदूषणामुळे पावसाचं पाणीही हवेतल्या केमिकल्समध्ये मिसळलं जातं जे केसांचे नुकसान करतं. पण पाणी कोमटघ्या कारण उबदार पाणी बॅक्टेरिया मारते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त गरम पाण्याने केस धुवू नका.

- Advertisement -

टाळू कोरडी ठेवा

5 8

पावसाळ्यात, आपली डोक्याची टाळू कोरडी ठेवणे सर्वात महत्वाचं आहे. कारण हवामानाची आर्द्रता आणि केसांचा ओलावा या दोन्हीमुळे डोक्यातील कोंडा, बुरशीजन्य संक्रमण किंवा खाज यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे केस गळणे सुरू होते. म्हणूनच, डोक्याची टाळू नेहमी कोरडी ठेवा. हेअर ड्रायर वापरा किंवा केस नीट पुसा.

केस सरळ करणे किंवा केस कुरळे करणे

6 8

हवामानातील ओलावामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. अशा वेळी केस सरळ करणे किंवा केस कुरळे करणे ह्याने केस लगेच मुळापासून तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळयात हे करणं टाळा.

शरीर हायड्रेटेड ठेवा

7 8

आता पावसाळा असेल तर जास्त पाणी पिण्याची काय गरज आहे असा लोक अनेकदा विचार करतात. पण खरं हेच आहे की या हंगामातही स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचं आहे.

केस लहान कापावेत का?

8 6

पावसाळ्यात केस पटकन सुकत नाहीत, तर तुम्ही लवकर सुकविण्यासाठी शॉर्ट कटची केशरचना करू शकता. ह्यामुळे केस विंचरणे सोपे होतं आणि पटकन सुकतात. आणि गळत नाहीत.

- Advertisement -

चांगला आहार

9 5

टेलोजेन इफ्लुवियम हा एक हेअर प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे केस गळतात. यासाठी आहार नेहमी पौष्टिक असावा. आपण आपल्या आहारात प्रथिनं, व्हिटॅमिन ई, हिरव्या भाज्या, शेंगदाणे, अंडी, सॅल्मन, गाजर, मसूर, दुग्धजन्य पदार्थ, लोह, ओमेगा -3 फॅटी ॲसिड, लोह, डाळी इत्यादींचा समावेश करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी काय करू नये?

10 2

ओले केस विंचरू नका : ओल्या केसांना कंगव्याने विंचरण्याची चूक कधीही करू नका, यामुळे केस तुटतात आणि गळतात.

हेअर ड्रायर वापरू नका : पावसाळ्यात ओलाव्यामुळे केसांची मुळे थोडी कमकुवत झालेली असतात, यामुळे केसांसाठी हेअर ड्रायर न वापरणे चांगलं.

इतरांसोबत तुमचा कंगवा शेअर करू नका : पावसाळा असो किंवा उन्हाळा-हिवाळा हंगाम, तुमचा केसांचा कंगवा कोणासोबतही शेअर करू नका आणि इतरांचा कंगवा वापरू नका. जर एखाद्याला कोंडा झाला असेल किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्वचेचा संसर्ग झाला असेल तर तुम्हालाही तो होऊ शकतो.

- Advertisement -

ओले केस बांधू नका : काही स्त्रियांना केस ओले असताना बांधून ठेवण्याची सवय असते. परंतु या दमट हवामानात ओले केस बांधून ठेवल्याने वाईट वास येण्याची शक्यता असते, तसेच केसांची मुळे कमकुवत होऊन तुटतात, ज्यामुळे केस नेहमी आधी सुकवले पाहिजेत आणि नंतर बांधले पाहिजेत.

तुम्हाला पावसाळयात केस गळण्याची समस्या गंभीर असल्यास त्वचारोगतज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्टशी संपर्क साधा.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories