केळीचा हा उपाय करेल चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर, चेहरा होईल आणखी सुंदर !

- Advertisement -

बदलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात, त्यामुळे आपली त्वचा तेलकट आणि चिकट होते. मग आपल्याला त्वचेवरील मुरुमांची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे या समस्या असलेले लोक या हंगामात बाहेर पडताना विशेष काळजी घेत असतात.

यासारख्या इतर समस्या दुर करण्यासाठी, हा एक आयुर्वेदिक आणि घरातील पदार्थ वापरून तयार केलेला उपाय, आपल्या त्वचेच्या देखभालीत मदत करेल.

त्यामुळे हा खास फेसपॅक घरगुती असल्याने पूर्ण 100% नैसर्गिक आहे,तसेच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. यामुळे तुमची त्वचा देखील ताजी आणि तजेलदार राहील. हा फेसपॅक फक्त 10 मिनिटे,चेहऱ्यावर ठेवून नंतर धुऊन टाका. त्यामुळे त्वचा आणि चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील.

आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार असावा असे वाटते. त्यामुळे यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रीम वापरतो. पण या क्रियांचा फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. यामुळे आपला चेहरा काळा पडला लागतो, तसेच पिंपल्स येतात आणि ते पिंपळस फोडल्यामुळे खडे तयार होतात. तेव्हा चेहरा अजूनच बिघडून जातो,असा आपल्यासोबत होऊ नये.तसेच आपल्या चेहऱ्याला ग्लो मिळावा यासाठी हा फेसपॅक आपल्या नक्की वापरला पाहिजे.

- Advertisement -

यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पूर्णपणे कमी होतात. तसेच चेहऱ्याला एक प्रकारची चकाकी येऊन, आपले पिंपल्स पूर्णपणे कमी होण्यास सुरुवात होतात. याशिवाय चेहरा गोरा, तेजस्वी, चमकदार आणि चमकदार बनतो. या उपायात आपल्याला फक्त दोन आपल्याला घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थची आवश्यकता लागणार आहे.

या उपायाने या सर्व समस्या कमी होणार आहेत, या उपायासाठी आपल्याला पहिला घटक केळी लागणार आहेत. या केळीचे साल काढून याची आपल्याला चाकूच्या साह्याने तुकडे करायचे आहे.

अशा या केळीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन असतात व्हिटॅमिन बी आणि सिक्स, हे घटक अत्यंत उपयुक्त असतात. कारण यांच्यामध्ये मृत पेशी कमी होण्यास सुरुवात होते.केळीमध्ये सिलिका हा एक घटक असतो. जो सुरकुत्या व डोळ्याखालील काळे डाग पूर्णपणे काढून टाकतो.

त्याचप्रमाणे केळीमध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते, जे वांगाचे डाग कमी करते आणि चेहऱ्याला एक प्रकारची चमकदार असते.या केळीचे  बारीक काप करून घेतल्यावर, यामध्ये जो आपल्याला दुसरा घटक लागणार आहे, ते म्हणजे ग्लिसरीन होय,कारण याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो.

- Advertisement -

ते ग्लिसरीन लागणार आहे,हे आपल्याला कोणतेही मेडिकलवर सहज उपलब्ध होते. हे चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकते,तसेच चेहऱ्यावरील खड्डे भरण्यास मदत करते.असे ग्लिसरीन एक वेळचे उपायासाठी केळीच्या तुकड्यांमध्ये साधारणत 4 ते 5 थेंब मिक्स करायचे आहे.

यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे ग्लिसरीन उपलब्ध झाले नाही, तर हे वापरू नये.त्यावेळी फक्त केळीचे बारीक केलेले  तुकडे वापरून हा फेस पॅक तयार करायचा आहे. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट बनवायचे आहे. असे अत्यंत उपयुक्त फेसपॅक तयार झाल्याच्या नंतर, आपल्याला चेहऱ्यावर बोटाच्या साहाय्याने पद्धतीने दिवसभरात एक वेळ लावायचा आहे.

15 मिनिटं ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे. तसेच दिवसभरात आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा हा फेसपॅक वापरू शकतात. सलग 15 दिवस हा फेसपॅक तुम्हाला वापरायचा आहे,यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदार बनेल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories