गुलाबाची फुलं अंगाला येणारा दुर्गंध घालवतात. पण वापरायची कशी? वाचा.

शरीराच्या दुर्गंधीने त्रास होत असेल तर गुलाबपाणी वापरा. रोज येणारी शरीराची दुर्गंधी कशी घालवायची त्यावर हा जुना उपाय आहे.

गुलाबाची फुलं अशी वापराल तर ती शरीराची दुर्गंधी घालवतात.

काही लोकांच्या अंगाला विचित्र वास येतो. शरीराच्या ह्या दुर्गंधीचा तुमच्या मूडवर वाईट परिणाम होतो. चुकीचा आहार, हार्मोनल बदल किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे शरीरातून दुर्गंधी येते.  शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर गुलाबपाणी वापरा. किती परफ्यूम लावलं तरी ही दुर्गंधी लपत नाही. पण साधं गुलाबपाणी सुद्धा घाम कमी करते. तसेच, गुलाब नैसर्गिक तुरट पदार्थाप्रमाणे काम करतो, ज्यामुळे शरीराची दुर्गंधी जाते.

गुलाबाच्या पाकळ्या

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वापरता येतात. गुलाबाच्या पाकळ्या चुरून पाण्यात टाका. पाकळ्यांचा रस पाण्यामध्ये नीट मिसळतो, मग गॅस बंद करा. हे पाणी थंड होऊ द्या. गुलाबाच्या पाकळ्या उकळलेल्या ह्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी दूर होते. गुलाब पाण्याने आंघोळ केल्यास शरीरात ताजेपणा येतो आणि थकवाही दूर होतो.

गुलाब तेल

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी गुलाब तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. गुलाबाचे तेल बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या सुकवून घ्या. यानंतर कोरड्या पाकळ्या बारीक करून पावडर तयार करा. खोबरेल तेल गरम करून त्यात गुलाबपूड घाला. ही पावडर तेलात चांगली विरघळू द्यावी. तेलाचा रंग बदलला की गॅस बंद करा. तेल गाळून हवाबंद डब्यात साठवा. शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येत असेल किंवा दुर्गंधी येत असेल अशा ठिकाणी हे तेल कापसाच्या मदतीने लावा. यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होईल. रोझशिप तेल हे नैसर्गिक परफ्यूम म्हणूनही काम करते.

गुलाब पावडर

गुलाबाच्या पाकळ्यांपासून पावडर बनवून पेस्ट तयार करा आणि शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येत असेल त्या भागावर लावा. गुलाबाची पेस्ट त्वचेवर 30 मिनिटे ठेवा, नंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवा आणि कोरडी करा. शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्याचा हा एक सोपा उपाय आहे.

गुलाब पाण्याचा वापर

गुलाबपाणी शरीराची दुर्गंधी घालवते. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी, शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो, जसे की अंडरआर्म, गुडघ्याच्या मागे, मानेचा भाग किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात गुलाबापासून बनवलेले ताजे गुलाबपाणी लावा. 30 मिनिटे गुलाबपाणी राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवा.

असं केल्याने शरीराची दुर्गंधी हळूहळू कमी होते. तुम्हाला गुलाब पाण्याची ॲलर्जी असल्यास लॅव्हेंडर तेल किंवा बेकिंग सोडा किंवा कडुलिंबाची पानं सुद्धा वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories