बेसनाचं पीठ त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की ते केसांसाठीही तेवढंच उपयुक्त आहे.
जाणून घ्या केसांसाठी बेसन कसं फायदेशीर आहे

नितळ आणि चमकदार त्वचेसाठी, अनेकजण चेहऱ्यावर बेसन लावण्याचा सल्ला देतात. एवढच नाही तर चेहऱ्यावर बेसन लावणे हा मावशी आणि काकीचा जुना उपाय आहे, जो आपण आजपर्यंत वापरत आहोत. पण तुम्ही कधी केसांसाठी बेसनाचा वापर केला आहे का? नक्कीच नसेल केला कारण आपण याबद्दल कधीही विचार केला नसेल.
पण आता विचार करा! कारण बेसन तुमच्या केसांसाठी चमत्कार करेल. बेसनमध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात, जे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. हे पौष्टीक घटक तुमचे केस मजबूत आणि निरोगी बनवतात आणि त्यांना चमकदार लुक देतात.
जाणून घ्या तुमच्या केसांसाठी बेसन किती फायदेशीर आहे?

बेसनमध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात, जे आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. ज्याने
- केसांची चांगली वाढ होते
- केस गळायचे कमी होतात
- केस स्वच्छ होतात
- कोंडा कमी होतो
- केसांतला कोरडेपणा कमी होतो
- नैसर्गिक कंडिशनर म्हणून बेसन काम करेल
- आणि या सगळ्या फायद्यांमुळे केस चमकदार आणि लांब होतात.
बेसनापासून बनवलेले काही हेअर मास्क जाणून घ्या जे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
केसांना लावा दही आणि बेसन

बेसन-दही तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे, कारण हे मिश्रण टाळूच्या आणि मग केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि केसांना टवटवीत करते. परिणामी केसांची वाढ होते. दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायदेशीर बॅक्टेरिया असतात, जे टाळूवरची अशुद्धता आणि घाण काढून टाकतात.
बेसन केसांसाठी फायदेशीर आहे तर ते वापरायचं कसं ते जाणून घ्या
- थोडं बेसन घेऊन त्यात थोडे दही घाला.
- आता त्यात हळद घालून पेस्ट बनवा.
- ही पेस्ट केसांवर लावा आणि 30 मिनिटे राहू द्या.
- त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
अंडी आणि बेसनचा हेअर मास्क

जर तुम्हाला कोरड्या आणि निर्जीव केसांचा त्रास होत असेल तर हा हेअर मास्क तुमच्यासाठी योग्य आहे. बेसन आणि अंडी मिळून तुमचे केस कंडिशन करतात आणि ते मऊ आणि रेशमी बनवतात. हा मास्क तुमच्या केसांमधला कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ते मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करेल.
कसा बनवायचा हा मास्क
- थोडे बेसन घेऊन त्यात अंडी घालून एकत्र फेटून घ्या.
- आता त्यात लिंबू आणि मध मिसळून पेस्ट बनवा.
- हे मिश्रण टाळूवर लावा आणि थोडा वेळ थांबा.
- त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
ऑलिव्ह ऑईल आणि बेसन हेअर मास्क

ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे आणि जेव्हा ते बेसनामध्ये मिसळले जाते तेव्हा ते अधिक पौष्टीक होते. बेसन आणि ऑलिव्ह ऑइलच्या मिश्रणाने तुमचे केस लांब आणि मजबूत होतात.
कसं वापरायचं
- थोडं बेसन घेऊन त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाकून घट्ट पेस्ट बनवा.
- ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि थोडा वेळ तशीच राहू द्या.
- केस खूप कोरडे होण्यापूर्वीच ते कोमट पाण्याने धुवा.