आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्हिटॅमिन C, E आणि B3 अत्यंत आवश्यक आहेत आणि टाचांना भेगा पडणे हे या जीवनसत्त्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी ही तीन व्हिटॅमिन नक्की कशी मिळवायची ते आपण पाहूया. आपल्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्या व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे त्वचेवर दिसतात.
फाटलेले ओठ, भेगाळलेल्या टाचा आणि अशी अनेक इतर चिन्हे आहेत जी आपल्या शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरता असल्याचं दर्शवतात. दात आणि हाडं दुखत असतील तर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. तर फाटलेले ओठ आणि रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीची कमतरता दर्शवतात.
एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे क्रॅक झालेली किंवा भेगाळलेली टाच. भेगा पडलेल्या टाचा खूप वेदनादाक असतात आणि विशेषकरून हिवाळ्यात शरीरात हवा आणि ओलावा नसल्यामुळे टाचांना भेगा लगेच पडतात.
टाचा फुटण्याची आणि भेगाळण्याची अनेक कारणे असली तरी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेच हा त्रास सुरू होतो. त्वचेच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे B3, C आणि E व्हिटॅमिन बी 3 त्वचा आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
नियासिन या नावानेही ओळखले जाणारे, व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये स्मृती कमी होते, अतिसाराचा त्रास होऊन, सूज आणि जीभ लाल होते. कधीकधी व्हिटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे हात, पाय, मान इत्यादीसारख्या उन्हाच्या संपर्कात असलेल्या भागातली त्वचा लाल आणि कोरडी खवलेयुक्त होऊ शकते.
व्हिटॅमिन सी

हिरड्या आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होऊ शकतो ज्यामध्ये प्रामुख्याने हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे, केसांच्या मुळांच्या आसपास रक्तस्त्राव होणे आणि जखमा भरणे कमी होणे हे वैशिष्ट्य आहे. केस गळणे, थकवा आणि अशक्तपणा ही व्हिटॅमिन सी च्या कमतरतेची इतर लक्षणे आहेत.
व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारक प्रणाली, पेशी आणि रक्ताभिसरण योग्य राखण्यासाठी महत्वाचं आहे. ब्युटी व्हिटॅमिन म्हणूनही व्हिटॅमिन ई ओळखले जाते, ते त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे, संवेदना कमी होणे आणि कोरडी त्वचा, सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व होऊ शकते.
टाचांना भेगा पडण्यावर उपाय

कोरडेपणा हे टाचांच्या भेगा पडण्याचे सर्वात मोठे कारण आहे, त्यामुळे त्वचेची आर्द्रता राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या पाणी पिण्याचं प्रमाण वाढवणे हे स्वतःला आणि त्वचेला हायड्रेट करण्याच्या दिशेने पहिलं आणि सर्वात मूलभूत पाऊल आहे.
याव्यतिरिक्त, तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करावी आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी युरिया किंवा लैक्टिक ऍसिड असलेली क्रीम लावावी. नियमितपणे लोशन, क्रीम, फूट क्रीम आणि सॉक्स परिधान केल्याने त्वचा हायड्रेट ठेवायला मदत होते.
तुम्ही विशेषत: टाचांच्या त्वचेसाठी डिझाइन केलेली प्रोडक्टस् देखील वापरू शकता आणि चांगल्या पायांसाठी रात्री झोपताना पायाच्या टाचांना लावू शकता.