केसांसाठी कढीपत्ता बेस्ट उपाय! हिवाळ्यातील केसांतला कोंडा असा घालवा.

बदलत्या हवामानामुळे आपल्याला जशी उबदार कपड्यांची गरज असते, तशीच आपल्या केसांचीही जास्त लक्ष देऊन विशेष काळजी घेणे आवश्यक असते. बदलत्या ऋतूतही जर आपण केसांची निगा राखण्याची पद्धत बदलली नाही तर केसांचे अनेक त्रास सुरु होऊ शकतात. कारण हिवाळ्यात वातावरणात ओलावा नसल्यामुळे टाळू कोरडी पडते. त्यामुळे इन्फेक्शन, कोंडा असे त्रासही होऊ शकतात.

केसात खूप कोंडा होतो  जो कमी होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे तुमचे केस तेलकट दिसू लागतात आणि त्यात कोरडेपणा वाढू लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी कढीपत्त्याची रेसिपी गुणकारी आहे. तसंच, दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चघळायला सुरुवात करा. 

हे सर्व उपाय केल्यावर केसांची समस्या दूर होईल ह्याही खात्री बाळगा. कारण आपण आजवर अनेक केमिकल प्रॉडक्ट्स आणि इतर उपाय करून पाहतो  परंतु कढीपत्ता केसांसाठी फायदेशीर असल्याचं तुम्हाला पटेल. हे करून पहा.  तर जाणून घ्या कढीपत्ता तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीही किती फायदेशीर आहे.

डोक्यातील कोंडा आणि स्कल्प इन्फेक्शन कमी करा

कोंडा कमी करण्यासाठी कढीपत्ता खूप उपयुक्त ठरू शकतो. कढीपत्त्यात नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यात मदत होते. यामुळे खाज दूर होते. याच्या तेलामध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म  स्कल्प इन्फेक्शन कमी करतात.

केस वाढतात 

कढीपत्ता केसांच्या वाढीला मदत करतो. कारण तो केसांना आतून पोषण देतो  आणि त्यांना चमकदार लुक देतो. हा एक उत्तम नैसर्गिक घटक आहे जो केसांची दुरुस्ती करतो आणि कोणत्याही नुकसाना पासून केसांचं संरक्षण करतो. केसांची वाढ सुधारण्यात मदत करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक घटक आहे.  कढीपत्ता तेल आपल्या स्कॅल्पला मॉइश्चरायझ करण्यासाठी फायदेशीर आहे.

चला जाणून घेऊया कढीपत्त्याच्या काही खास टिप्स ज्या तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर आहेत.

1. कोंडा कमी करण्यासाठी कढीपत्ता हेअर मास्क 

कढीपत्ता हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला लागेल

 • 15-20 कढीपत्ता
 • पाणी
 • 2 चमचे दही

मास्क कसा तयार करायचा

सर्व प्रथम एका भांड्यात 15-20 कढीपत्ता घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला. ते चांगले बारीक करा आणि या मिश्रणात 2 चमचे दही घाला. ते सर्व चांगले मिसळा आणि नंतर केसांना मास्क लावा. मास्क लावल्यानंतर ३० मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवा.

केसांचे आरोग्य राखण्यासाठी कढीपत्ता हेअर स्प्रे

 • कढीपत्ता हेअर स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला पाणी लागेल
 • 1 कप कढीपत्ता
 • पाणी – एक ग्लास

हेअर स्प्रे असा बनवा

कढीपत्त्याची पानं मऊ होईपर्यंत मूठभर ताजी कढीपत्ता पाण्यात उकळवा. नंतर हे मिश्रण थंड करून गाळून घ्या. शॅम्पू केल्यानंतर हे मिश्रण केसांना लावा. ते लागू करण्यासाठी स्प्रे बाटली वापरा. थोडा वेळ तसंच राहू द्या आणि मग सोडून द्या.

दाट आणि मजबूत केसांसाठी कढीपत्ता हेअर ऑइल 

कढीपत्ता वापरून केसांचं तेल तयार करण्यासाठी, आपल्याला आवश्यक असेल

 • 1 कप कढीपत्ता
 • 1 टीस्पून मेथी
 • अर्धा लिंबू
 • 2 चमचे नारळ तेल
 • ½ कप दही

तेल तयार करण्यासाठी मिक्सर जार घ्या आणि त्यात कढीपत्ता घाला. तसेच त्यात मेथी आणि अर्धा लिंबू घाला. गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी सर्व साहित्य चांगले मिसळा. नंतर ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात दही घाला. त्यात 2 चमचे खोबरेल तेल घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. एकदा मास्क तयार झाल्यानंतर, 30-40 मिनिटे केसांवर लावा.

तर आपणही घरच्या घरी सहज मिळणार कढीपत्ता वापरून केसांचं आरोग्य सुधारायला हवं नाही का! आपल्या मित्र आणि मैत्रिणींना हा उपयुक्त लेख शेअर करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories