ऋजुता दिवेकर सांगतात हेड मसाजची अनोखी पद्धत ज्याने केस होतील मुलायम दाट आणि रेशमासारखे!

केसांच्या आरोग्यासाठी आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत चालत आलेली आहे. केसांना मालिश करणे किंवा डोक्याला मालिश करणे याला हेड मसाज म्हणतात. केस तुटणे, गळणे, फाटणे, केसात कोंडा, खरूज होणे या सर्वांवर एकच नामी उपाय आहे तो म्हणजे डोक्याला तेलाने मालिश करणे. पण नेमकी मसाज करण्याची पद्धत कोणती असावी.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर हेड मसाज करण्याची अजून पद्धत सांगत आहे. त्यांच्या मते या पद्धतीमुळे तुमच्या केसांना नवसंजीवनी मिळते आणि केसांचे बरेचसे त्रास दूर होतात तर या विषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया. रुजुता दिवेकर यांनी सांगितलेला डोक्याला तेलाने मालीश करण्याच्या या योग्य पद्धतीने केस आणि टाळूची समस्या दूर होईल.

हेड मसाज करण्याची कला

केस गळणे, तुटणे, फाटणे आणि कोंडा इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी हेड मसाज हा एक चांगला उपाय आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सांगतात केसांना चॅम्पी करण्याची खरी आणि अचूक पद्धत कोणती आहे? डोक्याला तेल लावून चंपी करण्याची परंपरा फार जुनी आहे.

चांगल्या दर्जाच्या तेलाने केसांन मसाज केल्याने डोक्यातील कोंडा आणि केस गळणे, केस अकाली पांढरे होणे यांसारखे केसांचे विकार कमी होतात. नियमित तेल मालीश करुन केस मऊ आणि चमकदार बनवता येतात. आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत.

ह्या सगळ्यात एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला तेलाने हेड मसाज करण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी पार्लरसारखी चम्पी घरी करण्याचा एक सोपा मार्ग सुचवला आहे, ज्याबद्दल आपण वाचूया.

घरच्या घरी केसांना तेलाने चम्पी कशी करायची?

  • डोक्याला चंपी करण्यासाठी सर्वप्रथम तळहातावर तेल घेऊन ते बोटांनी आपल्या टाळूला लावायचं आणि हलक्या हातांनी चोळायचं. चंपीची ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. केसांची लवकर वाढ होण्यासाठी तेल लावण्याची पद्धत खूप फायदेशीर आहे.
  • यानंतर, तुम्ही तुमच्या तळहाताच्या मदतीने तुमच्या डोक्याच्या मध्यभागी तेलाचा थाप मारून चांगला मसाज करू शकता, तुम्ही हे काही सेकंदांसाठी करा. हे केल्याने डोकेदुखीतही आराम मिळेल.
  • पुढच्या अवस्थेत तुमची बोटं तेलात बुडवून तुमच्या दोन्ही हातांचे अंगठे कानामागे ठेवा आणि उरलेली तेलाची बोटे गोल फिरवून मध्यभागी हलवा.
  • या काळात, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या टाळूचा भाग थोडा कठोर आहे, तर त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. बोटांना तेल लावून तळापासून वरपर्यंत मसाज करा.
  • चंपी किंवा मसाजच्या शेवटच्या टप्प्यात, तुम्ही तुमचे दोन्ही अंगठे पुढच्या भागावर आणून लॉक करा आणि बाकीच्या बोटांनी डोक्याला तेल लावा, गोलाकार हालचालींनी ते समोरून डोक्याच्या मध्यभागी हलवा, असं केल्याने तुम्हाला फरक जाणवतो.

ह्यानंतर तुम्हाला मानसिक शांतता सुद्धा मिळेल आणि केसांचे विकार सुद्धा पळून जातील अर्थात तुम्ही नियमित हेड मसाज जाणकार व्यक्तीकडून,आयुर्वेदिक सिद्ध तेलाने करून घेऊ शकता. अधिक फायदा हवा असेल तर तुम्ही घरी खोबरेल तेलाने हेड मसाज करू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories