हिवाळ्यात टाचांना तडे जातात, भेगा पडतात ह्यावर उपाय करा. हे लक्षात ठेवा.

हिवाळ्यात सर्दी, खोकला किंवा ताप येणे खूप सामान्य आहे. याशिवाय हिवाळ्याच्या मोसमात लोकांना बॅक्टेरिया आणि विषाणूंची चिंता करावी लागते. इतकंच नाही तर हिवाळ्यात त्वचा खराब होते. ह्या ऋतूमध्ये त्वचा अनेकदा कोरडी, निर्जीव आणि खडबडीत होते. पायाच्या टाचांनाही तडा जाऊ लागतो. 

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याच्या समस्येला बहुतेकांना सामोरे जावे लागते. भेगा पडलेल्या टाचांमुळे पायांचे सौंदर्य कमी होते आणि वेदनादायक देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की हिवाळ्यात टाच का फुटतात? हिवाळ्यात टाच फुटण्याचे कारण काय आहे? 

हिवाळ्यात टाचांना भेगा पडतात कारण….

हिवाळ्यात घोट्याची त्वचा कोरडी आणि जाड होते. ह्या स्थितीत घोट्याला तडे जाण्यास सुरुवात होते. टाचांवर क्रॅक पडू शकतात. टाचांमध्ये वेदना जाणवू शकतात आणि पायाचं सौंदर्य कमी होतं. 

चप्पल किंवा सँडल घालणं 

हिवाळ्यात तुम्ही खुल्या टाचांचे शूज किंवा चप्पल घातल्यास, हिवाळ्यात तुमच्या टाचांना भेगा पडू शकतात. कारण उघडे शूज, चप्पल घातल्याने टाचांच्या त्वचेवर धूळ, माती आणि प्रदूषण जमा होते. यासोबतच थंड वाऱ्याचाही त्वचेवर परिणाम होतो. म्हणूनच हिवाळ्यात बंद शूज घालावेत. यामुळे तुमची टाच फुटणार नाही.

गरम पाण्याने आंघोळ करणे 

जर तुम्ही हिवाळ्यात खूप गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या टाचांना तडे जाऊ शकतात. गरम पाण्याने त्वचा कोरडी होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या टाच कोरड्या, निर्जीव आणि जाड होऊ शकतात. टाच फुटू नयेत म्हणून हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. आंघोळ केल्यावर लगेच आपल्या टाचांना मॉइश्चरायझ करा.

हार्ड साबण वापरणे

जर तुम्ही आंघोळीसाठी हार्ड म्हणजेच केमिकल वाला साबण वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या टाचांना तडे जाऊ शकतात. अशा वेळी आपण केवळ नैसर्गिक घटकांपासून बनविलेले साबण वापरावे. हिवाळ्यात तुम्ही कोरफड, ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई किंवा खोबरेल तेलापासून बनवलेला साबण वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल आणि टाचांना तडे जाणार नाहीत.

कोरडी त्वचा

अनेकदा प्रत्येकाला हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो. पण जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर हिवाळ्यात तुमच्या टाचांना तडे जाऊ शकतात. वास्तविक हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि जाड होते. यामुळे, टाच खडबडीत आणि फ्लॅकी बनते.

बराच वेळ उभे राहणे

जर तुम्ही हिवाळ्यात शूज आणि चप्पल न घालता बराच वेळ फरशीवर उभं राहिल्यास, तुम्हाला टाच फुटण्याच्या समस्येची चिंता करावी लागेल. म्हणूनच हिवाळ्यात नेहमी मोजे घालावेत.

शारिरीक त्रास असेल तर 

ह्या शिवाय काही आजारांमुळे टाचांना भेगा पडण्याचा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा, मधुमेह, एक्जिमा, हायपोथायरॉईडीझम आणि सपाट पाय यामुळे हिवाळ्यात टाचांना भेगा पडू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ह्या सर्व समस्या सतावत असतील तर तुमच्या टाचांची विशेष काळजी घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories