मेंदीचं तेल घरच्या घरी कसं बनवायचं? जे तुमच्या केसांना चमकदार ठेवेल आणि केस गळणे थांबवेल.

Advertisements

मेंदीचं तेल तुमचे केस लांब, मजबूत आणि घट्ट होण्यासाठी उपयुक्त आहे. मेंदीचं तेल कसं बनवायचं त्याची कृती घेऊया. मेंदी केसांसाठी फायदेशीर आहे पण त्याचं तेल कसं बनवायचं ते या लेखातून समजून घ्या. मेंदीचे तेल केसांना लांब आणि चमकदार बनवते, जाणून घेऊया मेंदी पावडरने तेल कसं बनवायचं.

तुम्हालाही लांब केस हवे आहेत का? जर होय, तर मेंदीचंन तेल तुम्हाला ही इच्छा पूर्ण करण्यास मदत करू शकते. होय, मेंदीचंन तेल केसांसाठी खूप चांगले मानले जाते. हे तेल तुमच्या केसांमधील कोंडा काढून टाकण्यास, केस

गळणे थांबवते आणि केस लांब करण्यास मदत करते. मेंदीचं तेल मेंदीच्या पानांपासून बनवलं जातं ते तुमच्या केसांच्या समस्या दूर करून तुम्हाला चमकदार केस देते. मेंदीच्या पानातून किंवा मेंदीच्या पावडरपासून घरी मेंदीचं तेल कसे बनवायचे ते येथे जाणून घेऊया.

Advertisements

मेंदीचं तेल कसं बनवायचं

  • जर तुम्ही मेंदीच्या पानांपासून मेंदी तेल बनवणार असाल तर सर्वप्रथम पाने चांगली धुवा.
  • आता पाने कोमट पाण्यात भिजवा आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर बारीक करा.
  • आता त्यात थोडं पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. गोळे बनवता येतील अशा प्रकारे पेस्ट ठेवा. पण जर तुम्ही मेंदी पावडर वापरत असाल तर त्यात हलके पाणी टाकून पेस्ट बनवा आणि नंतर गोळे बनवा.
  • आता या पेस्टचे छोटे-छोटे गोळे करून कोरडे होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • गोळे थोडे कोरडे झाल्यावर कढईत खोबरेल तेल घाला.
  • आता या तेलात मेंदीचे गोळे टाका आणि तेलात शिजू द्या.
  • तेलाचा रंग बदलू लागला की गॅस बंद करून एका भांड्यात ठेवा.
  • हे थंड झाल्यावर चाळणीच्या साहाय्याने तेल वेगळे गाळून डब्यात भरून ठेवा. तुमचं मेंदी तेल तयार आहे.

कसं वापरायचं हे तेल

आंघोळ करण्यापूर्वी हे तेल केसांना आणि टाळूला चांगले लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. यानंतर, केसांमध्ये तेल कमीतकमी 2-3 तास राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. तुम्हाला हवे असल्यास ते तेल हलके कोमट करूनही लावू शकता.

केसांसाठी मेंदीच्या तेलाचे फायदे

मेंदीचे तेल तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर करून तुम्हाला चमकदार, लांब आणि मजबूत केस मिळविण्यात मदत करते. या तेलाचा नियमित वापर केल्यास अनेक फायदे होतात.

काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. मेंदीचं तेल तुमच्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. मेंदीचं तेल तुमची टाळू आणि केसांची मुळं निरोगी बनवते.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories