आंघोळीनंतर होणाऱ्या ह्या चुका बिघडवतात तुमची त्वचा आणि केसांची गुणवत्ता. सुंदर दिसायचं असेल तर बदला आपली सवय.

दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करायलाच हवी. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं. आंघोळीने शरीर स्वच्छ होतं आणि तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. पण अनेकदा आपण आंघोळीनंतर अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या केसांचंच नुकसान नाही तर त्वचेचही अनेक प्रकारे नुकसान होतं.

आपल्या सर्वांना सुंदर आणि आकर्षक दिसायचं आहे. आपला चेहरा आणि केस सुंदर तर आपण सुदंर दिसतो. पण आंघोळीनंतर केलेल्याकाही चुका तुमचं सौंदर्य खराब करू शकतात. या लेखात आपण अशाच काही चुका जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही आंघोळ केल्यानंतर टाळल्या पाहिजेत.

आंघोळीनंतर करताय ह्या गोष्टी तर त्वचा आणि केस बनतील कायमचे खराब

आंघोळीनंतर केसांवर टॉवेल गुंडाळणे

3 50

आंघोळ केल्यानंतर टॉवेल गुंडाळणे केसांसाठी खूप नुकसान करणारं आहे. केस गाळण्याचं हे एक मोठं कारण आहे.आंघोळीनंतर केस टॉवेलमध्ये बांधून वाळवल्यास केसांचं खूप नुकसान होतं. असं केल्याने केसांची मूळ कमकुवत होतात. असं करण्याऐवजी, टॉवेलने केस हलके कोरडे करा आणि केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या.

चेहऱ्यावर/केसांना टॉवेल घासणे

4 50

अनेकदा लोक आंघोळीहुन येतात तेव्हा ते अंग पुसताना चेहऱ्यावर असलेलं पाणी पुसण्यासाठी टॉवेल चेहऱ्यावर घासतात. यामुळे त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्याला इजा होऊ नये म्हणून टॉवेल त्वचेवर घासण्याऐवजी टॉवेलच्या पृष्ठभागावर हळूवारपणे चेहरा टिपून घ्या.

केमिकल्सयुक्त क्रीम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर

5 44

आंघोळीनंतर त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे फार महत्वाचे आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकजण आंघोळीनंतर त्वचेवर त्वचेसाठी अपायकारक असे मॉइश्चरायझर आणि क्रीम लावतात.

ज्याने फक्त तुमच्या त्वचेचं अतोनात नुकसान होतं. त्याऐवजी, त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. तिळाचे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तिळाच्या तेलाचे फक्त 4-5 थेंब घ्या आणि त्वचेला मसाज करा.

ओले केस विंचरणे

6 36

अनेकजण आंघोळीनंतर केस विंचरतात. त्यांना वाटतं की केस ओले असताना विंचरले तर नंतर विंचरावे लागणार नाहीत. पण तसं अजिबात नाही. असं केल्याने केसांचे नुकसान होते तसेच केसांचा दर्जाही खराब होतो. त्यामुळे हे करू नका आणि केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या, त्यानंतर केस कंगव्याने विंचरा.

मॉइश्चरायझ नाही करत

7 32

आपण सर्वजण आंघोळीनंतर आपला चेहरा मॉइश्चरायझ करतो. चेहऱ्याची काळजी घेतो पण आपल्या उरलेल्या शरीराला मॉइश्चरायझ करत नाही. आंघोळीनंतर तुमचं संपूर्ण शरीर कोरडं होतं.

त्यामुळे चेहऱ्याची त्वचा तसेच संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझ करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आंघोळीनंतर तिळाचं तेल, खोबरेल तेल किंवा नैसर्गिक घटक वापरलेले मॉइश्चरायझर वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories