डाळिंबाची साल त्वचेसाठी वरदान! डाळींबाची साल फेकून देण्याआधी हा लेख वाचा.

- Advertisement -

डाळिंबाच्या सालीचे त्वचेसाठी फायदे भरपूर आहेत. हा लेख वाचल्यावर तुम्ही आता यापुढे डाळिंबाची साल टाकून देणार नाही एवढं नक्की. कारण डाळिंबाच्या सालीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे त्वचेशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करतात. डाळिंबाच्या सालीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊय.

मंडळी, लालभडक आणि पाणीदार दिसणारं डाळिंब हे अतिशय चविष्ट आणि पौष्टीक फळ आहे. हे अद्भुत फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरासाठी जवळजवळ सर्व आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले डाळिंब शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

थांबा, पण फक्त डाळिंबच नाही तर डाळिंबाची साल देखील तुमच्या आरोग्यासाठी विशेषत: तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करू शकते. कारण डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि दाहक गुणधर्मांसह त्वचेसाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्वचेच्या समस्यांशी लढण्यास ते मदत करतात. स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळते. त्वचेसाठी डाळिंबाच्या सालीचे फायदे वाचूया.

त्वचेसाठी डाळिंबाच्या सालीचे 5 फायदे आणि कसे वापरावे

1. अकाली येणारं म्हातारपण होईल गायब

डाळिंबाची साल त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या घालवायला मदत करते. डाळींबाच्या साली त्वचेतील कोलेजन कमी होऊ देत नाही. त्वचेतील मृत पेशी काढून टाकतात. यासाठी डाळिंबाच्या सालींची पेस्ट त्वचेवर लावू शकता. डाळिंबाची सालं उन्हात वाळवून बारीक करून पावडर बनवा.

- Advertisement -

दोन चमचे पावडरमध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि काही काळ राहू द्या. नंतर साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवा. तुम्ही हे आठवड्यातून 2-3 वेळा करा.

2. सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचं होईल रक्षण

उन्हाचा त्रास होतोय? डाळिंबाची साल त्वचेसाठी सनस्क्रीन म्हणून काम करते. ते तुमच्या त्वचेचे UVA आणि UVB किरणांसारख्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात, जे त्वचेच्या कर्करोगाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहेत. तसेच टॅनिंग कमी करते. फक्त जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा डाळिंबाच्या सालीची पावडर आवश्यक तेल, क्रीम किंवा लोशनमध्ये मिसळा आणि त्वचेवर लावा.

3. मुरुम आणि डाग कमी करते

डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि दाहक गुणधर्म मुरुमांशी लढण्यास मदत करतात. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. डाळिंबाची साल तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते आणि डागही दूर करते. यासाठी तुम्ही त्वचेवर डाळिंबाच्या सालीमध्ये दही, आवळ्या किंवा गुलाब मिसळून वापरू शकता, ही पेस्ट त्वचेवर सुकू द्या आणि साध्या पाण्याने धुवा.

4. त्वचेची छिद्र

वाढलेल्या छिद्रांमुळे त्वचेवर मुरुम येतात. कारण ते त्वचेवर अतिरिक्त तेल, घाण आणि मृत पेशींनी भरलेले असतात. ज्यामुळे त्वचेवर मुरूम येतात. डाळिंबाच्या सालींच्या मदतीने त्वचेची मोठी छिद्र भरतात. डाळिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये दही, गुलाब, पाणी किंवा आवश्यक तेल मिसळून त्वचेला लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

- Advertisement -

5. त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर

त्वचेच्या सालीमध्ये एलेजिक ऍसिड असते जे त्वचेतील ओलावा बंद करण्यास मदत करते. हे त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. इतकेच नाही तर डाळिंबाची साल त्वचेतील पीएच पातळीचे संतुलन राखण्यासही मदत करते. डाळिंबाची साले उन्हात वाळवून पावडर बनवा.

२ चमचे पावडर घेऊन त्यात थोडे मिक्स करावे. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि त्वचेच्या इतर भागांवर देखील लावता येते, 10 मिनिटे लावा नंतर साध्या पाण्याने धुवा. तर आता डाळींबाच्या सालीचे हे पुष्कळ फायदे जाणून घेतल्यानंतर डाळींबाची साल फेकून देण्याचा विचारच तुम्ही फेकून द्याल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories