आपण वाढणारं वय थांबवू शकत नाही, परंतु आपण त्याची लक्षणे नियंत्रित करू शकतो. चला जाणून घेऊया डोळ्यांजवळ रेषा दिसू लागल्या तर त्यावर खात्रीशीर उपाय. वृद्धत्वाच्या अनेक लक्षणांपैकी चेहऱ्यावर दिसणारे पहिले लक्षण म्हणजे सुरकुत्या. ते कुठेही येऊ शकतात – गालावर, ओठांच्या वर आणि डोळ्यांच्या बाजूला.
डोळ्यांच्या बाजूला एकत्र दिसणाऱ्या तीन सुरकुत्या हे सूचित करतात की तुम्ही वय वाढल्याने आता म्हातारे होत आहात. परंतु कधीकधी ह्या खुणा तिशीत किंवा चाळिशीतच दिसू लागतात. त्यांना कावळ्याचे पाय असं गमतीने म्हणतात.
कावळ्याचे पाय हा काय प्रकार आहे?
कावळ्याचे पाय म्हणजे डोळ्याभोवती सुरकुत्या दिसतात, जिथे स्नायू त्वचेला जोडले जातात तिथे कावळ्याच्या पायांसारख्या लहान रेषा दिसतात. आणि इतर सुरकुत्यांप्रमाणे ते वृद्धत्वाचा एक सामान्य भाग आहेत. परंतु कावळ्याचे पाय जरी नॉर्मल असलं तरीही बरेच लोक ते कमी करण्यासाठी उपाय शोधत आहेत. कारण त्याने तुमचं वाढलेलं वय दिसतं. तुमच्या डोळ्यांजवळच्या बारीक रेषा टाळण्यासाठी आणि त्यावरचे सर्वोत्तम उपाय आणि आवश्यक काळजी.
हा तर वय वाढल्याचा परिणाम
वय वाढलं की केव्हा ना केव्हा तरी चेहऱ्याचं सौंदर्य कमी होत जातच. वाढत्या वयासोबत कालांतराने त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते. तसेच, जसे तुमचे वय वाढत जाते तसतसे तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेलाचे उत्पादनही कमी होते. यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात.
अनुवांशिकता कारणीभूत
तुमच्या पालकांनाही कावळ्याच्या पायासारखे दिसणाऱ्या सुरकुत्या डोळ्यांभोवती आहेत का? जर होय, तर अनुवंशिकतेमुळे तुमच्या डोळ्यांच्या भोवती देखील अशा सुरकुत्या वय वाढल्यावर येऊ शकतात.
प्रदूषणाचा परिणाम भयंकर
आज-काल वाहनांची संख्या वाढल्यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. शहरांमधील उच्च वायू प्रदूषणामुळे सुरकुत्या पडण्याची आणि अकाली वृद्धत्वाची शक्यता वाढते.
धूम्रपान करताय
सिगारेटमुळे वृद्धत्वाची गती वाढू शकते. ज्या महिला सिगारेट ओढतात, त्यांच्या डोळ्यांजवळ अशा रेषा लवकर दिसू लागतात.
चेहऱ्यावरील हावभाव रेषा उमटवतात
जेव्हा तुम्ही कुजबुजताना, हसताना आणि ओरडताना तुमच्या चेहऱ्याचे स्नायू ताणता तेव्हा त्वचेवर ताणून कायमच्या सुरकुत्या येऊ शकतात.
डोळ्यांभोवती येणाऱ्या रेषा म्हणजेच कावळ्याच्या पायाची समस्या टाळता येईल का?
कावळ्याचे पाय हे वृद्धत्वाचे नैसर्गिक लक्षण आहे आणि चेहऱ्याच्या हालचालीं, आणि शारिरीक ठेवणीचे लक्षण आहे. या सुरकुत्या रोखण्याचे काही ठोस मार्ग नाहीत, पण काही साधे उपाय करून सुद्धा तुम्ही डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या हळूहळू कमी करू शकता.
डोळ्यांच्या बाजूला रेषा आल्या असतील तर तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता
त्वचा मॉइश्चराइज ठेवा
डोळ्यांखाली थोडं मॉइश्चरायझर लावा आणि त्वचेला मॉइश्चरायीज ठेवा. यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही आणि त्यावर सुरकुत्या कमी पडतील. त्वचा कोरडी पडल्यामुळे तिची रचना बदलते.
धूम्रपान थांबवा
आतापर्यंत तुम्हाला हे माहित असेलच की धूम्रपान केवळ तुमच्या फुफ्फुसासाठीच नाही तर त्वचेसाठीही हानिकारक आहे. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे कावळ्याच्या पायाच्या सुरकुत्या टाळायच्या असतील तर आजच धुम्रपान बंद करा.
दररोज सनस्क्रीन वापरा
दररोज सनस्क्रीन वापरल्याने अतिनील किरणांमुळे होणा-या नुकसानापासून आपल्या त्वचेचं रक्षण होते. परंतु सनस्क्रीनचा एसपीएफ किमान ३० असणे आवश्यक आहे. तसेच त्यात झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड असावं. ह्या किरणांमुळे कोलेजनचा ऱ्हास होतो. कोलेजन आपल्या त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य ठेवण्यासाठी आवश्यक आहे.